Mangrove Cell , Ratnagiri

Mangrove Cell , Ratnagiri Mangrove Cell , Ratnagiri

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा  दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर...
18/09/2025

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालू आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत वनोपज आधारित रोजगार निर्मिती उपक्रमांची प्रदर्शनी कार्यक्रमानिमित्त वाशी नवी मुंबई येथे रत्नागिरीतील मालगुंड येथे कार्यरत असणारे कासव मित्र श्री.आदर्श मयेकर आणि गुहागर येथे कार्यरत असणारे श्री. संजय भोसले यांना कासव संवर्धनाबाबत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल मा. श्री. गणेशजी नाईक मंत्री वने महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा  दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर...
18/09/2025

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालू आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत वनोपज आधारित रोजगार निर्मिती उपक्रमांची प्रदर्शनी कार्यक्रमानिमित्त वाशी नवी मुंबई येथे रत्नागिरीतील नवलाई पावणाई शोभिवंत मत्स्य पालन गट’ मिऱ्या यांना सन २०२४ ते २०२५ या कालावधीत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल मा. श्री. गणेशजी नाईक मंत्री वने महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिनानिमित्त आज दिनांक 26 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत त...
26/07/2025

आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिनानिमित्त आज दिनांक 26 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत तसेच कांदळवन समिती अशा विविध स्तरावर कांदळवन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कांदळवन संवर्धन आणि संरक्षण करताना त्यांचे पर्यावरणात असलेले महत्वाचे स्थान याबाबत सखोल माहिती विद्यार्थी व ग्रामस्थ यांना देण्यात आली.

दिनांक 21 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिनानिमित्त सर्वांकश विद्यामंदिर, रत्नागिरी येथे प्रादेशिक वनविभाग, रत्नागिरी व कांद...
22/03/2025

दिनांक 21 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिनानिमित्त सर्वांकश विद्यामंदिर, रत्नागिरी येथे प्रादेशिक वनविभाग, रत्नागिरी व कांदळवन कक्ष, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला 140 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Address

Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mangrove Cell , Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mangrove Cell , Ratnagiri:

Share