01/11/2024
जय राघोजी जय बिरसा जय आदिवासी
वार मंगळवार दि 29/ ऑक्टोबर 2024
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे धरती आबा भगवान बिरसा मुंडा, क्रांतिकारक राया ठाकर यांची संयुक्त जयंती व वाघबारस उत्सव पाचनई, अंबित फाटा ता अकोले जि अहमदनगर.
क्रांतिकारक प्रतिमांची भव्य शोभायात्रा, वाघोबा दर्शन, क्रांतीकारक,आदिवासी कुळसाय प्रतिमांचे पूजन, मान्यवर सन्मान व लहान मुलांचा आदिवासी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम,कांबड नृत्य.
आदिवासी समाज्याची ओळख आदिवासी संस्कृतीमुळेच आहे. आदिवासी संस्कृती आत्मसात केली पाहिजे व तिचे संवर्धनही केले पाहिजे. प्रा सुनील देवरे सर ( नागोटने, रायगड जिल्हा ).
मार्गदर्शक -आदि प्रा सुनील देवरे सर(
1)आदिवासी समाजाने संस्कृती सवर्धन करता करता शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. आदिवासी समाजात वेगवेगळ्या जमाती असल्या तरी आदिवासी या नावाने सर्वांनी एकत्र यावे. संविधानिक हक्क अधिकार यांची माहिती करून घ्यावी. आदिवासी समाजाने शिक्षणात पुढे यावे. तरुणांनी व्यसनाधीनते पासून चार हात लांबच राहिलेले चांगले. असे मत प्रा. सुनील देवरे सर यांनी मांडले.
2)आदि. रामनाथ भोजने साहेब - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, मुबंई विभाग ) -
आदिवासी समाजाला क्रांतिकारकांचा वारसा आहे. डॉ गोविंद गारे साहेब यांच्या मदतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे ठाणे सेंट्रल जेल येथील स्मारक शोधून काढले. आदिवासी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे.
3)आदि धर्मा दिघे सर ( समन्वयक -आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड सह्याद्री )
आदिवासी समाजाला क्रांतिकारकांचा वारसा लाभलेला आहे क्रांतिकारकांनी जल जंगल जमिनीचा लढा दिला तो लढा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे आहे तो कोणत्याही धर्माचा नाही. आपण कोणत्याही धर्माला नाव ठेवत नाही परंतु आदिवासी समाजाने आपले आदिवासी संस्कृती जपावी आणि तिचे संवर्धन करावे. आदिवासी क्रांतिकारकांचे व आदिवासी
कुळसायांचे यांचे फोटो प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये लावावेत असे मत धर्मा दिघे सर यांनी मांडले.
4) वसंत मुठे सर ( समन्वयक - आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड सह्याद्री)
आदिवासी समाजाची दिवाळी वाघबारस सनापासून सुरु होते. आदिवासी समाज निसर्ग पूजक आहे. निसर्गाला देव मानतो. निसर्गातील झाडे झुडपे पशुपक्षी वेली प्राण्यांना देव मानणारा हा आदिवासी समाज. जनावरांचा रक्षण व्हावे म्हणून
वाघबारस सण साजरा केला करतो. आदिवासी संस्कृती ही जगात महान आहे हे सर्व जगाने मान्य केलेलं आहे. परंतु आदिवासी संस्कृती संपवण्याचा घाट घातला जात आहे. आदिवासी संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु ही आदिवासींची शेवटच्या पिढीकडून शेवटच्या पिढीसाठी लढली जाणारी शेवटची लढाई आहे आणि यात आपण कुठेच कमी पडणार नाही असा निर्धार आपण करूया आणि एकत्र येऊया आपल्याला आदिवासी क्रांतिकारकांचा बंडाचा वारसा लाभलेला आहे. गावागावांमध्ये घोंगडी बैठक घेऊन समाज जागृती चे काम बिरसा ब्रिगेड करत आहे या सामाजिक वैचारिक चळवळीमध्ये आपण सर्वांनी जोडले जावे असे आवाहन सरांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे साहेब यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधला.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी यांना सर्व ग्रामपंचायती( लव्हाळी ओतूर,लव्हाळी कोतुळ, अंबित, पाचनई )व नोकरदारांच्या वतीने शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
शेवटी सर्वांना वाघबारस निमित्त खीर भात गोड जेवण व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे आयोजक. ग्रामपंचायत पाचनई सरपंच आदि भास्कर दादा बादड, उपसरपंच, पोपटराव गावंडे. सर्व सदस्य व ग्रामस्थ, ग्रामपंचायत लव्हाळी सरपंच आदि प्रकाश लहामटे, उपसरपंच, व समस्त ग्रामस्थ.ग्रामपंचायत अंबित सरपंच...... उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ.व कुमशेत गावचे सरपंच व आदिवासी कार्यकर्ते समाज बांधव
सर्व नोकरदार - विष्णू भारमल सर, बाळु भारमल किसन बादड. सखाराम भारमल. भिका गावंडे. भाऊ गावंडे सर सर, बोटे सर . मनोहर पथवे. मुरलीधर धादवड. रामचंद्र गिरे. रानकवी मीनानाथ उघडे आदिवासी समाजसेवक सखाराम गांगड वाळू भौरले. चिधु भांगरे. लोकपंचायतचे उबाळे सर त्यांचे सहकारी यांनी वन कायदा हक्क.,.,
आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड.
उपस्थित -
सातेवाडी येथून आलेले आदि नामदेव मुठे ( समन्वयक आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड ), एकनाथ मुठे ( उपाध्यक्ष बिरसा ब्रिगेड अकोले )किसन दिघे ( पेसा अध्यक्ष व बिरसा ब्रिगेड शिलेदार ) दुलाजी दिघे ( चेअरमन आदिवासी सोसायटी व बिरसा ब्रिगेड शिलेदार ) जिजाराम मुठे ( पेसा अध्यक्ष व बिरसा ब्रिगेड शिलेदार )
पाचनई, कुमशेत, अंबित, लव्हाळी व पंचक्रोशीतील समस्त आदिवासी समाज बांधव माता भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्वांना मानाचा सन्मानाचा जय आदिवासी.
जय राघोजी, जय बिरसा, जय राया ठाकर, जय आदिवासी. 🏹☘️🍃
आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान.
गुलगुलान जारी है जारी रहेगा. 🌲🏹☘️🍃🌲🏹
जय आदिवासी 🏹☘️🍃
#बिरसा #ब्रिगेड #आदिवासी