Zilla Parishad Ratnagiri

Zilla Parishad Ratnagiri Government Organization

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जि.प.मुख्यालयात आज शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता के...
22/05/2026

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जि.प.मुख्यालयात आज शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे , शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव , वित्त व लेखा अधिकारी श्री.उत्तम सुर्वे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!आज या दिनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे...
14/05/2026

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

आज या दिनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मा.अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव, वित्त व लेखा अधिकारी श्री.उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.अनिरुद्ध आठल्ये व खातेप्रमुख , कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आज १ मे – महाराष्ट्र दिनमहाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन! या मातीत जन्म घेऊन आपल्या क...
01/05/2026

आज १ मे – महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन! या मातीत जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकरी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी, महिला आणि सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक अभिनंदन!
जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन सोहळा पार पडला. सर्वप्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर संपूर्ण वंदे मातरम ध्वनिफीतद्वारे सादर झाले. यावेळी जि.प शाळातील विद्यार्थ्यांतर्फे राज्यगीत सादर केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष श्री.विलास चाळके, वित्त व शिक्षण सभापती श्री.नंदकुमार मुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , खातेप्रमुख व सर्व कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.

ग्रामविकासातून राष्ट्रविकासाची परिभाषा मांडणारे, समाजसुधारणावादी ग्रामगीतेचे रचनाकार 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' यांच्या...
30/04/2026

ग्रामविकासातून राष्ट्रविकासाची परिभाषा मांडणारे, समाजसुधारणावादी ग्रामगीतेचे रचनाकार 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' यांच्या जयंतीदिनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मा.अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव व खातेप्रमुख , कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ अंतर्गत सेवा हक्क दिन निमित्ताने जिल्हा परिषद रत्नागिरी येथे शपथ घेण्यात आली. याव...
28/04/2026

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ अंतर्गत सेवा हक्क दिन निमित्ताने जिल्हा परिषद रत्नागिरी येथे शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदही रानडे यांनी कर्मचाऱ्यांना विविध सेवांविषयी माहिती दिली. यावेळी शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर, उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.सागर पाटील, महिला व बालविकास अधिकारी श्री.मल्लिनाथ कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.

आयडीबीआय बँक रत्नागिरीकडून सी.एस.आर.(CSR) निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साहित्य वितरणरत्नागिरी : आयडीबीआय बँक, रत...
24/04/2026

आयडीबीआय बँक रत्नागिरीकडून सी.एस.आर.(CSR) निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साहित्य वितरण

रत्नागिरी : आयडीबीआय बँक, रत्नागिरी शाखेकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधी अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय साहित्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत एकूण ११२ एक्झामिनेशन टेबल, १०० अल्ट्रासोनिक नेब्युलायझर आणि १०५ फिटल डॉपलर यांसारख्या अत्यावश्यक उपकरणांचा समावेश असून, ही साधने ग्रामीण आरोग्य सेवेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम समिती सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वेदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) सागर पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये ,तसेच समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, शिक्षण व अर्थ समिती सभापती नंदकुमार मुरकर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती महेश नाटेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती मयुरी शिर्के, तसेच स्थायी समिती सदस्य महेश म्हाप, महेंद्र झोपडेकर, रमेश सूद, ऐश्वर्या घाडवे, शिवानी सावंत उपस्थित होते.
आयडीबीआय बँकेच्या वतीने मुख्य महाव्यवस्थापक आशुतोष कुमार यांनी CSR अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांच्या तसेच क्षेत्रीय महाव्यवस्थापक सुब्रमण्यम एन., उपमहाव्यवस्थापक (पुणे झोन) तुषार बोडस ,शाखाधिकारी रत्नागिरी अमोल पुजारी यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधा अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आयडीबीआय बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत भविष्यातही अशा प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद केले.

(डॉ. अनिरुद्ध आठल्ये)
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, रत्नागिरी

आज दिनांक २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये 'राष्ट्रीय पंचायतराज दिवस-NPRD’ साजरा करण्यात आला. यावेळी विशेष ग्...
24/04/2026

आज दिनांक २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये 'राष्ट्रीय पंचायतराज दिवस-NPRD’ साजरा करण्यात आला. यावेळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार श्री.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार व वंदन करण्यात आले. त्यानंतर मा.जिल्हा परिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष, सदस्य यांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत राज्यस्तरावर यश मिळवलेल्या देवघर (खेड), विरसई (दापोली), कुवारबाव (रत्नागिरी),
व आर आर आबा पाटील सुन्दर योजना जिल्हास्तर पुरस्कार विजेते कळसवली (राजापूर) या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे , उपाध्यक्ष श्री.विलास चाळके , समाजकल्याण सभापती श्री.सुयोग कांबळे , शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सागर पाटील ग्रामपंचायत, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्रीमती मयुरी पाटील, जिल्हा परिषद सदस्य तसेच खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!आज जिल्हा परिषद रत्न...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

आज जिल्हा परिषद रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष श्री.विलास चाळके, वित्त व शिक्षण सभापती श्री.नंदकुमार मुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. सागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि) श्री.मल्लिनाथ कांबळे व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

स्त्री शिक्षणाचे अग्रणी, थोर समाजसुधारक 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
11/04/2026

स्त्री शिक्षणाचे अग्रणी, थोर समाजसुधारक 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती मधील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आज 'आनंदी निवृत्ती दिन' साजरा करण्यात आला. जिल...
01/04/2026

जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती मधील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आज 'आनंदी निवृत्ती दिन' साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.विलास चाळके , मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर , श्री. विजयसिंह जाधव (उप मुख्य कार्यकारी सा.प्र.वि) , श्री उत्तम सुर्वे (लेखा व वित्त अधिकारी) यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे :
श्रीमती स्नेहा साळवी - वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
श्री संतोष पालशेतकर - वरिष्ठ सहाय्यक
श्रीमती स्वाती रसाळ - उपशिक्षक
श्री नौशाद बोरकर - मुख्याध्यापक
श्रीमती सुविधा घाणेकर - उपशिक्षक
श्री संतोष पवार - उपशिक्षक

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन.. आज मुख्यालयात म...
23/03/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन.. आज मुख्यालयात मा.उपाध्यक्ष श्री.विलासजी चाळके व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) यांच्या हस्ते प्रतिमा वंदन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सर्व खातेप्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Address

Dr. Babasaheb Ambedkar Bhavan, Zilla Parishad Ratnagiri, Malnaka
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Zilla Parishad Ratnagiri:

Share