समता अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय व माहिती केंद्र

  • Home
  • India
  • Sangamner
  • समता अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय व माहिती केंद्र

समता अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय व माहिती केंद्र ग्रामीण भागातील तरुणांनी गावाच्या वैचारिक विकासासाठी सुरु केलेली संस्था आहे.

समता, अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय व माहिती केंद्र, देवगाव हे एक ग्रामीण भागातील तरुणांनी गावाच्या वैचारिक विकासासाठी सुरु केलेली संस्था आहे. ही संस्था सुरु होण्यामागे प्रविण शिंदे, विजय लामखडे, किरण देशमुख, रवींद्र लामखडे, अनंत शिंदे, सागर कोल्हाळ, राणी पावसे, माधुरी लामखडे, भाग्यश्री कोटकर, राहुल लामखडे, मुकुंद शिंदे, शंकर पावसे या व इतर अनेक तरुणांचा मोलाचा वाट आहे. तरुणांच्या कामाला संजय दे

शमुख, माधव लामखडे, संतोष शिंदे, ज्ञानेश्वर लामखडे या ग्रामस्थांनी मोठे पाठबळ दिले. तत्कालीन ग्रामसेवक निकम भाऊसाहेब यांनी देखील ग्रामपंचायत प्रशासकीय पातळीवर खूप मदत केली. सर्वात महत्वाचे, उल्लेखनीय योगदान हे डॉ. संदीप अरगडे या तशा अर्थाने देवगाव बाहेरील असलेले परंतु देवगावमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे आणि देवगावला स्वतःचे गाव मानून गावात सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहणाऱ्या या व्यक्तिमत्वाचे. सर्वात प्रथम त्यांच्या स्वतःच्या योगदानातूनच ग्रंथालयाला १,००० रुपयांची पुस्तके मिळाली. सोबतच त्यांनी त्यांचे मित्र शिक्षक व पत्रकार संदीप सातपुते यांचीही २,००० रुपयांच्या पुस्तक स्वरूपातील मदत मिळवून दिली.
या संस्थेच्या प्रारंभामागे राष्ट्र सेवा दल - छात्रभारतीच्या विचारांची प्रेरणा आहे हे देखील नमूद करणे गरजेचे आहे. कारण कोठेही लोकवर्गणीतून जेंव्हा असे काही काम करण्याची वेळ येते तेंव्हा तरुणांमध्ये कामातील चिकाटी, जनसमुदायाशी संवाद करत त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांचे योगदान मिळवणे आणि हातात घेतलेले काम पूर्ण करने यासाठी लागणारी तयारी या सामाजिक संघटनांमुळेच झाली. या सर्व वैचारिक ठेव्यामुळेच "समता टीम" नावाने काम करणारे हे तरुण गावातील शिक्षण, विकास, पारदर्शिता, सर्वसमावेशकता या मुद्द्यांवर सातत्याने काम करत आहेत. समता टीमचे प्रत्येक सप्ताहात रविवारच्या दिवशी अभ्यास मंडळ होते, ज्यामध्ये समाजातील विविध सामाजिक प्रश्नांची निवड करून त्यावर मुक्त चर्चा, पुस्तकांचे वाचन केले जाते. ग्रामसभेमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी देखील या तरुणांचा कायम प्रयत्न सुरु असतो. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल अशा विविध मार्गांचा प्रभावी वापर व्हावा यासाठी देखील ते आग्रही आहेत. गावातील अनेक कुटुंबांना व्यसनांचा फटका बसत असल्याने व्यसन बंदीसाठी देखील प्रखर भूमिका हे तरुण घेतात या भूमिका घेताना प्रसंगी अनेक वेळा जेष्ठांचा दबाव, धमक्या यांचाही सामना ते करतात.

Address

देवगाव, तालुका/संगमनेर, जिल्हा/अहमदनगर
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when समता अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय व माहिती केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to समता अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय व माहिती केंद्र:

Share

Category