Ratnagiri Police - रत्नागिरी पोलीस

Ratnagiri Police - रत्नागिरी पोलीस "Official Page" of Ratnagiri Police, Maharashtra State, India.

03/06/2026

रत्नागिरी पोलीस दलाने छत्रपती शिवरायांच्या गोपाळगड किल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे सर्व गड किल्ला प्रेमी व शिव भक्तांना आवाहन...

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला ...
30/05/2026

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त होणारे पोउनि/ गजानन बने, श्रेणी पोउनि भरत जाधव, नारायण सावंत, नारायण आळे, जयवंत सोनावले, नितीन पंदेरे, सुनिल आयरे, सपोफौ/ विनायक जाधव तसेच सहा. आचारी/ भारती वाडकर आणि सफाईगार/ शशिकांत पडयाळ हे आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. तसेच तेलंगणा राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी श्री. चेतन नितीन पंदेरे (भा.पो.से.) हे त्यांचे वडील श्रेणी पोउनि नितीन पंदेरे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रसंगी रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. .pawar .samant

29/05/2026

मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. कोणतीही अडचण, तक्रार किंवा संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ डायल 112, रत्नसेतू चॅटबॉट (9371415612) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये व त्या पुढे पाठवू नयेत. जिल्ह्यात शांतता, सलोखा व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range

कोकण परिक्षेत्राचे नव नियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.चंद्र किशोर मीणा यांनी रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट दिल...
27/05/2026

कोकण परिक्षेत्राचे नव नियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.चंद्र किशोर मीणा यांनी रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
सदर भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना तसेच पोलीस दलाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range

रत्नागिरी पोलीस दलातर्फे समुद्रात बुडणाऱ्या महिलेचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने जीव वाचविणाऱ्या श्री. करण मिलक...
25/05/2026

रत्नागिरी पोलीस दलातर्फे समुद्रात बुडणाऱ्या महिलेचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने जीव वाचविणाऱ्या श्री. करण मिलके यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा. पो. से) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी त्यांच्या धाडसी व मानवतावादी कृतीबद्दल विशेष कौतुक करून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. या वेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range

गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात.गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या द...
21/05/2026

गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात.

गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या कंटेनरची माहिती गोवा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक श्री. निनाद देऊळकर यांनी रत्नागिरी पोलीस दलास दिली.
सदर माहिती प्राप्त होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे व त्यांच्या पथकाने तात्काळ शोध मोहीम राबवली. तपासादरम्यान सदर कंटेनर हा कुवे येथे गोवा-मुंबई महामार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक श्री. नीलकंठ बगळे व त्यांच्या पथकाने कंटेनरचा पाठलाग करून वाहनासह चालकास ताब्यात घेतले.सदर चालक व कंटेनर पुढील कार्यवाहीसाठी गोवा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range

21/05/2026

रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटीचे लोकार्पण मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सदर स्पीड बोट सागरी सुरक्षा, किनारपट्टी गस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे सागरी सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
यावेळी रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter

🚦 वेगावर नियंत्रण, जीवनावर संरक्षण! 🚦रस्त्यावरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.अतिवेग, मोबाईलचा वापर आणि निष्काळजीपणा अपघ...
19/05/2026

🚦 वेगावर नियंत्रण, जीवनावर संरक्षण! 🚦

रस्त्यावरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.
अतिवेग, मोबाईलचा वापर आणि निष्काळजीपणा अपघाताला आमंत्रण देतात.

✅ मर्यादित वेग ठेवा
✅ सीट बेल्ट / हेल्मेट वापरा
✅ मोबाईलपासून दूर राहा
✅ वाहतूक नियमांचे पालन करा

“सुरक्षित रहा, सुखी रहा.” ❤️
आपत्कालीन मदत :
📞 RATNASETU CHATBOT : 9371415612
📞 Dial 112
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range

Address

Dr. Babasaheb Ambedkar Marg, Near District Jail
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri Police - रत्नागिरी पोलीस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ratnagiri Police - रत्नागिरी पोलीस:

Share