Natural Power Group Ranjani

Natural Power Group Ranjani natural power group

29/04/2017
24/04/2017

नॅचरल उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषीरत्न मा. श्री.बी.बी. ठोंबरे साहेब यांना परभणी कृषी विद्यापीठाची कृषिरत्न मानद उपाधी राज्याचे कृषी मंत्री श्री. पांडुरंगजी फुंडकर साहेब व कुलगुरू श्रि. व्यंकटश्वरलू यांचे हस्ते प्रदान झाला

नॅचरल उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषीरत्न मा. श्री.बी.बी. ठोंबरे साहेब यांना परभणी कृषी विद्यापीठाची कृषिरत्न मानद उपाधी राज...
22/04/2017

नॅचरल उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषीरत्न मा. श्री.बी.बी. ठोंबरे साहेब यांना परभणी कृषी विद्यापीठाची कृषिरत्न मानद उपाधी राज्याचे कृषी मंत्री श्री. पांडुरंगजी फुंडकर साहेब व कुलगुरू श्रि. व्यंकटश्वरलू यांचे हस्ते प्रदान झाला

04/04/2017

काल जाहीर झालेल्या महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या ranking मध्ये आमच्या कारखान्याच्या " साई कॉलेज ऑफ कॉम्पुटर education" या कॉलेज चा भारतातल्या टॉप 100 कॉलेज मध्ये 83 नंबर आला आहे...आणि महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये ते 8 नबरला आहे..👍👏

10/03/2017

साई काॅलेजमध्ये शेतकरी आत्महत्या चर्चासञ ----------------------- डाॅ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद बहिःशाल शिक्षण मंडळ व साई संगणकशास्ञ महाविधालय रांजणी यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतकरी आत्महत्या आणि उपाय' या विषयावर दि. 11 मार्च रोजी सकाळी ठिक 11 वाजता चर्चासञ आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासञाचे उदघाटन बहिःशाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्या हस्ते होणार असून डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न बी .बी .ठोंबरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील जास्ती जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य जे.सी .गवळी यांनी केले आहे .

16/11/2016

Company Name : Natural Sugar & Allied Industries Ltd.
Ownership : Private Sector
Product : Sugar Mill
Incorporation Year : Not Available
Website : http://naturalsugar.in
Activity : Food & Agro Products,Sugar
Show Map
Registered: Sai Nagar, Ranjani,
Kallam Taluka
Osmanabad - 413528
Maharashtra, India
Tel : ( 02473)-265503/05
Email : [email protected]

Contact :
Mr. Harshal Thombare (Project Coordinator Purchase Officer)
Email : [email protected]
Mr. Sonawane (Manager Distillery)
Email : [email protected]
Mr. B B Thombare (CMD)
Email : [email protected]
Corporate: A-70/3, Textile Complex,
MIDC
Latur - 413531
Maharashtra, India
Tel : ( 02382)-220818

Contact :
Mr. Gangne (General Manage

16/11/2016

a sugar factory that takes care of farmers.

16/11/2016

Sachin Tadake brings you top news stories in the agricultural and farming field in Agrowon. Watch how Krishiratna Awardee B.B.Thombare started Natural Sugar ...

06/09/2016
19/08/2016

हिवरे बाजार या गावातल्या २३० कुटुंबापैकी ६० कुटुंबे आहेत करोडपती.
इथल्या नागरिकांचा सरासरी महिन्याची कमाई आहे ३०,०००.
हिवरे बाजार हे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. याविषयी तुम्ही ऐकलेही असेल.
हिवरे बाजार समजून घेण्यासाठी इथली २० वर्षांपूर्वीची स्थिती पाहायला हवी. कसं होतं हे गाव?
गावात दारूच्या भट्टय़ा होत्या. इथून आजूबाजूच्या गावांना दारूचा मुबलक पुरवठा होत होता. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थैर्य हे शब्द कानावरून गेले तरी खूप- अशी एकंदरीत परिस्थिती.
एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली ‘शिक्षा’ म्हणून इथे होत असे. ‘कुछ नहीं होगा इस गाव का!’ अशीच धारणा होती.
‘होती’ असं म्हणतोय त्या अर्थी आत्ता तशी परिस्थिती नाही, हे उघड आहे.
पण कसं आहे आताचं ‘हिवरे बाजार’?
गावाची लोकसंख्या चौदाशेच्या आसपास. गावात एकही प्रौढ माणूस बेरोजगार नाही.
गावातल्या २२६ घरांना आज आर्थिक स्थैर्य प्राप्त झालंय. शेती व दुग्धउत्पादन हे मुख्य व्यवसाय. या व्यवसायातून गावातली 60 कुटुंबे आज ‘मिलेनियर’ झाली आहेत! (त्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या वर आहे.)
या व्यवसायात स्त्रियाही अग्रेसर आहेत. गावात ऊस लागवडीला बंदी आहे. कारण त्याला भरपूर पाणी लागतं. मुख्य पीक- कांदा. गावाने जलसंधारणाच्या योजना राबवून असा काही चमत्कार घडवून आणलाय, की वर्षभरात शंभर मि. मी. पाऊस पडूनसुद्धा गावातल्या २५३ विहिरींना बाराही महिने पाणी असतं. गावात सोळा हातपंप आहेत. गावातल्या डोंगरांवर गुरांना चरणं गावाच्या कायद्याविरुद्ध आहे. त्यामुळे चाऱ्याचं इतकं नियोजन होतं, की गावात चारा पुरतोच, शिवाय आजूबाजूच्या गावातले लोकही इथला चारा घेऊन जातात. चराईबंदीचा आणखी एक फायदा असा की, डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी वाहून जात नाही. ते नैसर्गिकरीत्या अडवलं जातं आणि जमिनीत मुरतं. थोडक्यात- गाव ‘सुजलाम्-सुफलाम्’ आहे.
ज्या गावात एकेकाळी फक्त दारूच्या भट्टय़ा होत्या, त्या गावात आता दारू सोडाच, पान-सिगारेट, तंबाखू, गुटखा सगळ्याला बंदी आहे. संपूर्ण नशाबंदी!
गावातल्या सगळ्या घरांना सारखा रंग! प्रत्येक घरावर घराच्या मालकाचं नाव सुंदर अक्षरांत लिहिलेलं. गावातले रस्ते सीमेंट-काँक्रीटचे. प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय. शासनाचे ग्रामस्वच्छतेचे सगळे पुरस्कार या गावाला मिळाले आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही स्वच्छता बाराही महिने असते.
गावातली कुठलीही महिला फुंकणी वापरून स्वयंपाक करीत नाही. त्यांच्या दिमतीला १३० बायोगॅस आहेत. गावाचं स्वत:चं देखणं मंगल कार्यालय आहे. गावातली जमीन, घर बाहेरच्या माणसाला विकण्यास परवानगी नाही. जमीन विकत घ्यायची एखाद्याची ऐपत नसेल तर चार शेतकरी एकत्र येऊन त्याला मदत करतात; पण गावातली जमीन बाहेरच्याला विकली जात नाहीत. संपूर्ण गाव साक्षर आहे. गावात टुमदार शाळा आहे. शाळेला भव्य पटांगण आणि स्टेज आहे. शाळेच्या भिंती माहिती, चित्रं, सुविचारांनी नटल्या आहेत. शाळेच्या आवारातच शाळेचं स्वयंपाकगृह आहे. शाळेच्या भिंतीवर सोमवार ते शनिवार दिला जाणारा मेनू (त्यातील पौष्टिक अन्नघटकांसहित) लिहिलेला आहे. एका भिंतीवर शाळेचा नकाशा आहे. मुला-मुलींसाठी वेगवेगळी शौचालयं आहेत. त्यावर ‘पाणी टाकलं ना?’ अशी प्रेमळ विचारणा आहे. अपंग मुलांसाठी वेगळ्या शौचालयाची सोय आहे. शाळेतली उपस्थिती व निकाल १०० टक्के आहे. प्रत्येक वर्गाला ग्रामपंचायतीतर्फे एक ‘किट’ देण्यात आले आहे. त्यात पावडर, तेल, साबण व नेलकटर ठेवण्यात आले आहे.
आणखी काही ऐकून कोसळायचंय?
संपूर्ण गावाचा एकच गणपती असतो!
गावातले बरेच रस्ते गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधले आहेत. गावातल्या मुलाचं लग्न होणार असेल तर या मुलाचं आणि गावात नवीन येणाऱ्या सुनेचं ‘एच. आय. व्ही. सर्टिफिकेट’ ग्रामपंचायतीत सादर करण्याची सक्ती आहे. गावात एकही दवाखाना नाही. कारण तिथे कोणाला आजारच नाही होत! एका डॉक्टरने दवाखाना थाटायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण पेशंटस्च न फिरकल्याने तो गाशा गुंडाळून निघून गेला. दवाखाना नाही, यात काही चमत्कार वगैरे नाही. स्वच्छता आणि आरोग्य यांच्यातला परस्परसंबंध गावकऱ्यांनी नेमका ओळखलाय. त्याचंच हे फलित!
सरपंच पोपटराव पवार व त्यांचे ग्रामस्थ सहकारी यांनी या गावात घडवून आणलेला चमत्कार एका रात्रीत झालेला नाही. बदलामुळे होणारे चांगले परिणाम सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात; परंतु ही ‘बदल प्रक्रिया’ खूप संघर्षांची आणि तापदायक असते. पोपटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे बदल घडवून आणण्यासाठी किती ताप सहन केला असेल, हे कल्पनेनंच समजून घ्या. आपला देश फक्त गप्पा मारून महासत्ता होणार नाही. त्या साठी प्रत्येक गावात पोपटराव पवार तयार व्हावे लागतील आणि सगळ्यांनी अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी तन मन आणि धनाने उभे राहावं लागेल

Sai College Of Computer Education, Natural Power Group Ranjani
30/07/2016

Sai College Of Computer Education, Natural Power Group Ranjani

30/07/2016

बावनकशी : ‘गोड’ माणूस!
भैरवनाथ तथा बी. बी. ठोंबरे हा मराठवाडय़ाच्याच नव्हे, तर अवघ्या उद्योग-कृषीविश्वाच्या यशाचा एक आलेख

बी. बी. ठोंबरे यांनी जिद्दीने शिक्षण तर घेतलेच; परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्या उद्यमशीलतेने व्यवसायाची उलाढाल आज तब्बल साडेचारशे कोटींच्या घरात नेली आहे. साखर, पोलाद ही उत्पादने रांजणीसारख्या खेडय़ातून निर्यात होतात. दूध आणि जलसंधारणाच्या कामात आदर्श ठरेल असे काम ठोंबरे उभे करत आहेत.
केवळ स्वत:च्या प्रगतीची स्वप्ने कितीही उत्तुंग असली, तरी सामूहिक प्रगतीची उदाहरणे समोर आली की ही स्वप्ने हिरमुसली होतात. कारण सामूहिक प्रगतीसाठी उत्तमाचा ध्यास, समूहाचा विकास आणि कष्टांची आस ही त्रिसूत्री रुजवावी लागते. ती आपोआप रुजत नसते. त्यासाठी मनाची तशी जडणघडण असावी लागते. असे मन घडण्यासाठी दुसऱ्याची दु:खे, समस्या स्वत: अनुभवाव्या लागतात. दुष्काळी मराठवाडय़ाला असंख्य समस्यांनी घेरले आहे. शेतकरी तर पुरता पिचला आहे. परंतु या पाश्र्वभूमीवरही आशेचे, नव्या उमेदीचे काही किरण चमकदारपणे या परिसराला उमेद देत आहेत. भैरवनाथ ठोंबरे हा असाच एक आशेचा किरण! या नुसत्या नावाच्या उच्चारानचे शेतकऱ्यांच्या नजरेतील निराशेचे सावट दूर होताना दिसते. कारण या माणसाने समस्यांना संपविण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी अगोदर साऱ्या समस्या स्वत: अंगावर घेतल्या आणि त्यांच्याशी संघर्ष करून त्या परतवून लावल्या. भैरवनाथ ठोंबरे यांच्यापासून आता समस्या दूरच उभ्या राहतात.
भैरवनाथ तथा बी. बी. ठोंबरे हा मराठवाडय़ाच्याच नव्हे, तर अवघ्या उद्योग-कृषीविश्वाच्या यशाचा एक आलेख आहे. शिखरावर पोहोचेपर्यंत कधीही त्याने उतरणीची दिशा पाहिलेली नाही. रांजणी हे तसे छोटेसे गाव. तिथे फक्त चौथीपर्यंतचीच शाळा. त्यानंतर शिकायचे तर बाहेरगावी जावे लागे. ज्यांची परिस्थिती चांगली असे त्यांची मुले परगावी शिकायला जायची. भैरवनाथच्या घरची स्थिती तशी नाजूकच. अगदी खायचे-प्यायचे वांदे जरी नसले, तरी परगावी मुलाला शिकायला ठेवून पैसा देता येईल अशीही नव्हती. त्यामुळे चौथीनंतर शाळा सुटली. वडिलांनी सांगितले, ‘आता शेतातली कामं कर!’ तेव्हा भैरवनाथसमोर मुकाटपणे घरची गुरे राखण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग सहा महिने गुरांमागे भटकण्यात गेले. रांजणीच्या शाळेत एक चुणचुणीत मुलगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भैरवनाथला याचे खूप वाईट वाटत होते. भैरवनाथचे शिक्षण सुटल्याचे त्याच्या आजोबांना समजले. तेव्हा त्यांनी त्याला येरमाळाजवळील कडकनाथवाडीतील शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. गावाहून आई-वडिलांना सोडून जाताना भैरवनाथला वाईट वाटले नाही, कारण त्याला पुढे शिकायचे होते. पाचवीत इंग्रजी शिकणाऱ्या भैरवनाथाचे नाव आता ‘बी. बी.’ झाले होते. पुढे बी. बी. ठोंबरे या नावाची जादू ‘नॅचरल’मुळे सर्वदूर पसरली.
एखाद्याची प्रगती किती वेगवान असू शकते? त्यांच्या व्यवसायाची उलाढाल आज तब्बल साडेचारशे कोटींच्या घरात गेली आहे. साखर, पोलाद ही उत्पादने रांजणीसारख्या खेडय़ातून निर्यात होतात. दूध आणि जलसंधारणाच्या कामात आदर्श ठरेल असे काम बी. बी. ठोंबरे उभे करत आहेत. साखर कारखानदारीच्या क्षेत्रात ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागले आहेत.
हे सगळे घडले ते शिक्षणामुळे. चौथीनंतर प्रत्येक टप्प्यावर शिक्षणासाठी संघर्ष सुरू झाला. जिथे सोय होईल तिथे जायचे, पण शिक्षण अध्र्यावर सोडायचे नाही, हे भैरवनाथ ठोंबरेंनी पाचव्या इयत्तेतच मनाशी पक्के ठरवले होते. कडकनाथवाडीलाही शाळा फक्त सातवीपर्यंतच. त्यामुळे १९६४ साली पुन्हा त्यांना पुढील शिक्षणासाठी बार्शीला जावे लागले. आजोबांनीच शिक्षणाचा भार उचलला. दर आठवडय़ाला आजोबा डोक्यावर शिधा घेऊन बार्शीला यायचे. पुढे आठवडाभर हाताने ते स्वयंपाक करायचे आणि शिकायचे. खडतर परिस्थितीत तावूनसुलाखून, अपार कष्ट उपसत शिक्षण घेतले की सरस्वती प्रसन्न होते म्हणतात. दहावीत सोलापूर जिल्ह्यतून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या भैरवनाथाच्या डोळ्यात इतर हुशार मुलांसारखीच डॉक्टर किंवा इंजिनीअर बनण्याची स्वप्ने तरळत होती. पण या शिक्षणासाठी तेव्हा पाच हजार रुपये लागायचे. तेवढी रक्कम त्यांच्यापाशी नव्हती. म्हणून मग त्यांनी बार्शीच्या प्रभावती झाडबुके महाविद्यालयात कॉमर्सला प्रवेश घेतला. कारण या महाविद्यालयात तेव्हा विज्ञान शाखा नव्हती. पुढे एम. बी. ए. करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले आणि पुढच्या आयुष्याची दिशा हळूहळू स्पष्ट होऊ लागली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्यांना नोकरी मिळाली. पण तिथे त्यांचे मन काही रमले नाही. ज्या मातीतून आपण आलो तिथेच पुन्हा जाऊ या असे म्हणत त्यांनी मराठवाडय़ातील अंबाजोगाई साखर कारखान्यात लेखापाल म्हणून नोकरी पत्करली. पुढे भास्करराव खतगावकरांच्या कारखान्यात मुख्य लेखाधिकारी आणि नंतर शिवराज पाटील चाकूरकर प्रवर्तक असलेल्या नळेगाव कारखान्यावर बी. बी ठोंबरे रुजू झाले. त्यांची कामावरची निष्ठा आणि पद्धत तोपर्यंत अनेकांना माहीत झाली होती.
कशी होती त्यांच्या कामाची पद्धत?.विलासराव देशमुखांच्या मांजरा कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक पदावर ते काम करत होते. कारखान्याच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. विलासरावांच्या विरोधकांनी आरोपांची राळ उठवली होती. मनोहर गोमारे हे त्यांचे विरोधक. ते मांजराचे सभासद असतानाही त्यांचा ऊस गाळपासाठी आणला जात नव्हता. एवढा विरोध करणाऱ्या व्यक्तीचा ऊस गाळपच करू नका, असे सांगणाऱ्या संचालकांची संख्या अधिक होती. गळित हंगाम संपत आला होता. गोमारेंचा ऊस गाळप होणार नाही, असेच सर्वजण सांगायचे. तेव्हा ठोंबरेंनी धाडसाने विलासरावांना सांगितले, ‘ते कारखान्याचे सभासद आहेत. राजकारण काहीही असले तरी नियमानुसार त्यांचा ऊस आणणे बंधनकारक आहे.’ ठोंबरेंचे म्हणणे विलासरावांना पटले. गोमारेंच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी एक दिवस अधिकचा कारखाना सुरू ठेवला गेला. त्यातून असा संदेश गेला की, विलासराव सुडाचे राजकारण करीत नाहीत. विरोधकांचा ऊस अगदी निवडणुकीतही गाळप होतो. याचा पुढे विलासरावांना निवडणुकीत लाभच झाला. त्यातून नियमांचा आग्रह धरणारा, योग्य नियोजन करणारा माणूस अशी बी. बी ठोंबरेंची प्रतिमा निर्माण झाली.
राजकीय पटलावर तेव्हा बऱ्याच घडामोडी घडत होत्या. १३ दिवसांच्या अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारकडून गोपीनाथ मुंडे यांना परळीत कारखाना काढण्याची परवानगी मिळाली तेव्हा ठोंबरेंना त्यांनी बोलावून घेतले. विलासरावांनीही त्यांना परवानगी दिली आणि वैद्यनाथ साखर कारखान्याच्या उभारणीत व त्याची घडी बसवून देण्यातही बी. बी. ठोंबरेंनी सिंहाचा वाटा उचलला. सरकारने याच काळात खासगी साखर कारखान्यांनाही परवानगी दिली. तेव्हा पहिला अर्ज बी. बी ठोंबरे यांनी केला. रांजणीच्या ज्या शेतात आपले आई-वडील राबले, तेथेच कारखाना उभा करण्याचे स्वप्न ठोंबरे यांनी पाहिले. १८ कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीतून हा खासगी साखर कारखाना उभा राहिला. आता त्याची क्षमता पाच हजार मेट्रिक टन ऊस गाळपाची आहे. इथेनॉल, आसवानी प्रकल्प सुरू करतानाच वीजनिर्मिती करण्याचेही त्यांनी ठरविले. त्यांनी सहा मेगावॅट वीजनिर्मिती केली; पण त्या विजेची खरेदी करण्यास कोणीच तयार नव्हते. ही ऊर्जा वाया जाऊ नये म्हणून त्यांनी पोलादनिर्मिती सुरू केली आणि या क्षेत्रातही भरारी घेतली. रांजणीहून पाकिस्तानला पोलाद निर्यात होऊ लागले.
व्यवसाय सांभाळताना जगाचे भान असावे लागते. साखरेच्या क्षेत्रातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आपल्या कारखान्याकडे असावे, त्यात उत्तम व्यवस्थापन असावे, यासाठी केवळ कर्मचाऱ्यांसमोर भाषणे झोडून चालत नाहीत, तर झपाटलेल्या सहकाऱ्यांचा संच तयार करावा लागतो. त्यासाठी नेत्याकडे संघटनाचे असामान्य कौशल्य असावे लागते. बी. बी. ठोंबरेंच्या नॅचरल शुगरमध्ये काम करणारी मंडळी रांजणीसारख्या गावातही युनिफॉर्ममध्ये कारखान्यात येतात. मराठवाडय़ात कारखाना असूनही यंत्रणेत कुठल्याही प्रकारे आळस येणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेतात. म्हणूनच गंधकविरहित अतिशुद्ध साखरेची निर्यात करण्याचे स्वप्न गेल्या सात वर्षांपासून इथे वास्तवात अवतरले आहे.
ऊस टिकवायचा असेल तर पाणी असायला हवे. मराठवाडय़ातील पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने जलसंधारणाची कामे हाती घेणारा हा एकमेव कारखाना असावा. एवढेच नाही तर उसातील पाण्याचा प्रक्रियेसाठी पुनर्वापर करत साखर कारखानदारीला इथे नवे आयाम लाभले. केवळ ऊसच नाही, तर बगॉससाठी लागणाऱ्या तुराटय़ा-पराटय़ासुद्धा त्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या. ७५० रुपये प्रतिटन तुराटय़ांना व टाकाऊ कचऱ्यालाही त्यांनी भाव दिला. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या बी. बी. ठोंबरे यांनी दूधप्रक्रिया उद्योग सुरू केला. सहकारी तत्त्वावरील पतसंस्थांचे मोठे जाळे उभे केले. गावातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी उभारली. ‘नॅचरल’च्या परिसरात कुणासही व्यसन करता येणार नाही असा त्यांचा दंडक आहे. दारू, गुटखा व धूम्रपान न करणारे कर्मचारी आज ‘नॅचरल’च्या यशाची कमान उंचावत आहेत. कर्मचारी चांगले असतील तरच उद्योगाचा डोलारा टिकतो, हे
माहीत असल्याने अनेक योजना ते हाती घेत असतात. कर्मचाऱ्यांच्या वृद्ध माता-पित्यांना व्यवस्थित आयुष्य जगता यावे यासाठी त्यांच्या पगारातील दहा टक्के रक्कम कापून घेऊन आई-वडिलांच्या खात्यात भरली जाते. त्यामुळे कर्मचारी मानसिकदृष्टय़ा नीटपणे काम करू शकतो असा दावा ठोंबरे करतात. ग्रामीण भागात असो किंवा शहरात, व्यवसाय वाढवायचा असेल तर माणसे बांधावी लागतात, असे ते म्हणतात. शिकायला मिळेल की नाही, अशा वातावरण वाढलेले ठोंबरे आज स्वत: तर मोठे झालेच आहेत; त्याचबरोबर सबंध रांजणी पंचक्रोशीतील अर्थकारणही त्यांच्याशी निगडित झाले आहे. ते सध्या खासगी साखर कारखानदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. विविध सरकारी समित्यांवर ते काम करतात. समस्येची नाहक चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे मराठवाडय़ात बी. बी. ठोंबरेंची ओळख ‘गोड’ माणूस अशीच होते.

Address

At. Ranjani Tq. Kalamb Dist. Osmanabad
Ranjani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natural Power Group Ranjani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share