LEO CLUB Ratnagiri II

LEO CLUB Ratnagiri II Introducing Leo club Ratnagiri II with new reformed social activities and awareness

दिनांक - १४ ऑगस्ट २०२४ सेवाकार्य - *स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लीओ क्लब रत्नागिरी तर्फे परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक ...
14/08/2024

दिनांक - १४ ऑगस्ट २०२४

सेवाकार्य - *स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लीओ क्लब रत्नागिरी तर्फे परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक शाळेत हर घर तिरंगा आणि क्रांतिकारकांविषयी जनजागृती करण्यात आली.*
विशेष म्हणजे लिओ क्लब रत्नागिरी कडून शाळेला तिरंगा भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांविषयी माहिती व्हावी असा हेतू डोळ्यासमोर ठेवून सदर सेवाकार्य करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिओ क्लब रत्नागिरीची मुलांना ओळख करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिओ श्रेयसने केले. लिओ गिरीजाने लिओ क्लब रत्नागिरी आयोजित हर घर तिरंगा with Student Selfie स्पर्धेविषयी मुलांना माहिती सांगितली. सदर सेवाकार्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद नारकर, लिओ अध्यक्ष लिओ श्रेयस रसाळ, लीओ सचिव लिओ गिरीजा घनवटकर, लिओ अभिषेक बेकवाडकर आणि लिओ साहिल आखाडे, शिक्षक श्री प्रकाश कदम, शिक्षिका सौ सावंत आणि सौ शिवलकर, उपस्थित होते.

*दिनांक -* १२ ऑगस्ट २०२४ *लायन्स क्लब रत्नागिरी, लिओ क्लब रत्नागिरी, लायन्स क्लब देवरुख,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ज...
12/08/2024

*दिनांक -* १२ ऑगस्ट २०२४

*लायन्स क्लब रत्नागिरी, लिओ क्लब रत्नागिरी, लायन्स क्लब देवरुख,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिजाऊ सामाजिक संस्था पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मातृमंदिर देवरुख या मुलींच्या अनाथाश्रमात दैनंदिन गरजेच्या व शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.*

ॲड. ममताबेन मुद्राळे यांनी त्यांची आई नीरा सूर्यकांत मुद्राळे यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदरच्या समाजकार्यासाठी रुपये 10,000/- ची देणगी दिली तसेच जिजाऊ सामाजिक संस्था पालघर संस्थेने 15 डझन वह्यांचे (long book) वाटप केले.

या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश मा.श्री .एस. एस. गोसावी साहेब, विधिसेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव मा.श्री.निखिल गोसावी साहेब,लायन्स क्लब रत्नागिरी चे अध्यक्ष ला.गणेश धुरी, देवरुख लायन क्लब अध्यक्ष ला.माया गोखले, लायन्स क्लब रत्नागिरी चे PRO आणि जिजाऊ सामाजिक संस्था पालघर चे रत्नागिरी जिल्हा कायदेशिर सल्लागार ला.ऍड.महेंद्र मांडवकर, ला.प्रदीप हरचिरकर, ला.मनोज गोखले, ला. अमित सावंत, ला,अभि अग्रवाल,
ला. गौरी पाडळकर, ला.चेतनपाडळकर तसेच रत्नागिरी लिओ क्लब अध्यक्ष लिओ श्रेयस रसाळ, लिओ अभिषेक बेकवाडकर उपस्थित होते.

मातृमंदिर अधीक्षक सफिरा कुवर सेक्रेटरी विनायक पानवलकर, उपाध्यक्ष श्री विलास कोळपे आणि मातृमंदिर संस्था सदस्य उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास कोळपे यांनी सूत्रसंचालन केले आणि ऍड.महेंद्र मांडवकर यांनी आभार व्यक्त केले.

🟢मेगा ऍक्टिविटी⏺️वृक्षारोपण सेवाकार्य संपन्न-लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत आज दिनांक 11/08/2024 रोजी ग्रामपंचायत मिऱ्या या...
11/08/2024

🟢मेगा ऍक्टिविटी

⏺️वृक्षारोपण सेवाकार्य संपन्न-

लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत आज दिनांक 11/08/2024 रोजी ग्रामपंचायत मिऱ्या या ठिकाणी वृक्षारोपण या सेवाकाऱ्यांसाठी लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत 1000 विविध प्रकारची रोपे त्यामध्ये साग,खैर, वड, पेरू कडुनिब अशा प्रकारचे रोपे मिऱ्या या गावात विविध ठिकाणी लावण्यासाठी देण्यात आली यावेळी मिऱ्या ग्रामपंचायत सरपंच, सभासद आणि मिऱ्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच लायन्स क्लब रत्नागिरी अध्यक्ष गणेश धुरी, सचिव लायन विशाल ढोकळे, खजिनदार लायन अमेय वीरकर,लायन साक्षी धुरी, *लिओ अध्यक्ष श्रेयस रसाळ, लिओ कल्पेश हातखंबेकर* उपस्थित होते. ग्रामपंचायत सरपंच मॅडम यांनी लायन्स क्लबचे आभार मानून लवकरात लवकर सर्व रोपे मिऱ्या गावात लावण्यात येतील असे आश्वासन दिले

09/08/2024

क्रांतीदिन रॅली -लायन्स क्लब आणि लिओ क्लब रत्नागिरी आयोजित

दिनांक-९-८-२०२४⏺️सेवाकार्य-*क्रांतीदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब आणि लिओ क्लब आयोजित प्रभात फेरीचे आयोजन*इंग्रजांच्या ...
09/08/2024

दिनांक-९-८-२०२४

⏺️सेवाकार्य-*क्रांतीदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब आणि लिओ क्लब आयोजित प्रभात फेरीचे आयोजन*

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन. लायन्स क्लब रत्नागिरी दरवर्षी ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त रत्नागिरी मधील विविध शाळा मधील विद्यार्थ्यांसमवेत प्रभात फेरी आयोजित करत आला आहे. यावर्षी देखील सकाळी आठ वाजता रत्नागिरी मधील जयस्तंभ क्रांतीकारकांचे स्मरण करून जयस्तंभ येथे लायन्स क्लब अध्यक्ष लायन गणेश धुरी
तसेच लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष MJF लायन डॉक्टर संतोष बेडेकर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली आंबेडकर पुतळ्याच्या येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून टिळक जन्मभूमीकडे निघाली. या रॅलीमध्ये रत्नागिरी मधील विविध शाळातील सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध प्रकारच्या देशप्रेमी घोषणा देत ही रॅली टिळक जन्मभूमी येथे येत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास हार अर्पण करून भारत माता की जय, वंदे मातरम अश्या प्रकारच्या घोषणांनी पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला.
समारोपासाठी ऊपस्थीत रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार मा.म्हात्रे साहेब तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस ऊप निरीक्षक मा.चव्हाण साहेब ऊपस्थीत होते.
या रॅलीमधे सहभागी झालेल्या विद्यार्थांसाठी ⏺️उत्कृष्ट संचलन, ⏺️उत्कृष्ट घोषवाक्य ⏺️उत्कृष्ट वेषभूषा यासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक काढण्यात आले. रॅलीमधे सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार देखील देण्यात आला. या रॅलीमधे अध्यक्ष ला.गणेश धुरी, सचिव ला.विशाल ढोकळे, खजिनदार ला.अमेय विरकर, ट्रस्ट अध्यक्ष MJF ला.डाॅ.संतोष बेडेकर, MJF ला.सौ सुप्रिया बेडेकर, MJF ला.ॲड शबाना वास्ता, MJF ला डाॅ. शिवानी पानवलकर, ला.दत्तप्रसाद केळुसकर, ला.सौ.स्नेहा केळुसकर, ला.प्रविण जैन, ला. ऊदय आपटे , ला.स्नेहल राणे, ला.हर्षा जैन , MJF ला.सुप्रिया बेडेकर,ला.साक्षी धुरी, ला. डाॅ गणेश कुळकर्णी , ला. शरद नागवेकर ,ला डाॅ. माधवी कुळकर्णी आणि लिओ सदस्य मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते. संपूर्ण रॅलीचे सूत्रसंचलन MJF ला.ओंकार फडके यांनी केले. शेवटी सर्व शाळा, शहर पोलीस, वाहतुक पोलीस, ऊपस्थीत मान्यवर यांचे आभार मानून रॅलीची सांगता झाली.

PST-२०२४-२५

*सेवाकार्य- आशादीप संस्थेला रानभाजी वाटप सेवाकार्य संपन्न...*लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे घेण्यात आलेल्या महोत्सवातील महि...
08/08/2024

*सेवाकार्य- आशादीप संस्थेला रानभाजी वाटप सेवाकार्य संपन्न...*
लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे घेण्यात आलेल्या महोत्सवातील महिलांकडून भाजी खरेदी करून लायन्स क्लब आणि लिओ क्लबकडून आशादीप संस्थेतील मुलांच्या जेवणासाठी पौष्टिक भाजांचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष ला गणेश धुरी ,ला विशाल ढोकळे ला प्राची शिंदे ला साक्षी धुरी लिओ अभिषेक उपस्थित होते.

◼️ *दैनिक फ्रेश न्युज* ◼️*लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित रानभाज्या महोत्सव आणि पाककला स्पर्धेला रत्नागिरीकरांकडून मिळाल...
07/08/2024

◼️ *दैनिक फ्रेश न्युज* ◼️

*लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित रानभाज्या महोत्सव आणि पाककला स्पर्धेला रत्नागिरीकरांकडून मिळाला उस्फुर्त प्रतिसाद*
कोकणात पाऊस सुरु झाला की रानावनात अनेक प्रकारच्या औषधी भाज्या उगवत असतात. ग्रामीण भागात या भाज्यांचा सर्रास वापर जेवणात केला जातो. ग्रामीण भागातील अनेक महिला या भाज्या घेऊन विक्रीसाठी येतात. परंतु त्यांचे औषधी गुणधर्म माहित नसल्याने शहरी भागात याचा वापरही कमी होत असतो. त्यामुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागामधून जवळपास 30हून अधिक बचत गटांच्या महिला रानभाज्या घेऊन या महोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या. शहरातील माळनाका जयेश मंगल कार्यालयात आयोजित या महोत्सवाला रत्नागिरीकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये अळू, टाकल्याची भाजी, काकवी, शेवग्याची भाजी, भारंगीची फुले व कोवळी पाने, काटल, कुड्याच्या शेंगा, करवंद, भुरमुले, कुरडू, घोटवेल, फोडशी, निवडुंग, पोकळा, पाथरी, कुरतुडी, ओवा पान, उंबराची फळे, ओले काजूगर, भाजीचे गरे, कोकम, कडीपत्ता, केळफूल, सुरणाची पाने यासारख्या भाज्या विविध बचत गटांनी महोत्सवामध्ये विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी, खजिनदार अमेय विरकर, सचिव विशाल ढोकळे व लायन्सचे सर्व पदाधिकारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेत, महोत्सवाच्या सुरुवातीलाच या महोत्सवाच्या आयोजनाचे महत्व सांगितले. या महोत्सवाला रत्नागिरी शाळांच्या विद्यार्थ्यांनीही भेट घेत, या भा÷ज्यांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी घरांमध्ये या भाज्या केल्या जात असल्याचेही सांगितले.
महोत्सवामध्ये रानभाज्यांची औषधी माहितीही देण्यात आली होती. विशेषत: कोणत्या भाज्या कोणत्या आजारावर उपयोगी पडतात हे सांगण्यात आले. घोटवेलची भाजी सांधेदुखी व अ‍ॅलर्जीवर, काकवी ही खनिजयुक्त आहे. कुरडूचा वापर मुतखडा व संधीवातावर, भुरमुळ्याचा वापर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पचनासाठी केला जातो. कुड्यांच्या शेंगांचा वापर गॅस व जंत यावर होतो. भारंगीची फुले व पानांचा वापर सर्दी, खोकला, तापासह मधुमेहावर होतो. टाकल्याचा वापर त्वचाविकार, मधुमेह आणि थाररॉईडसारख्या आजारांवर होत असतो. विशेषत: पावसाळ्यामध्ये येणार्‍या या भाज्यांचा वापर आपल्या अन्नामध्ये करावा असे आवाहनही यावेळी लायन्स अध्यक्ष गणेश धुरी यांनी केला. या महोत्सवाला जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, होड डिवायएसपी गायत्री फडके, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, डॉ. निलेश पाटील, निलेश ढमाले, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही भेट दिली.
वनभाज्या महोत्सवानिमित्ताने वनभाज्याची पाककला स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. यात विविध पदार्थ सादर करण्यात आले होते. पाककला स्पर्धात शहरी विभागात प्रथम क्रमांक उल्का पटवर्धन, द्वितीय शर्वरी धुंदूर, तृतीय मिनल धुुंदूर यांना पटकावला तर ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक सिध्दी संभाजी देसाई-नाचणे, द्वितीय प्रियंका प्रवीण गजने- मावळंगे, तृतीय प्रज्ञा जयंत फडके- पूर्णगड यांना क्रमांक मिळाला. रानभाज्यांच्या स्टॉलमध्येही स्पर्धा घेण्यात आली यात पहिला क्रमांक शीळ येथील मयुरी सावंत, द्वितीय भाट्ये येथील श्रध्दा भाटकर, तृतीय वळके येथील पूजा भुवड तर चतुर्थ क्रमांक चिंचखरी येथील मधुरा बोरकर या महिलांचा गौरव करण्यात आला.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

https://chat.whatsapp.com/Hm85cN1vg0e1hcznDuIu1k

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा

https://youtube.com/?feature=shared

FRESH News is a 24-hour Marathi news channel in India. The MAHARSATRA based company was launched on 14 April 2010. . FRESH News is a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. This news Registered by INDIAN Gove...

लायन्स रानभाज्या महोत्सव रत्नागिरी
07/08/2024

लायन्स रानभाज्या महोत्सव रत्नागिरी

07/08/2024

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LEO CLUB Ratnagiri II posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category