महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , रत्नागिरी - MCED Ratnagiri

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , रत्नागिरी - MCED Ratnagiri

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , रत्नागिरी - MCED Ratnagiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , रत्नागिरी - MCED Ratnagiri, Government Organization, DIC OFFICE, Ratnagiri.

     #अनन्याची_डायरी पृथ्वीची कहाणी :- माझा ग्रह : माझे घरmusic credit:-.comCourtesy:-@डॉ. आनंद आंबेकर, असीमितचे सारंग ओ...
05/03/2022



#अनन्याची_डायरी

पृथ्वीची कहाणी :- माझा ग्रह : माझे घर

music credit:-.com

Courtesy:-@डॉ. आनंद आंबेकर, असीमितचे सारंग ओक, अनुनादच्या पूजा खांडेकर, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि लायन्स क्लबचे गणेश धुरी, अभिजीत गोडबोले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने हे प्रदर्शन प्रथमच रत्नागिरीत भरवण्यात आले आहे. पृथ्वीची भौगोलिक रचना व जैवविविधता यांचे चित्रांद्वारे व माहिती दिली जात आहे. हे प्रदर्शन सहआयोजक गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, निसर्गयात्री संस्था आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान आणि पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, पृथ्वी आणि तिचे विश्वातील महत्त्व त्यांच्या लक्षात यावे, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

तसेच सादरीकरण करणाऱ्या मुलांनी सुद्धा उत्तम सादरीकरण करून जास्तीत जास्त माहिती प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पाहुण्यांना-मुलांना करून दिली यासाठी या मुलांचं खरोखरच खूप खूप कौतुक!

गौरी शाम गोडबोले, प्रणव संजय चव्हाण, ओमकार श्रीराम ठाकूरदेसाई, मिसबाह नदीम शिरगावकर, ज्योती टेरवकर, दिनाल तळेकर, सुरज संतोष चव्हाण, सौरभ दादासो गडदे, यश पूजा शंकर सुर्वे, सेजल अभिजीत पंडितराव, संस्कृती दीपक तुळसणकर, मैथिली योगेश वारसे, दिव्यांशू संजय नंदनवार, सानिका सुनिल पवार, ऋषिकेश जयवंत घोळसे, सारंग धनपाल चांदुरकर, अक्षय सतीश पाटील, मानसी वायंगणकर, प्रणाली विजय कुळे, आदिती संजय खानोलकर, आकांक्षा अरुण घाग, आदित्य अनिल नलावडे, श्रेयस बाचरे, स्नेहल पुरुषोत्तम कोकणी, ऋषिकेश आचार्य

मित्रांनो तुमच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!💐

#अनन्याची_डायरी पृथ्वीची कहाणी :- माझा ग्रह : माझे घरmusic credit:-.comCourtesy:-@डॉ. आनंद आंबेकर, असीमितचे सारंग...

27/02/2022



#अनन्याची_डायरी





मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान आठशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले.

पण आता मात्र परिस्थिती बदलत चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर म्हणून ही कविता सादर केली आहे. आपण आपल्या भाषेविषयी संकोच न बाळगता कोणताही न्यूनगंड ठेवता, ताठ मानेने आपली भाषा जपली पाहिजे. आपण यापुढे आपली भाषा जोपासण्याचा, संवर्धन करण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न कराल अशी आशा आहे.

Music credit:- Shri Inamdar
Poem Credit:-@ दादासाहेब गोवर्धन भास्करराव वाघ

15/02/2022

आम्हाला कळविण्यास आनंद होत आहे कि पुन्हा एकदा आम्ही आमचे हे पेज सक्रिय करत आहोत व इथून पुढे आपल्याला सर्व कार्यक्रमांची माहिती आम्ही या पेजवर प्रसारित करू तरी आपण त्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईक किंवा होतकरू मुलांना त्याची माहिती द्या जेणेकरून त्यांच्या उत्कर्षात तुमचा सहभाग नोंदवला जाईल व नवीन उद्योजक आपल्याला घडवता येतील.

अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी १८ दिवशीय निःशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम ( REDP )कालावधी : २९ सप्टेंबर २०१...
15/08/2018

अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी १८ दिवशीय निःशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम ( REDP )
कालावधी : २९ सप्टेंबर २०१८ ते १६ ऑक्टोबर २०१८
अधिक माहितसाठी संपर्क महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी.

०२३५२ - २२१९८८

15/08/2018
आपला प्रवेश आजच निश्चित करा!
04/08/2018

आपला प्रवेश आजच निश्चित करा!

24/07/2018

अशा अनेक छोटया-मोठया उद्योग व्यवसाय प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला जरूर लाइक करा.

24/07/2018

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्था आहे.

MCED ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची १ ऑक्टोबर १९८८ रोजी स्थापना झाली असून, संस्था नोंदणी अधिनियम १९६० अन्वये आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत आहे.

या संस्थेचे मुख्य कार्यालय औरंगाबादला असून, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी स्वतंत्र विभागीय कार्यालय तर जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्हयात जिल्हा उद्योग केंद्रात संस्थेचे आणि उद्योजकता संबंधीचे उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचा प्रकल्प अधिकारी आणि त्याच्या मदतीला सहाय्यक असतो.

तसंच तालुका स्तरावर कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यक्रम आयोजक असतात. १९८८ पासून संस्थेने स्वयंरोजगार आणि उद्योजकता क्षेत्रात जवळपास १० लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. राज्यात उद्योजकतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून संस्थेमार्फत ‘उद्योजक’ हे मराठी मासिक प्रसिद्ध केलं जातं.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील अनुभव, तज्ज्ञ प्रशिक्षकांची उपलब्धता, पोर्टल नोंदणी माध्यमातून नोंदणीकृत नामांकित व व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षक आणि संस्थेचे नेटवर्क इ. व्यवस्थापनाचा प्रस्तुत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत उपयोग करून घेण्यात येतो.

एमसीईडीचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – (ईडीपी)

उद्योग आणि उद्योजकता या दोन भिन्न बाबी आहेत. स्वभावत:च उद्योजकता असलेली व्यक्ती त्याने स्वत: ठरवले तर उत्कृष्ट उद्योजक बनू शकतो. उद्योजकता विकसित व्हावा असा प्रयत्न केला जातो. उद्योग व्यवसाय हे तीन प्रकारचे असतात.

१. सेवा, २. व्यापार, ३. उद्योग, ईडीपी (एऊढ) हा विशेषत: उत्पादनाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणा-यासाठी अत्यंत उपयुक्त कार्यक्रम ठरत आहे. कार्यक्रमाचा कालावधी ६ आठवडे (३४ दिवस) दररोज किमान ३ तास अशा प्रकारे दुपारी किंवा संध्याकाळची बॅच असते.

कृषी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (एईडीपी)

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, दुग्धव्यवसाय, विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयातर्फे एक महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमधून कृषी पदवीधर, दहावी पास किंवा नापास, बारावी पास बेरोजगार तरुण यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मितीची तयारी करून घेतली जाते.

स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम (डीपीएसई)

हा कार्यक्रम शहरी किंवा ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुरस्कृत केलेला आहे. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे प्रामुख्याने पंतप्रधान रोजगार योजना, सुशिक्षित बेरोजगार योजना इ. योजना राबवल्या जातात. या कार्यक्रमाद्वारे या योजनांसाठी लाभार्थी निर्माण करणे आणि त्यांना स्वयंरोजगाराचे माध्यम निर्माण करून देणे हा हेतू आहे.

किमान २५ हजार रुपये ते ५० हजार रुपये गुंतवणुकीचे उद्योग व्यवसाय तरुणांनी उभारावेत यासाठी आवश्यक ती माहिती, उद्योगाची निवड, कर्जाच्या योजना, बाजारपेठ पाहणी, विक्री कौशल्य, व्यवस्थापन इ. व्याख्याने आयोजित केली जातात.

पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत प्रशिक्षण

» तंत्रशिक्षणावर आधारित उद्योजकता विकास

» व्यवस्थापकीय विकास प्रशिक्षण

» प्रेरक प्रशिक्षक कार्यक्रम

» उद्योजकता परिचय कार्यक्रम

» कॉम्प्युटर प्रशिक्षण कार्यक्रम

वरील सर्व कार्यक्रमामधील प्रशिक्षणार्थीना कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिलं जातं. शासकीय व निमशासकीय संस्था एमसीईडीच्या उपक्रमात प्रमाणपत्र देण्यात येतं.

महाराष्ट्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्र

उदबत्ती, डिर्टजट, जेली, सोप, फिनाइल घरगुती उत्पादनं, विविध प्रकारची फुलं आणि भेटकार्ड, मोत्याचे अलंकार, स्क्रीन प्रिंटिंग पदवीधरांसाठी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास.

संपर्क : म्युन्सिपल शाळा, पहिला मजला, भवानी शंकर मार्ग, दादर (प), मुंबई २८

कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय

महिलांसाठी सुरू केलेलं व्यासपीठ असून एक महिन्यापासून पाच महिन्यांपर्यंत विविध मुदतीचं प्रशिक्षण येथे दिलं जातं. आतापर्यंत हजारो महिलांनी लाभ घेतला असून अनेक महिलांनी ग्रामोद्योग सुरू केला आहे.

संपर्क पत्ता : कस्तुरबा महिला ग्रामोद्योग विद्यालय, आगाखान पॅलेस, नगर रोड, पुणे – ४११ ००६

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अभ्यासक्रम

महाराष्ट्रात महिलांसाठी १५ स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १०४ बिगर-शासकीय महिला महाविद्यालये आहेत. अभ्यासक्रमाची आखणी, नियमन आणि परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ’ यांच्यामार्फत करण्यात येते. अभ्यासक्रमाच्या नावाची यादी पुढीलप्रमाणे –
» इलेक्ट्रॉनिक गट
» तांत्रिक गट
» अन्न प्रक्रिया गट
» मुद्रणशास्त्र गट
» वस्त्रोद्योग गट
» शिवण-कर्तन गट

अशा अनेक छोटया-मोठया उद्योग व्यवसाय प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला जरूर लाइक करा.

Address

DIC OFFICE
Ratnagiri
415639

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 5pm

Telephone

02352-221988

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , रत्नागिरी - MCED Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , रत्नागिरी - MCED Ratnagiri:

Share