श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा

  • Home
  • India
  • Satara
  • श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा, Library, Satara.

नक्की सहभागी व्हा.
14/02/2026

नक्की सहभागी व्हा.

01/02/2026

*सातारकर रसिकहो, नमस्कार रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आयोजित पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती आयोजित जागतिक मराठी अभिवाचन महोत्सव या स्पर्धेचे हे तेविसावे वर्ष आहे*. *ही स्पर्धा महाराष्ट्रात तब्बल २२ केंद्रांवर होते.यावर्षी प्रथमच या स्पर्धेची प्राथमिक फेरी सातारा केंद्रात नगरवाचनालयाच्या सहकार्याने होत आहे.साताऱ्यातली प्राथमिक फेरी रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे*.
*सातारा केंद्रातील प्राथमिक फेरी साठी नावनोंदणीची अंतिम तारीख दि.८ फेब्रुवारी २०२६*
*अभिवाचनासाठी विषय : कविता ,कवितेविषयी काही किंवा ललित लेख*
*एका गटात कमीत कमी दोन व जास्तीत जास्त पाच जणांचा सहभाग (शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित नाही)*
*अभिवाचनासाठी वेळ २५ ते ३० मिनिटे*
*अंतिम फेरी चाळीसगाव येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी होईल*
*अंतिम फेरीसाठी पारितोषिके*
*प्रथम क्रमांक रु १००००/-*
*द्वितीय क्रमांक रु ७०००/-*
*तृतीय क्रमांक रु ५०००/-*
*उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी रु २०००/-*
*याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, वैयक्तिक वाचिक अभिनय,प्रेक्षक पसंती अशी विविध पारितोषिके*

*तेव्हा सातारा केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजच नावनोंदणी करा*.
*अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा*.
*श्री पद्माकर पाठकजी भ्रमणध्वनी क्रमांक ८८८८८०१४४३*

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून एका नवीन उपक्रमाचा शुभारंभ. उद्या आणि यापुढे प...
17/01/2026

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या जयंतीनिमित्त उद्यापासून एका नवीन उपक्रमाचा शुभारंभ. उद्या आणि यापुढे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी. सातारकर मुक्त वाचन कट्ट्यावर आपलं स्वागत आहे.

28/07/2025

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा याच्या ग्रंथपाल सौ रुपाली मुळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार ( रु २५००० )जाहीर झाला आणि त्यांच्या समर्पित ग्रंथालय सेवेचे कौतुक झाले याबद्दल आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे . गेली जवळपास पंचवीस वर्षे त्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून उत्तम सेवा देत आहेत . यापूर्वी त्यांना ग्रंथालय संघाचा व अश्वमेध ग्रंथालयाचा ही पुरस्कार प्राप्त झाला आहे .
त्यांचे मनापासून अभिनंदन.

सर्वांनी नक्की यावे.
13/06/2025

सर्वांनी नक्की यावे.

26/04/2025

*आमच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या वतीने शालेय मुलांच्यात वाचनसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने येत्या उन्हाळी सुट्टीत दि.२ मे ते १० जून २०२५ या कालावधीत मोफत बालवाचन विभाग चालू करणेत येत आहे. यामध्ये इयत्ता दुसरी ते दहावी मधले विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. त्यांना वाचनालयातील सर्व विभागातील पुस्तके सकाळी ९ ते ११ व संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत वाचनालयात बसून वाचण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. २५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असणाऱ्या मुलांना पुस्तक भेट देण्यात येईल*
*तरी या उपक्रमाविषयी आपल्या परिचित विद्यार्थ्याना सांगावे व सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे ही विनंती*

नक्की यावे..
15/04/2025

नक्की यावे..

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!
02/04/2025

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

गुढी पाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या सर्व वाचक सभासदांना हार्दिक शुभेच्छा!श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाच...
30/03/2025

गुढी पाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या सर्व वाचक सभासदांना हार्दिक शुभेच्छा!

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे गुढीपाडव्यानिमित्त संत साहित्य विषयक ग्रंथांची गुढी उभा करण्यात आली .
नवीन वर्षाचा शुभारंभ होता ना संत साहित्याचे विचार माणसाच्या जगण्याला प्रेरक आणि प्रेरणा देणारे ठरतील त्यासाठी ग्रंथांचे वाचन महत्त्वाचे आहे
नगर वाचनालयात विविध प्रकारचे जवळपास दीड लाख ग्रंथ उपलब्ध आहेत .
ज्या वाचकाला ज्या पद्धतीचे साहित्य आवडेल ते साहित्य त्याला वाचण्यास उपलब्ध करून दिले जाते
माणसाला समृद्ध आणि सजग बनायचे असेल तर ग्रंथ वाचन हे महत्त्वाचे आहे हे सांगण्याच्या उद्देशातून ही ग्रंथांची गुढी वाचनालयात उभी केली आहे
यावेळी गुढीचे पूजन करण्यात आले
कार्यवाह वैदेही कुलकर्णी ,लेखक डॉक्टर राजेंद्र माने,डॉक्टर जोत्स्ना कोल्हटकर, डॉक्टर श्याम बडवे डॉक्टर संदीप श्रोत्री,विजयकुमार क्षीरसागर पत्रकार अनील वीर ,श्रीधर साळुंखे ,गौतम भोसले, आनंदा ननावरे,
वसंत चिकोडे , श्री किर्लोस्कर, ग्रंथपाल रुपाली मुळ्ये , अन्वेषा , विष्णू दळवी , भाग्यश्री शिंदे , वेदांत किरवे , विजय दळवी
उपस्थित होते .

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले)नगरवाचनालय ,सातारा  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे सार्वकालिक प्रेरणादायी ...
21/03/2025

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले)नगरवाचनालय ,सातारा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे सार्वकालिक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
सातारा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे सार्वकालिक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या मधील एखादा गुण जरी आपण स्त्रियांनी आत्मसात केला तर तीच त्यांना त्यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षात खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन डॉ वृंदा शिवदे यांनी केले.नगरवाचनालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित निबंध व काव्यलेखन स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.डॉ शिवदे यांनी यावेळी अहिल्यादेवी यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग आजच्या काळातील महिलांनाही कसे मार्गदर्शक ठरु शकतात ते सोदाहरण स्पष्ट केले.
नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित या निबंध स्पर्धेत ४६ तर काव्यलेखन स्पर्धेत १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.निबंध स्पर्धेचे परीक्षण ॲड.सीमंतिनी नूलकर यांनी तर काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण डॉ राजेंद्र माने यांनी केले.स्पर्धेतील विजेते याप्रमाणे: प्रथम क्रमांक अश्विनी विनायक दिक्षित, द्वितीय क्रमांक अश्विनी अवधूत फडणीस, तृतीय क्रमांक अंजली जयंत डोंगरे, उत्तेजनार्थ अनिता बाबूराव जाधव, अपर्णा तुषार कांबळे,गीता विवेक नेर्लेकर,रागिणी हेमंत थत्ते, श्रेया श्रीपाद गोलिवडेकर,मीनल मिलींद सुर्वे,प्रेरणा संतोष कचरे.
याचवेळी संत एकनाथ षष्ठी निमित्त सांघिक अभंग गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.आठ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे परीक्षण ॲड अमित द्रविड व सौ सुनिता निंबकर यांनी केले.या स्पर्धेत माऊली महिला भजनी मंडळ, सुमंगल महिला भजनी मंडळ , महाकालिका भजनी मंडळ,श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसे मिळविली.स्वरध्यास या शालेय विद्यार्थी संघास प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
प्रास्ताविक संचालक डॉ शाम बडवे यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर, डॉ शाम बडवे यांनी केले.परिक्षकांचे वतीने ॲड सीमंतिनी नूलकर, डॉ राजेंद्र माने व ॲड अमित द्रविड यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यवाह सौ वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रागिणी जोशी तसेच कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

10/03/2025

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले)नगरवाचनालय ,सातारा यांचे वतीने संतश्रेष्ठ एकनाथ षष्ठी निमित्त सांघिक अभंग गायन स्पर्धा आयोजित करत आहोत.
स्पर्धेचे नियम व अटी याप्रमाणे :
१ स्पर्धा *गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता* पाठक हॉल,नगर वाचनालय येथे होईल.
२ प्रवेश शुल्क रु .५०/- प्रति संघ.
३ स्पर्धा स्त्रीया व पुरुष सर्वांसाठी खुली आहे.
४ एका संघात पाच गायक/गायिका व तबला आणि हार्मोनियम साथीदार असे एकूण जास्तीत जास्त सात सदस्य असतील.
५ स्पर्धकांनी केवळ संत रचनाच सादर करावयाच्या आहेत. जी रचना सादर करणार आहात त्याची एक प्रत सादरीकरणापूर्वी परीक्षकांना द्यावी. भक्तीगीत चालणार नाही.
६ सादरीकरण कालावधी : ५ ते ६ मिनिटे
७ साथीसाठी टाळ ,तबला व पेटी आवश्यक. साथीदारांची व्यवस्था आपापली करायची आहे.
८ *नांव नोंदणीचा अंतिम दिनांक १६ मार्च २०२५*
९ पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेनंतर लगेचच होईल.
१०परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
तरी जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग ग्रंथपाल नगरवाचनालय यांचेकडे नोंदवावा,असे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करणेत येत आहे.

नगर वाचनालयात महिला दिन साजराश्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे महिला दिनानिमित्त कर्तबगार ...
08/03/2025

नगर वाचनालयात महिला दिन साजरा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन असा कार्यक्रम संपन्न झाला
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य प्रमोदिनी मंडपे प्रसिद्ध कवयित्री शिल्पा चिटणीस यांचे शुभ हस्ते स्त्री आत्मकथन विषयक ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले याच ग्रंथप्रदर्शनात अभिवादन म्हणून दिवंगत लेखिका मीना प्रभू यांचे प्रवासवर्णन पर पुस्तकांचे प्रदर्शन ही आयोजित केले आहे
यावेळी वृद्धाश्रमातील समर्पित कार्याबद्दल सौ अंजली कुलकर्णी ,महिला मंडळ या जुन्या संस्थेच्या कार्याबद्दल नयना क्षीरसागर ,ग्रंथ चळवळीतील योगदानाबद्दल नंदा जाधव ,दिल्ली येथील साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड झाल्याबद्दल डॉक्टर आदिती काळमेख ,गिर्यारोहणातील साहसा बद्दल कुमारी धैर्या कुलकर्णी ,
सामान्य परिस्थितीतून संघर्ष करणाऱ्या
नगीना बागवान ,कोरोना काळात व महापूरपरिस्थितीत लेक लाडकी अभियानातून कार्य केलेल्या सिंधू कांबळे
संस्कार व स्रोत्र पठण उपक्रम कार्याबद्दल शोभना नातू
या महिलांचा या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला गेला .
यावेळी प्रमोदिनी मंडपे म्हणाल्या
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज सगळ्या महिला सक्षम झाल्या आहेत स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत तरीही अजून त्या सुरक्षित होणं गरजेचं आहे .
अजूनही रोज स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या येत असतात .महिलांना सुरक्षित वाटण गरजेचं आहे सातबारावर त्यांचं नाव येणे गरजेचे आहे घरावर त्यांच्या नावाची पाटी असायला हवी .त्यांचं आत्मभान जागृत करायचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं .छत्रपती जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना जी महिलांचा आदर करायची मानसिकता दिली सन्मान करायला शिकवलं ते सर्व स्त्रियांनी करायला पाहिजे .
यावेळी शिल्पाताई चिटणीस म्हणाल्या
'नगर वाचनालयातील अनेक पुस्तकांनी स्त्रियांनी उभा केलेला संघर्ष शिकवला
महिला दिन हा एक दिवसाचा नसतो तो वर्षभर मनात अंगीकारायला पाहिजे .
समाजाला स्त्रीच शिक्षित करू शकते .
यावेळी अंजलीताई कुलकर्णी ,नंदा जाधव ,नयना क्षीरसागर ,धैर्या कुलकर्णी
यांनी सत्काराला उत्तर म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना नगर वाचनालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लेखक डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले स्त्रियांनी स्त्रियांना सन्मान देणेही शिकले पाहिजे .स्त्रियांच्या एक वेगळा समर्पितभाव असतो त्याचबरोबर सहनशीलता ही स्त्रियांच्यात असते .स्त्री आणि पुरुष यांच्यात समजूतीचा पूल असणे गरजेचे आहे .स्त्री पुढील पिढीला संस्कार देते श्रद्धा शिकवते पण ते सजग असणेही गरजेचे आहे .स्त्रीमुक्ती म्हणजे चौकट भिरेकावणे नाही तर ती सजग बनवणे आहे .लोकसाहित्यातून स्त्रीची ही सजगता जाणवून येते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता प्रभुणे यांनी केले .कार्यक्रमाचे आभार कवी प्रदीप कांबळे यांनी मानले .
यावेळी नगर वाचनाचे अध्यक्ष अजित कुबेर आणि अनंत जोशी यांचे हस्ते प्रमोदिनी मंडपे आणि शिल्पाताई चिटणीस यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नगर वाचनालयाचा स्त्रीकर्मचारी रूपा मुळे , भाग्यश्री शिंदे , अन्वेषा कलेढोणकर यांचा व संचालक बानुबी बागवान यांचा ही महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला .
यावेळी डॉ. श्याम बडवे ,विजयराव पंडित ,प्राध्यापक श्रीधर साळुंखे ,गौतम भोसले आनंद ननावरे संजीव बोंडे , विष्णू धावडे , वेदान्त कारवे , विजय दळवी वगैरे मान्यवर उपस्थित होते .

Address

Satara
415001

Telephone

+912162282488

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category