Vedantikaraje Bhonsle

Vedantikaraje Bhonsle कर्तव्य सोशल ग्रुप Social service

निर्मल मन
21/02/2026

निर्मल मन

जनसेवेची बांधिलकी जोपसणारं बुलंद नेतृत्व..!
11/02/2026

जनसेवेची बांधिलकी जोपसणारं बुलंद नेतृत्व..!

15/01/2026

आपला सातारा स्वच्छ, सुंदर,
निसर्गरम्य ठेवण्यासाठी
एक पाऊल पुढे चालूया..!

15/01/2026

भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी प्लास्टिक निर्मूलन काळाची गरज आहे.

28/07/2025

https://youtu.be/W9GbBkCStfE

आले रे आले....बाप्पा आले...
पण हे बाप्पा तुम्हाला दिसत आहेत का ??? हो कारण हे विशेष बाप्पा आहेत ठराविकच लोकांना दिसतात.

बघा तुम्हाला पण दिसतात का...!
*Invisible बाप्पा*

नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा 🙏

'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याने सातारकर मंत्रमुग्ध           सातारा- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्र...
05/05/2025

'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याने सातारकर मंत्रमुग्ध
सातारा- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी मुंबई व सहकलाकार यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित सादर केलेल्या 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याने सातारकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यावर्धिनीच्या अध्यक्षा श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नृत्यांजली संस्थेच्या संस्थापिका सौ.वैशाली पारसनीस, सांख्य डान्स कंपनीचे कलात्मक संचालक वैभव आरेकर व सुशांत जाधव हे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना नृत्यांजलीच्या संस्थापिका सौ वैशाली पारसनीस यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.
सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक विकास, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. विविध कलागुणांचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व व गरज ओळखून शालेय शिक्षणाबरोबर विविध कलागुणांचे भावी पिढीवर संस्कार झाले पाहिजेत. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांजलीच्या ज्येष्ठ शिष्यांनी सादर केलेल्या 'गणपती तालम'ने झाली. नृत्य संरचना गायत्री जोशी आणि सायली कुलकर्णी यांनी केली, पल्लवी सहस्त्रबुद्धे, विभावरी गोडबोले, अनुजा बोकील, श्रुती कडूसकर, सायली शेणोलीकर आणि गायत्री जोशी सहभागी झाल्या होत्या.
'सांख्य' द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक स्थिती, शिवचरित्र या नृत्याच्या माध्यमातून प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले. शिवरायांचा जन्म, स्वराज्याची प्रतिज्ञा, अन्याय, अत्याचाराविरुद्ध विरुद्ध लढा, हिंदवी स्वराज्याची स्थापना, अंतर्गत अध्यात्मिक संघर्ष, राज्याभिषेक हे प्रसंग नृत्याच्या माध्यमातून तसेच वेशभूषा, प्रकाश रचना, संगीत यांचा प्रभावीपणे व ताकतीने वापर करून वैभव आरेकर व सुशांत जाधव व सहकलाकारांनी सादरीकरण केले. सौ चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास श्री पारसनीस, डॉ.समीर सोहनी, उद्योजक शिरीष खुटाळे, डॉ अनंत निमकर, जयंत देशपांडे आदी मान्यवरांसह नृत्यकला गणशिष्य, शिवप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमच झालेल्या महाआरोग्य तपासणी शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ            सातारा-  साताऱ्यात कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आ...
05/05/2025

प्रथमच झालेल्या महाआरोग्य तपासणी शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ
सातारा- साताऱ्यात कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच झालेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबीरराचा हजारो रुग्णांना लाभ झाला. असंख्य रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
येथील कला, वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदान सातारा येथे झालेल्या या शिबिराचे उदघाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात हॉस्पिटलचे सीईओ आणि कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. बसवराज कडलगे, डॉ. राहुल चौगुले, ओंकार कदम, शीतल कात्रे, अनुजा पाटील, मदन गोरे आदी तज्ज्ञांनी रुग्णांची टॅप्सनी केली.
यावेळी हाडाचे फ्रॅक्चर (अपघात मध्ये मोडलेली हाड), अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, केमोथेरपी पोर्ट, डायलिसिस, ए व्ही फिश्चुला (डायलिसिस रुग्णांसाठी), पमकॅथ (डायलिसिस रुग्णांसाठी), दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे ऑपरेशन, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईड गाठी वर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठी वर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेह मुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन यांची तपासणी व उपचार करण्यात आले.
तसेच शिबिरात मोफत ई. सी. जी., अँजिओग्राफी, रक्तातील साखर तपासणी, लघवीची धार तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सातारा येथे प्रथमच मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर         सातारा-  कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर...
03/05/2025

सातारा येथे प्रथमच मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर
सातारा- कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. साताऱ्यात प्रथमच होत असलेले हे शिबीर रविवार दि. ४ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत कला, वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदान सातारा येथे होणार आहे.
या शिबिरमध्ये हाडाचे फ्रॅक्चर (अपघात मध्ये मोडलेली हाड), अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन, सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, केमोथेरपी पोर्ट, डायलिसिस, ए व्ही फिश्चुला (डायलिसिस रुग्णांसाठी), पमकॅथ (डायलिसिस रुग्णांसाठी), दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे ऑपरेशन, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेली थायरॉईड गाठी वर मायक्रोवेव द्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठी वर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेह मुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन यांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
शिबिरात मोफत ई. सी. जी., अँजिओग्राफी, रक्तातील साखर तपासणी, लघवीची धार तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट अँटीजेन तपासण्या करण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी 8928736999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अथायु हॉस्पिटल मध्ये मेंदू व मणका ऑपरेशन, हॅर्निया, अँपेंडिक्स, मूळव्याध, फिशर , गुडघा व खुबा प्रत्यारोपण, किडनी ट्रान्सप्लांट (प्रत्यारोपण) सवलतीच्या दरात केले जाणार आहे.

साताऱ्यात महाराष्ट्र दिनी 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन            सातारा- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिन...
27/04/2025

साताऱ्यात महाराष्ट्र दिनी 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन
सातारा- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल येथे गुरुवार दि. १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही कलाकृती सदर करण्यात येणार आहे.
मुंबईचे प्रसिद्ध नृत्य कलाकार वैभव आरेकर दिग्दर्शित 'श्रीमंत योगी' म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाजाची अणि स्वतः छत्रपती श्री शिवाजी महाराजांची सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक स्थिती, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनातील प्रसंगांमधून प्रभावित होऊन सादर केलेली ही नृत्य अभिव्यक्ती आहे. ३५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संचालिका गुरू वैशाली पारसनीस यांनी १९९१ मध्ये साताऱ्यात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य शैलीच्या प्रशिक्षणाचे बीज रोवले. सातारा तसेच पुणे येथे या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळालेली सातारा जिल्हयातील ही एकमेव नृत्य संस्था असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचलनालयाकडून राज्य माध्यमिक शाळांत परीक्षेसाठी नृत्य कला विभागात नृत्यांजली नृत्य संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थीनींना वाढीव गुण देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वैशाली पारसनीस या भारती विद्यापीठाच्या कला विभागात भरतनाट्यम मध्ये पदवी आणि पदव्यूत्तर प्रशिक्षणासाठी नृत्य गुरु म्हणून कार्यरत आहेत. वैशाली पारसनीस यांच्यासह विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारकर इतिहासप्रेमी आणि कलारसिकांसाठी 'श्रीमंत योगी' या नृत्यनाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या भव्यदिव्य शास्त्रीय नृत्य कलाकृतीचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

24/04/2025

साताऱ्यात महाराष्ट्र दिनानिमित्त 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन
सातारा- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल येथे गुरुवार दि. १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही कलाकृती सदर करण्यात येणार आहे. तरी, सर्वांनी या ऐतिहासिक नृत्यनाट्य आविष्काराचा लाभ घ्यावा.

Address

Satara
415002

Telephone

+919146155655

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedantikaraje Bhonsle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category