Government ITI Sangli Official

Government ITI Sangli Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Government ITI Sangli Official, Government Organization, Sangli.

31/08/2026
13/08/2026

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन कॅप राऊंड आणि ऑनलाईन कौन्सिलिंग राऊंड नंतर शिल्लक असलेल्या जागांसाठी दिनांक १७/०८/२०२६ ते २१/०८/२०२६ पर्यंत संस्था स्तरावरील समुपदेशन फेरी दररोज सकाळी १० ते त्या दिवशी सकाळी हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांचे मेरीट नुसार प्रवेश पुर्ण होईपर्यंत चालु राहील.
अद्याप ज्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी नव्याने अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.तरी सर्व प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरुन तो संस्थेत जमा करण्यासाठी आपल्या मुळ कागदपत्रांसह जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावे.
अधिक माहिती साठी संस्थेतील माहिती आणि मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक 9421955506
7744064007

02/08/2026
19/06/2026

*वयाच्या ५ - ६ वर्षांनंतर मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो.कारण या वयापर्यंत मुलाच्या बुद्धीचा विकास इतका विकास झालेला असतो की तो वर्ग शिक्षकांनी सांगितलेलं आणि शिकवलेलं समजू शकतो.*

*पुढील १० वर्षे म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत अर्थात मुलांच्या वयाच्या १५ - १६ पर्यंत बुद्धीविकासात वृद्धि होत होत तो आपले भलेबुरे कशात आहे याविषयी तर्क लावू शकतो, स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकतो.म्हणुन वयाच्या १५ - १६ वर्षानंतर किंवा इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्या नंतर त्याला महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.*
*या दोन्ही टप्प्यात (० ते ५ - ६ वर्षापर्यंतचा पहिला टप्पा आणि ५ - ६ ते १५ - १६ पर्यंतचा दुसरा टप्पा.) त्यांच्यावर आई वडिलांचे नियंत्रण असते आणि दुसऱ्या टप्प्यात आई वडीलां बरोबरच गुरूजनांचे नियंत्रण असते.त्यामुळे या वयातील मुलांना आई वडील आणि शिक्षकांकडुन सुसंस्कार दिले जातात.*

*महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या मुलांवर कसलेही नियंत्रण आणि बंधनं नसतात. त्यामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,नम्रता, आदरभाव आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या भविष्यातील प्रगती विषयी निश्चित असे लक्ष (टार्गेट) नसते.त्या मुळे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन लाखो बेरोजगारांची फौज दरवर्षी बाहेर पडते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.*

*यावर एकच उपाय आहे तो म्हणजे फार मोठ्या प्रमाणात रोजगार, स्वयंरोजगार आणि रोजगारा बरोबरच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणारे व्यवसाय शिक्षण अर्थात टेक्निकल एज्युकेशन आजच्या काळाची गरज आहे.*
*व्यवसाय शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षणात तंत्र शिक्षण (टेक्निकल), इयत्ता दहावी नंतर आय.टी.आय., अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (इंजिनिअरिंग डिप्लोमा) आणि अभियांत्रिकी पदवी (इंजिनिअरिंग डिग्री) यांचा समावेश होतो.*
*आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वरील अभ्यासक्रमांपैकी आय.टी.आय.च्या प्रशिक्षणाला अतिशय महत्व आणि फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे.कारण कृत्रिम बुद्धिमत्ताजे करु शकत नाही ते प्रत्यक्षात करणे आवश्यक आहे असे कौशल्यपूर्ण काम आय.टी.आय. मध्ये प्रशिक्षीत विद्यार्थीच करु शकतो.*

*आय.टी.आय.चे यशस्वी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना खाजगी , निमसरकारी तसेच सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तो लहान मध्यम मोठा उद्योग सुरू करु शकतो.*
*जगातील जपान जर्मनी,आखाती देश,ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि अनेक युरोपीयन. देशानां कौशल्ययुक्त मनुष्यबळाची फार आवश्यकता आहे तेथेही आय. टी. आय.चे विद्यार्थी आपले करीअर घडवू शकतात.*

*वरील सर्व बाबींचा विचार करता आजच्या आधुनिक युगात आय.टी.आय.च्या प्रशिक्षणाला पर्याय नाही.*

*प्रगतीचा खरा एकच मार्ग,*
*ITI चे कौशल्य प्रशिक्षण वर्ग.*

_*कौशल्य असेल*_             _*तरच*__*करीअर घडेल.*_*पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपल्या दोन ते पाच वर्षाचा वेळ, पै...
16/06/2026

_*कौशल्य असेल*_
_*तरच*_
_*करीअर घडेल.*_

*पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपल्या दोन ते पाच वर्षाचा वेळ, पैसा,श्रम वाया घालवून स्वतःला बेरोजगार म्हणून हिणवून घेणे, मनस्वास्थ्य बिघडवून घेणे आजच्या ए.आय. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात परवडणारे नाही.*

*मग विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे?*
*१०० टक्के नोकरी /रोजगार आणि स्वयंरोजगाराची हामी देणारं आय.टी.आय. मधील एक किंवा दोन वर्षाच्या कोणत्याही एका व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन कुशल तंत्रज्ञ बनलेल्या प्रशिक्षणार्थीनां झटपट नोकरी, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारे आणि नोकरी करत स्वतः कमवत असतानाच पुढील शिक्षण घेण्याची सोय आणि संधीचा फायदा घेऊन नामांकित कंपनी मध्ये मॅनेजर ते स्वतः उद्योजक बनण्यापर्यंत मजल गाठू शकेल असं कौशल्ययुक्त प्रशिक्षण घेणे हीच काळाची गरज आहे हे ओळखून आपल्यासाठी, आपल्या पाल्यासाठी योग्य मार्ग निवडा.*
*या वर्षी आय.टी.आय.चा फॉर्म भरून आपल्या पसंती, गुणवत्ता आणि सामाजिक आरक्षणामधुन मिळणाऱ्या कोणत्याही एका व्यवसायत प्रवेश घ्या आपले भविष्य सुरक्षित करा.*
*धन्यवाद.*

Address

Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Government ITI Sangli Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share