देवगाव - Deogaon

देवगाव - Deogaon अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील देवगाव.

आपल्या गावासाठी अभिमानाची बातमीदेवगावचे नागरिक बाळु लहानु वाकळे यांची कन्या सोनाली बाळु वाकळे हिची ठाणे शहर पोलीस दलात न...
11/04/2026

आपल्या गावासाठी अभिमानाची बातमी

देवगावचे नागरिक बाळु लहानु वाकळे यांची कन्या सोनाली बाळु वाकळे हिची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे.

सोनालीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, अनेक अडचणींचा सामना करत शिक्षण घेतले आणि हे यश मिळवले आहे. तिच्या या यशात तिच्या कुटुंबाचाही मोलाचा वाटा आहे.

सोनालीच्या या यशाने संपूर्ण गावाचा सन्मान वाढवला आहे. तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐

#देवगाव #शिक्षण

देवगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम  #देवगाव
26/03/2026

देवगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम

#देवगाव

' रस्ता नाही, तर मतदान नाही '; देवगाव ग्रामस्थांचा निर्धार #देवगाव  #रस्ता  #विकास  #आंदोलन  #मतदान  #संगमनेर
31/10/2025

' रस्ता नाही, तर मतदान नाही '; देवगाव ग्रामस्थांचा निर्धार

#देवगाव #रस्ता #विकास #आंदोलन #मतदान #संगमनेर

माझा गाव असा !त्याचा कारभार कसा?स्वतःच ग्रामपंचायतीचं प्रगती पुस्तक तपासा- गाव कारभारात सुधारणा करा!
23/09/2025

माझा गाव असा !
त्याचा कारभार कसा?

स्वतःच ग्रामपंचायतीचं प्रगती पुस्तक तपासा- गाव कारभारात सुधारणा करा!

देवगावमधील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, कोटकर वस्ती शाळा, डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय यांना मुलांच्या सुरक्षेबाबत उ...
24/08/2024

देवगावमधील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, कोटकर वस्ती शाळा, डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय यांना मुलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे लेखी पत्र दिले आहे.

--------------------------------------

प्रति,

विषय - शाळा/अंगणवाडीमधील मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणेबाबत...

महोदय,
महाराष्ट्रातील बदलापूरमधील शाळकरी मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने सर्वच पालकांची काळजी वाढली आहे. पालक अत्यंत विश्वासाने आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. मात्र आता मुलं शाळेतच सुरक्षित नसल्याची भावना तयार झाली आहे. याला काही कारणंही आहेत. पालक मुलांना ज्या शाळेत काही तास पाठवतात, तेथे कोण येतं, त्यांच्या मुलांसोबत काय करतं याबाबत अनभिज्ञता असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूरची घटना अशा अत्याचाराची पहिली घटना नाही. याआधीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र, असं असूनही मुलांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हे मुलांच्या सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष आहे. किमान बदलापूर घटनेनंतर तरी आपण जागृक होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.

स्वतः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत ५ टक्क्यांची तरतुद केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि शाळांनी मिळून तातडीने यावर अंमलबजावणी करावी. या मागणीनंतरही या उपाययोजना झाल्या नाही आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड होऊन कोणताही अनुचित प्रकार घडला तर याला संबंधित शाळा आणि ग्रामपंचायत जबाबदार असेल आणि सजग नागरिकांचा सर्वाधिक आक्रोश त्यांच्यावरच व्यक्त होईल, याची कृपया नोंद घ्यावी.

कळावे,

सजग नागरिक मंच, देवगाव
प्रवीण शिंदे, सुरज रोहम, कुणाल रोहम, संजय देशमुख, कोटकर गणेश, विजया रोहम, प्रमोद शिंदे, सुनिल लामखडे, शंकर कोटकर, अरविंद कोटकर, अंबादास कोटकर, मुकुंद शिंदे, वैभव नालकर, संतोष सोनवणे, रविंद्र लामखडे, विशाल पावसे, संतोष पानसरे, संतोष पानसरे, माधुरी लामखडे, वैभव कोटकर, शंकर पावसे, एकनाथ कोटकर, गणेश पावसे, सोमेश्वर कोटकर, सोमनाथ भवर, रेवन शिंदे, वनिता बस्ते, चेतन पावसे, रवी रोहम, सुनिता शिंदे, सुरेश रोहम, संतोष देशमुख, अनंत चत्तर

देवगावातील झाडांच्या संरक्षणासाठी सुरू असलेली महत्त्वाची चर्चा आवर्जून वाचा...DP चं स्ट्रक्चर अशा ठिकाणी उभं केलं आहे की...
09/08/2024

देवगावातील झाडांच्या संरक्षणासाठी सुरू असलेली महत्त्वाची चर्चा आवर्जून वाचा...

DP चं स्ट्रक्चर अशा ठिकाणी उभं केलं आहे की ज्यामुळे पुढील काही दिवसात DP च्या पुढचे आणि मागचे दोन्ही गुलमोहराची झाडं तोडायला लागेल.

DP ची जागा ठरवताना हे लक्षात यायला पाहिजे. ग्रामपंचायतीने ताबडतोब या कामाकडे लक्ष द्यावे.

(ठिकाण - बंधाऱ्याजवळ, मुकुंद शिंदे यांच्या घराकडे जाताना तिथल्या बांधापाशी)

- शंकर पावसे

कृपया ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घ्यावी.
मुलांनी मोठ्या कष्टाने झाडं लावलेली आहेत. ग्रामपंचायतने प्रत्येक कामातच नियोजन शून्यता दाखवणे अपेक्षित नाही.

- Ravindra Lamkhade

DP उभी करण्याआधी संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतशी चर्चा करून जागेची निश्चिती केली होती का❓

ही जागा ग्रामपंचायतने सुचवली आहे का❓

या ठिकाणी झाडे असूनही ग्रामपंचायतने जागा सुचवली असेल तर वाईट निर्णय आहे❓

या कामासाठी किती जागांचा विचार केला गेला❓

सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तातडीने या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करावी.

- प्रविण सिंधू भिमा शिंदे

उपसरपंच सुनील नाना, गा्मस्थ, शंकर शिंदे, भाऊराव पावसे यांनी निश्चित करून दिलेली आहे. ती जागा सुचवली कारणं तेथील शेतकरी सहकार्य करीत नाही. डी.पी. जागा देण्यासाठी झाडांचा विचार करुनच त्यांनी दिलेली आहे. ते झाड तोडण्याची वेळ येणार नाही असं सांगितलं आहे. तसं संबंधीत काम करणारे कर्मचारी बोलले आहेत. झाडांची अडचण होणार नाही. तुम्हाला काही संबंधीत विषयावर शंका असेल, तर ग्रामपंचायतमध्ये या. या विषयावर चर्चा करू🙏

- अर्चना लामखडे (सरपंच, देवगाव)

झाडांची अडचण लहान असताना होणारच नाहीये. परंतु येत्या काही वर्षांमध्ये झाडं मोठी झाली की ती कायमच तोडली जातील.
झाडांमुळे लाइन देखील ट्रिप होत राहणार. या बाबींचा शाश्वत पद्धतीने विचार व्हायला हवा.

- रविंद्र लामखडे

ओके, सरपंच आणि ग्रामपंचायत देवगावने या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला आणि ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्यावर भूमिका देखील स्पष्ट केली यासाठी मनापासून धन्यवाद.

जोपर्यंत झाडं सुरक्षित आहेत तोपर्यंत आमची काहीही हरकत नाही. मात्र भविष्यात झाडांची वाढ होऊन झाडे तोडण्याची नामुष्की आली, तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि झाडांसाठी वेळप्रसंगी आपला संघर्ष देखील होईल एवढंच अधोरेखित करतो.

Shankar Pawase Patil यांनी DP बसवतानाच भविष्यातील शक्यता आणि झाडांचे नुकसान होईल हे लक्षात आणून दिल्याचे एक अधिकृत पत्र ग्रामपंचायत देवगावला देऊन ठेवा. त्याची पोहच घ्या. भविष्यात हा लेखी पत्र व्यवहार महत्त्वाचा असेल.

- प्रविण सिंधू भिमा शिंदे

गावातील शंकर शिंदे, भाऊराव पावसे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अस लक्षात आले आहे की, लाईन आणतानाच खूप अडचणी आल्या, लोक ओढ्यामध्ये देखील आपला हक्क दाखवायला लागले, कोणी व्यक्तिगत भांडायला लागले, त्यामुळे ती जागा निवडली.

भाऊ आणि शंकररावचं म्हणणं असं आलं की, ओढ्यात उभे केलेले पोल लोकांनी परत उपसायला लावले. ही योजना 24 तास लाईट असलेली लाईनची आहे, यात गावाचा भविष्यात फायदा होईल. लोकं समजून घेत नाही. खूप अडचणीमधून ही लाईन आणलेली आहे.

त्यांनी आश्वासित केलं आहे की, इथुन पुढे पूर्ण विचार करून निर्णय घेतला जाईल.

- शंकर पावसे

ही २४ तास वीज देणारी लाईन नक्कीच महत्त्वाची आहे. त्यासाठी हे सर्व लोक करत असलेल्या प्रयत्नांचे आपण सर्वांनीच कौतुक केले पाहिजे आणि या कामात सहकार्य देखील केले पाहिजे. त्यांनी चर्चा करून दिलेल्या आश्वासनासाठी मनापासून धन्यवाद.

महत्त्वाचं

आपल्याकडे सार्वजनिक मालकीच्या जागांवर हक्क सांगणारे अनेक आहेत. त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जो कुणी अशा जागेवर दावा करेल त्याला जमिनीचे नकाशे, हद्द आणि ७/१२ घेऊन ते सिद्ध करायला लावणे. जर कुणी हे सिद्ध केले तर त्या व्यक्तीची मालकी मान्य करावी आणि असं सिद्ध करता आले नाही, तर दावा फेटाळून त्या जागेवर काम करावे. वेळप्रसंगी पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन यांचीही मदत घेता येईल.

काही दिवसांपूर्वी दत्त मंदिराच्या शेजारील जागेत मंदिराला जोडून प्रशस्त स्वच्छता गृह बांधताना देखील असेच दावे केले गेले आणि काही प्रमाणात काम होऊनही जागा बदलण्यात आली. हे प्रकार थांबले पाहिजे.

- प्रविण सिंधू भिमा शिंदे

हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत जाणार आहे. त्यावर उपाय म्हणजे गावच्या ओढ्याची हद्द निश्चित करणे खूप गरजेचे आहे. ओढ्याच्या कडेला शेतजमीन असणे म्हणजे ओढा आमच्या पूर्ण मालकीचा असा अट्टाहास सोडायला पाहिजे. लोक ओढ्याच्या वाळूवरदेखील हक्क दाखवतात.

- शंकर पावसे

मग ग्रामपंचायतने ओढ्याची हद्द निश्चित करावी, अशी मागणी करणारे लेखी निवेदन द्याल. आपण याचा पाठपुरावा करू.

बाकी वाळूवर महसूल खात्याचा कायदेशीर अधिकार असतो. त्यामुळे अशी कोणतीही परवानगी न घेता वाळू उचलणे आणि हक्क नसताना त्यावर मालकी हक्क सांगणे दोन्ही चुकीचे आहे. बेकायदेशीर वाळू उचलण्याचे समर्थन करण्यात अर्थ नाही. उलट यानिमित्ताने वाळू उपसा होत नाही हे बरं.

- प्रविण सिंधू भिमा शिंदे

देवगाव ग्रामपंचायतला कळविण्यात येते कि, काल संध्याकाळी 7:00pm च्या सुमारास माझे चुलते अमोल लामखडे यांच्या घरासमोर वाघ ये...
02/08/2024

देवगाव ग्रामपंचायतला कळविण्यात येते कि, काल संध्याकाळी 7:00pm च्या सुमारास माझे चुलते अमोल लामखडे यांच्या घरासमोर वाघ येऊन गेला आणि घरातील सर्वांनी वाघ बघितला होता. मात्र गाईच्या वासराने वाघाच्या हालचाली व वाघाचे गुरकणे बघितल्यानंतर वासरू फार घाबरले. वासराचा BP कमी झाला आणि वासरू दगावले, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.आत्ता ते वासरू या जगात नाही.

लामखडे वस्तीत माझ्या आज्जीवर हल्ला ही पहिली घटना आहे. अमोल लामखडे यांचे वासरू दगावणे ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे माझी चुलत बहीण पुनम अमोल लामखडे ही वाघाला बघून फार घाबरली आहे. तिचे अजुनही हातपाय लटलट करताय. विशेष म्हणजे पुनमचे भीतीने जेवण सुद्धा कमी झाले आहे, असे तिच्या आईने सांगितले.

माझे दुसरे चुलते शिवाजी लामखडे यांच्या घराच्या पढवीत परवा संध्याकाळी वाघ येऊन शांत बसला होता. तेव्हा वाघाला बघून घरातील माझ्या चुलत भावा - बहिणींनी घाबरून दरवाजा आतून बंद केला.आणि घरामध्येच शांत बसले. ही तिसरी घटना आहे.

तसेच 3 दिवसांपूर्वी पावसे वस्तीवर माझ्या क्लासची विदयार्थिनी आश्लेषा सोमनाथ सिनारे हिने तिच्या मामाच्या घराच्या अंगणात (दिलीप पावसे यांचा घरी ) वाघ बघितला. ही गावातील तिसरी घटना आहे. ती मुलगी छोटी असल्याने फार घाबरलेली आहे. ती मुलगी अगदी घराच्या बाहेर पडायला देखील घाबरत आहे. आणि भीतीने ती सारखी रडते. या सर्व भीतीग्रस्त घटनांवर नक्की काहीतरी तात्काळ फरक परडणारी उपाययोजना ही वन अधिकाऱ्यांना भेटून घ्यायला हवी. आणि गावातील प्रत्येक वस्तीवर पिंजरे कसे उपलब्ध करता येतील, याचे आर्थिक नियोजन वन विभागाने करायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

यावर सर्वांनी आपले मत नक्की नोंदवा, म्हणजे ग्रामपंचायत ला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.

- माधुरी लामखडे

📣 ग्रामसभादेवगाव येथील सर्व नागरिकांना  कळविण्यात येते की आपल्या ग्रामपंचायत देवगावची ग्रामसभा 26/1/2024 रोजी सकाळी ठीक ...
25/01/2024

📣 ग्रामसभा

देवगाव येथील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या ग्रामपंचायत देवगावची ग्रामसभा 26/1/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी हजर राहावे ही विनंती.

- सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत देवगाव

देवगाव परिसरातील वाघाच्या हल्ल्यांबाबत नागरिकांचा पत्रव्यवहार...
24/01/2024

देवगाव परिसरातील वाघाच्या हल्ल्यांबाबत नागरिकांचा पत्रव्यवहार...

रात्री उशिरा सुमारे १ वाजता शांताबाई महादू भवर यांच्या ४ शेळ्या वाघाने खाल्या आहेत. गावातील ग्रामस्थांनी आपल्या पाळीव प्...
24/01/2024

रात्री उशिरा सुमारे १ वाजता शांताबाई महादू भवर यांच्या ४ शेळ्या वाघाने खाल्या आहेत. गावातील ग्रामस्थांनी आपल्या पाळीव प्राण्यांचे वाघापासून संरक्षण करण्याबाबत काळजी घ्यावी. ग्रामपंचायतने पाठपुरावा करून गवळीवस्तीमध्ये पिंजरा लावला आहे. गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. 🙏

#देवगाव #वाघ #वनविभाग

बऱ्याच दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या देवगावमधील मंगल कार्यालय/सभा मंडपाच्या कामासाठी निधी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागल...
10/01/2024

बऱ्याच दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या देवगावमधील मंगल कार्यालय/सभा मंडपाच्या कामासाठी निधी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. देवगाव ग्रामपंचायत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून २० लाख रुपये निधी मंजुर झाला आहे.

याबद्दल देवगाव ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ देवगाव आभारी आहेत. या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत देवगावचे मनःपुर्वक धन्यवाद. 💐

ईव्हीएमच्या प्रात्यक्षिक मार्गदर्शनासाठी इलेक्शन कमिशनची ट्रेनिंग टीम बुधवार, दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० व...
09/01/2024

ईव्हीएमच्या प्रात्यक्षिक मार्गदर्शनासाठी इलेक्शन कमिशनची ट्रेनिंग टीम बुधवार, दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता देवगावमध्ये येणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे.

ठिकाण - देवगाव फाटा

Address

Deogaon
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when देवगाव - Deogaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to देवगाव - Deogaon:

Share