20/03/2026
काही लोक कमी बोलून जास्त प्रभाव का टाकतात.
जगात दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक सतत बोलत असतात. प्रत्येक विषयावर मत देतात, प्रत्येक चर्चेत उडी मारतात, आणि काही वेळाने त्यांचे शब्द हलके वाटायला लागतात. आणि काही लोक असतात जे फार कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा सगळे लक्ष देऊन ऐकतात. कारण शांत राहण्यामध्ये एक वेगळीच ताकद असते. मानसशास्त्र सांगते की माणूस शांत व्यक्तीकडे नैसर्गिकपणे जास्त लक्ष देतो. कारण मेंदूला गोंगाटापेक्षा गूढता जास्त आकर्षित करते. जे लोक सतत बोलतात त्यांच्याबद्दल आपण पटकन अंदाज लावतो. पण जे लोक कमी बोलतात त्यांच्याबद्दल कुतूहल तयार होतं. आणि कुतूहल म्हणजे प्रभावाची सुरुवात. सायलेंस तुम्हाला एक मोठा फायदा देतो निरीक्षण. जास्त बोलणारा माणूस माहिती देतो. शांत माणूस माहिती गोळा करतो. तो लोकांचा टोन, शब्द, वागणूक, प्रतिक्रिया सगळं लक्षात ठेवतो. त्यामुळे त्याचे निर्णय जास्त अचूक होतात.
खरं पाहिलं तर सायलेंस ही कमजोरी नाही. ती कंट्रोलची खूण आहे.
ज्याला स्वतःवर आणि परिस्थितीवर विश्वास असतो त्याला सतत बोलून स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तो योग्य क्षणाची वाट पाहतो म्हणून काही लोक खोलीत आले की वातावरण बदलतं. त्यांनी अजून काही बोललेलं नसतं, पण त्यांची उपस्थिती जाणवते. कारण प्रभाव हा आवाजातून नाही, तर उपस्थितीतून तयार होतो.
कधी कधी सर्वात ताकदवान संवाद हा शब्दांमध्ये नसतो.
तो शांततेत असतो.