23/08/2024
भाजपा महिला मोर्चा संगमेश्वर (उ.) तालुक्याच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संगमेश्वर तालुक्यातील कडवई जि. प. गटातील कडवई, धामणी, चिखली, शेनवडे वाड्यावस्त्यांवर जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला आणि भाजपा पुरस्कृत महायुती शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी माहिती देत विरोधकांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या अपप्रचाराला बळी पडून योजनेच्या लाभापासून वंचित न रहाण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे यांनी उपस्थित राहून उत्तम मार्गदर्शन व सहकार्य केले.
शेनवडे येथे मा. शिक्षण सभापती तथा ओबीसी समाजात प्रभाव असलेले भाजपा नेते श्री. सहदेव बेटकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश आंबेकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. शीतलताई दिंडे, जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूराताई मुळ्ये, तालुका उपाध्यक्षा सौ. सुमनताई झगडे, श्री. प्रशांत रानडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#महिला_मोर्चा #महिलाशक्ती #संगमेश्वर_विधानसभा #कमलमित्र