12/12/2021
🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना,रत्नागिरी ( दक्षिण ) 🚩
मनसे नेते अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वात राबविलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद .
मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व मनसे नेते सन्माननीय श्री .अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात एका अभिनव संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्राला दैवी देणगी लाभलेल्या ७२० किमी समुद्र किनारपट्टीवरील ४० हून अधिक समुद्र किनाऱ्यांवर आज एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .
याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी शहरातही मांडवी समुद्र किनारी मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण , मनसे सुरक्षा रक्षक सेना अध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी चव्हाण व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या मार्गदर्शनात स्वच्छता कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या कार्यक्रमाला मनसे सरचिटणीस व खेड शहराचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहिली .यावेळी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते , विविध सामाजिक संघटना , अल्ट्राटेक सिमेंट अधिकारी डहाणूकर साहेब, पाटील व सर्व अधिकारी कर्मचारी ,महाविद्यालयीन विद्यार्थी व इतर सामान्य नागरिकांनी केलेल्या श्रमदानातून दीड टन कचरा गोळा करण्यात आला.यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी-संगमेश्वर ) श्री.रुपेश सावंत , उपजिल्हाध्यक्ष (लांजा -राजापूर) श्री .अविनाश सौंदळकर , मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर , राजापूर माजी तालुकाध्यक्ष राजू पवार , मनसे रत्नागिरी शहरअध्यक्ष सतिश राणे , मनसे कामगार सेना चिटणीस छोटू खामकर ,मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक रूपेश जाधव , माथाडी कामगार सेना जिल्हा चिटणीस गुरु चव्हाण , मनसे सुरक्षारक्षक कामगार सेना जिल्हा चिटणीस अरविंद मालाडकर ,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष चैतन्य शेंडे, महिला उपशहरअध्यक्ष द्वारका नंदाणे, अश्विनी रहाटे मनसे उपशहरअध्यक्ष मयुरेश मडके , उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण , उपशहरअध्यक्ष अमोल श्रीनाथ ,रत्नागिरी शहर समुद्र किनारा प्रतिनिधी व विभागअध्यक्ष अक्षय माईण , विभागअध्यक्ष गजानन आईर , विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, विभागअध्यक्ष अजिंक्य केसरकर , शाखाध्यक्ष शैलेश मुकादम , नैनेश कामेरकर, शाखाध्यक्ष राहुल खेडेकर ,माजी उपशहर अध्यक्ष बाबूशेठ तळेकर आदी पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली...तसेच रत्नागिरी नगरपरिषद आरोग्य विभाग व कर्मचारी,पोलीस प्रशासन,पोलीस वाहतूक शाखा,तसेच सर्व पत्रकार बांधव ह्याचे सहकार्य लाभले....