10/03/2026
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक, कवयित्री आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील अनिष्ट प्रथा, अज्ञानाचा अंधकार मोडून काढला. पुण्यातील भिडेवाड्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी महिला आणि दलितांच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त केला.