प्रबुद्ध भारत

प्रबुद्ध भारत मनुष्यमात्रांच्या पूर्णतेसाठी मनुष्य मात्रास पूर्णतेला नेण्यासाठी आम्ही झगडत आहोत

08/04/2026

आज जय भीम मित्र मंडळ व धम्मदीप युवा मंचचे अजय साळवे , भूषण साळवे, अक्षय लोंढे आदी अधिकारीवर्ग आणि जयंती उत्सव समिती यांचे विद्यमाने आयोजित केलेल्या काळजावर कोरले भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांच्या संगीतमय अभिवादन मध्ये मी, शिरीष गायकवाड, डॉ.ना.म.साठे, डॉ.प्रमोद निशिगंध, विस्तार अधिकारी विनीतकुमार कांबळे, सातपुते सर, रासकर सर, अनुसंगम शिंदेसर इत्यादी सहभागी झाले, नाचले, इतका मोठा महिलांचा सहभाग राहुरीत प्रथमच पाहिला.१९८४ ला पासून लहान थोर लेकरांनी‌ वाढविलेले रोपटे पाहून मन भरून आले.
आयुष्यात पहिल्यांदाच तरुणांसोबत उड्या मारल्या.

आज जय भीम मित्र मंडळ व धम्मदीप युवा मंचचे अजय साळवे , भूषण साळवे, अक्षय लोंढे आदी अधिकारीवर्ग आणि जयंती उत्सव समिती यांच...
08/04/2026

आज जय भीम मित्र मंडळ व धम्मदीप युवा मंचचे अजय साळवे , भूषण साळवे, अक्षय लोंढे आदी अधिकारीवर्ग आणि जयंती उत्सव समिती यांचे विद्यमाने आयोजित केलेल्या काळजावर कोरले भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांच्या संगीतमय अभिवादन मध्ये मी, शिरीष गायकवाड, डॉ.ना.म.साठे, डॉ.प्रमोद निशिगंध, विस्तार अधिकारी विनीतकुमार कांबळे, सातपुते सर, रासकर सर, अनुसंगम शिंदेसर इत्यादी सहभागी झाले, नाचले, इतका मोठा सहभाग राहुरीत

प्रश्न- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हिंदू समाजात एकजूट करण्यासाठी होते...            मोहन भागवत             सरसंघचाल...
05/04/2026

प्रश्न- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हिंदू समाजात एकजूट करण्यासाठी होते...
मोहन भागवत
सरसंघचालक
उत्तर - हे आपल्या खूप उशिरा लक्षात आले. आता ती वेळ निघून गेली आहे.
हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
बाबासाहेब रिडल्स इन हिंदूझम मध्ये बाबासाहेबांनी हिंदूंना किराणा दुकानाची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे किराणा दुकानात किराणा नावाची कोणतीही वस्तू मिळत नाही. त्याचप्रमाणे हिंदू नावाची कोणतीही व्यक्ती जगात उपलब्ध नाही. तो स्वतःला हिंदू म्हणून घेण्याऐवजी स्वतःच्या जातीतच जास्त गुंतवून घेतो. नाशिकच्या भोंदू लक्ष्मण खरात (त्याने धारण केलेल्या अशोक नाव स्वीकारण्याची पण एक भोंदूगिरी आहे.) याची जात शोधत होते. भारतात पदावर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सगळे हिंदू आहेत. परंतु हे भाजप व आर एस एस यांनाच मान्य नाही. कारण हे‌ लोक हिंदूराष्ट्राची मागणी करत‌ आहेत. हा काय प्रकार आहे ? हे लोक राष्ट्रपती द्रौपदी मुर्म आदिवासी, मोदी ओबीसी म्हणून उल्लेख करतात. हिंदू म्हणून करत नाहीत.
बाबासाहेबांनी एकजूट नाकारणारा मनुस्मृती जाळली. ती नाकारण्याऐवजी पिल्लावळ विषमतावादी, फुटीरतावादी ग्रंथाला उजाळा देतात. हे कशासाठी?
डॉ. आंबेडकर एकजूट करण्यासाठी झगडतात.‌ हे मान्य असेल तर बाबासाहेबांच्या मार्गावर चला. पोटात एक, ओठात दुसरे ठेवू नका.
एवढे केले तरी भारताला जगात तोड नाही.

बुद्धिस्ट सेमिनरी राहुरी बुद्धिस्ट वार्ता बुलेटीन चैत्र पौर्णिमा
02/04/2026

बुद्धिस्ट सेमिनरी राहुरी
बुद्धिस्ट वार्ता बुलेटीन
चैत्र पौर्णिमा

शरद पोंक्षे बकवास बंदमनुस्मृतीतील हे सॅंपल वाचावेत.जिथे तिथे नाटक बंद......​श्लोक (८.२७०):​एकजातिर्द्विजातींस्तु वाचा दा...
01/04/2026

शरद पोंक्षे
बकवास बंद
मनुस्मृतीतील हे सॅंपल वाचावेत.
जिथे तिथे नाटक बंद......

​श्लोक (८.२७०):
​एकजातिर्द्विजातींस्तु वाचा दारुणया क्षिपन् ।
जिह्वायाः प्राप्नुयाच्छेदनं जघन्यप्रभवो हि सः ॥

अर्थ: जर शूद्राने (ओबीसी) उच्च वर्णीयांचा (द्विज) कठोर शब्दांत अपमान केला, तर त्याची जीभ कापून टाकावी, कारण तो खालच्या कुळात जन्मला आहे.

​श्लोक (८.२८१):
​शतम्राधममध्यर्थं दण्डमर्हति पार्थिवः ।
शूद्रो द्विजातिं प्रहरन् येन येनाङ्‌गताडयेत् ॥

अर्थ: शूद्राने ज्या अवयवाने उच्च वर्णीयाला मारले असेल, त्याचा तोच अवयव कापून टाकावा.

​श्लोक (१०.१२९):
​शक्तेनापि हि शूद्रेण न कार्यो धनसंचयः ।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राह्मणानेव बाधते ॥

अर्थ: शूद्रामध्ये संपत्ती साठवण्याची क्षमता असली तरी त्याने ती साठवू नये. कारण शूद्राकडे पैसा आला तर तो ब्राह्मणांना त्रासदायक ठरू शकतो.

​श्लोक (९.३):
​पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थाविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ॥

अर्थ: बालपणात पिता रक्षण करतो, तारुण्यात पती रक्षण करतो आणि वृद्धपकाळात पुत्र रक्षण करतो; स्त्री कधीही स्वातंत्र्यास पात्र नसते.

​श्लोक (५.१४७):
​बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता ।
न स्वातन्त्र्येण कर्तव्यं किंचित्कार्यं गृहेष्वपि ॥

अर्थ: स्त्री लहान असो, तरुण असो किंवा वृद्ध, तिने आपल्या घरातदेखील कोणतेही काम स्वतंत्रपणे (पुरुषाच्या परवानगीशिवाय) करू नये.

​श्लोक (५.१५४):
​विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः ।
उपचर्यः स्त्रिया साध्व्या सततं देववत्पतिः ॥

अर्थ: पती चारित्र्यहीन असला, दुसऱ्या स्त्रीच्या आहारी गेलेला असला किंवा सद्गुणांचा अभाव असला, तरी साध्वी स्त्रीने त्याला नेहमी देवाप्रमाणे पुजावे.

⁉️समाजाचा मिलिंद प्रश्न - खरात आणि वैद्य यांना संभाजी भिडे वेगवेगळ्या शिक्षा का सुनावतात?उत्तर - भिडे यांच्याकडून वेगळी ...
30/03/2026

⁉️समाजाचा मिलिंद प्रश्न - खरात आणि वैद्य यांना संभाजी भिडे वेगवेगळ्या शिक्षा का सुनावतात?

उत्तर - भिडे यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. भिडे, पोंक्षे, तुषार भोसले ही मंडळी विषमतेचे प्रबळ समर्थक आहेत. भारतात जातीव्यवस्था आणि ब्राह्मण वर्णाचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी जो समूह कार्यरत आहे त्यांचे हे घोषित- अघोषित प्रतिनिधी आहेत. हे नाव शिवरायांचे, शंभूराजे यांचे घेतात. काम‌ मात्र परशूरामाचे करतात. त्यासाठीच या मतांचा मीडिया त्यांना वारेमाप प्रसिद्धी देत असतो. त्यांना सोयीस्कर प्रश्न विचारत असतो. त्यांची लबाडी झाकत असतो. भिडे यांनी छत्रपती शिवरायांचे 32 मण सोन्याचे सिंहासन करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी महाराष्ट्रभर सभा घेतल्या. त्यात किती माया जमा केली, हे कोणताही पत्रकार त्यांना विचारत नाही. फक्त खरात प्रकरण उघडकीस आले, त्यावेळी हे महाशय बोलले नाहीत. वैद्य प्रकरण येताच मिठू मिठू बोलू लागले. ते अद्यापही मनु संहितेतच जगत आहेत. मनुने ब्राह्मणांना दिलेले न्यायाधीशाचे अधिकार बिनधास्त वापरत आहेत.
खरात प्रकरणी साधी पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
बीफ विक्रीचे गडकरी कंपनी प्रकरण व्हायरल करताच मुकेश मोहन वर कारवाई करण्यात आली. डॉ संग्राम पाटील यांची अडवणूक केली.
मनोहर भिडे मात्र कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना मनु संहितेनुसार शिक्षाच जाहीर करतात. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचे गुन्हे दाखल केले जात नाहीत.‌
खरातला मारून टाकण्याची आणि
वैद्यला फक्त समज देऊन सोडण्याची शिक्षा जाहीर करतात. कारण वैद्य ब्राह्मण आहे.खरात ब्राह्मण नाही.
ब्राह्मणांना अनेक संहिता,पुराणांनी सर्व वर्ण, जातीच्या महिलांना उपभोगण्याचे अधिकार दिलेले आहेत. ऋषिकेश वैद्य याचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी सरकार एसआयटी स्थापन करत नाही. भिडे तशी मागणी करत नाहीत. खरातच्या गुन्ह्यांच्या समर्थनार्थ कोणताही समाज पुढे आला नाही. वैद्यच्या समर्थनार्थ ब्राह्मणांच्या टोळ्या पुढे येत आहेत.
पुरोहिताचा अधिकार असल्यामुळे त्यांनी समाजात विशिष्ट मानसिकता निर्माण केली आहे. ब्राह्मणांनी गुन्हा केला,उघड झाला तर फक्त त्या व्यक्तीला दोष दिला जातो.
“हे चुकून ब्राह्मण समाजात जन्माला आला” असे म्हणतात. तेच ब्राह्मणेतर समाजातील व्यक्तीने गुन्हा केला तर म्हणतात, “ हा समाज सुधारणार नाही. ”
म्हणजे इतरांसाठी सर्व समाज, सर्व जात गुन्हेगार ठरवण्यासाठी हे लोक टपलेलेच असतात.
खरातचे कांड उघडकीस येताच हे जात्यांध, धर्मांध लोक त्याची जात,धर्म शोधू लागले. त्यात कोणताही शेंडी जाणव्यावाला नाही, ब्राह्मण समाज पार्टीचा नेता नाही, हे निश्चित झाल्यानंतरच सूत्रे हलविली जातात . मूळात खरातने ज्योतिष सांगणे ,हाच गुन्हा आहे. त्याच्यामुळे अनेक ज्योतिषांचे धंदे बसले. मी खरातच्या गुन्ह्यांचे अजिबात समर्थन करत नाही.आता कोणताही ब्राह्मणेतर व्यक्ती शंभर वर्षे ज्योतिष सांगण्याची हिंमत करणार नाही.‌ देवदासी सारख्या प्रथा निर्माण करून ब्राह्मणांनी आपल्या वासनांधेतेची आधीच सोय करून ठेवली आहे.
महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी नेतृत्वाखालील ब्राह्मणेतर पक्ष संपवण्याचीच मांडणी खरातच्या निमित्ताने चाललेली दिसते. खरातने ज्या ग्रंथांच्या आधारे स्वतःला श्रीकृष्ण घोषित केले. त्यांचेही संदर्भ,चर्चा घडवून आणायला हवी. ही समस्या राजकीय नसून धार्मिक व सामाजिक आहे.

सत्येंद्र तेलतुंबडे

समाजाचा मिलिंद प्रश्न- राज ठाकरे यांनी कांशीराम साहेबांच्या चळवळीची दखल घेतली आहे.उत्तर - चूक. कांशीराम साहेबांची चळवळ, ...
24/03/2026

समाजाचा मिलिंद प्रश्न- राज ठाकरे यांनी कांशीराम साहेबांच्या चळवळीची दखल घेतली आहे.
उत्तर - चूक. कांशीराम साहेबांची चळवळ, पक्ष संपला आहे. प्रथम शरद पवार यांनी वामन मेश्राम यांच्या कार्यक्रमात जाऊन संयुक्तपणे या चळवळीला तिलांजली देण्याचे संकेत दिले. अनैसर्गिक मूलनिवासी संकल्पनेचे बांडगूळ उभा करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर राहुल गांधी यांनी कांशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त पेनाचे उदाहरण दिले. चातुर्वर्ण्य समजून देताना कांशीराम साहेब नेहमी पेन हातात घेऊन ही रचना समजून देत असत. तेच प्रतीक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरले.‌ त्यात थोडा फरक केला. त्यांनी पेनापासून पेनाचे टोपण बाजूला केले. हे टोपण उच्चवर्णीय बीजेपी कडे असल्याचे सांगितले. शाई संपलेला रिकामा पेन दाखवला. ही कांशीराम साहेबांची चळवळ संपल्याची दुसरी तिलांजली होय.
कांशीराम साहेबांचे जवळचे कार्यकर्ते सुरेश माने यांनी शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवली. ज्या महादेव जानकर यांना मान्यवर कांशीराम साहेब मानस पुत्र समजत होते, ते महादेव जानकर भाजपसोबत गेले. आता भाजपने सर्व रस चोखून घेतल्यावर भटकत फिरत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. ज्या रामविलास पासवान यांनी कांशीराम साहेबांचा पॅटर्न अंगीकारुन स्वतःचा पक्ष उभा केला. त्यांचा मुलगा चिराग पासवान मोदींना सर्वस्व समजत आहे.
कांशीराम साहेबांच्या बहुजन पॅटर्नवर उत्तर प्रदेशात एडवोकेट मायावती चार वेळा मुख्यमंत्री झाल्या. त्याच राज्यात विधानसभेत त्यांचा एकही आमदार सध्या नाही. कांशीराम साहेबांनी ही चळवळ मिशन म्हणून उभा केली. स्वतःचे साधे बँक अकाउंटही त्यांनी चळवळ उभारल्यावर शिल्लक ठेवले नाही. त्यांच्या राजकीय वारसदार मायावतींनी करोडोची संपत्ती जमा केली. ताज कॉरोडार मध्ये अडकल्या. 2006ला बौद्ध दीक्षेच्या हिरक महोत्सवामध्ये कोट्यावधी अनुयायांसह मान्यवर कांशीराम साहेब बौद्ध दीक्षा घेणार होते. राजकीय स्वार्थासाठी तत्पूर्वीच त्यांना संपवण्यात आले. वारसदार असूनही कांशीराम साहेबांनी केलेल्या प्रतिज्ञाला मायावतींनी तिलांजली वाहिली. महापुरुषांचे मारेकरी सर्वप्रथम त्यांचे अनुयायी असतात. हे कार्ल मार्क्सचे विधान मायावतींनी खरे ठरविले. महाराष्ट्राची स्थिती सांगितली. उत्तर प्रदेशात तर बहुजन पॅटर्नवर झालेले उपमुख्यमंत्री, मंत्री योगी आदित्यनाथ यांचे भक्त बनले.

हिंदू संस्कृतीत माणसाला जिवंतपणी प्रचंड त्रास दिला जातो. मृत्यूनंतर त्याच्याविषयी चांगलेच बोलणे ही संस्कृती समजली जाते. अंत्यविधीनंतर मृत व्यक्तीचा दहावा तेरावा घातला जातो. याच विधीत मृताचे कौतुक करत त्याच्या सर्व कार्याला तिलांजली वाहिली जाते. म्हणजेच पूर्णविराम दिला जातो. मृताचे सर्व संपल्याचे तिलांजली ही संकेत असते. हाच संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.
कांशीराम साहेबांनी पेरलेले मिशनरी विचार अजूनही काही कार्यकर्त्यांच्या रोमारोमात भिनलेले आहेत. त्यांच्यासाठी चळवळीला अंतिम तिलांजली देत गोंजारण्याचा हा प्रकार आहे. बहुजन आता कोणत्याच अर्थाने बहुजन राहिले नसून वंचित झाले आहेत. हाच याचा उघड अर्थ आहे. आता या बहुजन चळवळींचा फक्त टाहो फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. ज्यासाठी रेशीम बाग हे एकमेव ठिकाण उरलेले आहे.

-सत्येंद्र तेलतुंबडे

समाजाचा मिलिंद प्रश्न - मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष अशोक खरात सारखे विकृत प्रकार बौद्ध समाजात का आढळतात?उत्तर - अनेकांच्...
24/03/2026

समाजाचा मिलिंद प्रश्न - मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष अशोक खरात सारखे विकृत प्रकार बौद्ध समाजात का आढळतात?

उत्तर - अनेकांच्या मनात, विचारात असा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. विकृत प्रकार बौद्ध समाजात आढळतात ही गोष्ट खरी आहे. भिक्षु, बौद्धाचार्य, धम्मचारी हा प्रश्न थोडासा बदल करून असा विचारला पाहिजे की, असे विकृत प्रकार बौद्ध धर्मात आढळतात का? बौद्ध धर्मामध्ये अशा विकृतीला संधी मिळते काय?
प्रश्नात असा बदल केल्याने आपल्या उत्तरांमध्ये फरक पडतो.‌ बौद्ध समाजामध्ये विकृती आढळते .परंतु बौद्ध धम्मामध्ये कोणतीही विकृती आढळत नाही.
आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘ क्रांती आणि प्रतिक्रांती ’ या ग्रंथामध्ये याचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. ब्राह्मणी धर्मात अविद्येलाच विद्या संबोधले जाते ही सर्वात मोठी समस्या आहे. ब्राह्मण लोक अशा तांत्रिक, मांत्रिक ,ज्योतिषावर आपली उपजीविका चालवत असतात. त्यामध्ये सम्यक आजीविकेचा कुठलाही अंश नसतो. आजही अनेक लोक मिथ्या आजीविकेने जीवन जगतात. त्यातही ब्राह्मणेतर कुणी अशा प्रकारचे जीवन जगत असल्यास त्याच्यावर अनेक संकटे आणली जातात. बहुजन समाज विस्थापित आहे. अनेक समस्याने ग्रासलेला आहे. या समस्या खरे म्हणजे दुःख आहे. ही वस्तुस्थिती टाळून त्यावर पोट भरले जाते.
अशोक खरात भोंदू बाबा म्हणून चर्चेत येताच लोक त्याची जात शोधू लागले. खरात ब्राह्मण असता किंवा त्यांचा एखादा भक्त ब्राह्मण असता तर गोदी मीडियाने हे प्रकरण उचलून धरले नसते. त्यातही हे प्रकरण अजित पवार यांच्या अपघाताशी‌‌ जोडून दिशाभूलही केली जात आहे. काही उथळ नामधारी बौद्धही यात रस घेत आहेत. अनेक भोंदू बाबा आपल्या चारित्र्यहिनतेला श्रीकृष्णाचा आदर्श पुढे ठेवतात. आपल्या व्यसनाधीनतेला शिव शंकराचा आदर्श पुढे ठेवतात. बौद्ध धम्मा मध्ये आदर्श शीलावर आधारित आहे. त्याही पुढे जाऊन बोलायचे झाल्यास बौद्ध धम्मात शील हाच आदर्श आहे.
आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा संस्कार विधी शिवाय बौद्ध होऊ शकत नाही. त्यात बौद्धप्रतिज्ञेंचा समावेश केला. त्यातील १३ते१७ प्रतिज्ञा शील पालन करण्याच्या आहेत. हे पालन करणाराच बौद्ध आहे. त्यामुळे आदर्श समाजात‌ विकृती आढळत नाहीत.
हल्ली विशिष्ट जातीत जन्मलेल्या व्यक्तींनी,समुहाला बौद्ध म्हणण्याची कुप्रथा सुरू झाली. काहींनी‌ जयभीमवाला ही संबोधू लागले आहेत.याला वेळीच आळा घातला पाहिजे.
भोंदू खरात संविधानानुसार , भगवान बुद्धांच्या शीलानुसार गुन्हेगार आहे. चातुर्वर्ण्यानुसार गुन्हेगार आहे. अधम्मालाच धर्म समजणारांसाठी गुन्हेगार नाही.

-सत्येंद्र तेलतुंबडे

आधुनिक बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथात चीनी धम्मपद समाविष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले होते . त्या प्रमा...
23/02/2026

आधुनिक बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथात चीनी धम्मपद समाविष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले होते . त्या प्रमाणे त्यांनी समाविष्ट केले.
माहितीसाठी श्रद्धा वग्ग


चिनी धम्मपदातील (फा-चू-चिंग) दुसरा वग्ग 'श्रद्धा वग्ग’ (Faith Chapter) हा १८ गाथांचा आहे. त्याचा जसाच्या तसा मराठी अनुवाद खालीलप्रमाणे आहे:

श्रद्धा वग्ग (द्वितीय वग्ग)
१. श्रद्धा हे सर्व धर्मांचे मूळ आहे आणि ते सर्व पुण्यांचे पोषण करते. श्रद्धा संशयाचा नाश करते आणि माणसाला संसाराच्या पलीकडे नेते.
२. ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरात डोळे महत्त्वाचे आहेत, तशीच जीवनात श्रद्धा महत्त्वाची आहे. डोळ्यांशिवाय जसा प्रकाश दिसू शकत नाही, तसे श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.
३. श्रद्धा हे एक महान धन आहे, जे कोणीही चोरू शकत नाही. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, तो या जगात खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे.
४. जो मनुष्य श्रद्धेने धम्माचे अनुसरण करतो, तो त्या बीजाप्रमाणे आहे जे सुपीक जमिनीत पेरले जाते आणि पुढे जाऊन मोठे फळ देते.
५. श्रद्धा ही माणसाची सर्वात चांगली मैत्रीण आहे. ती संकटात आधार देते आणि चुकीच्या मार्गावरून जाण्यापासून वाचवते.
६. ज्याप्रमाणे हत्ती चिखलात रुतलेला असताना आपल्या शक्तीने बाहेर पडतो, त्याचप्रमाणे श्रद्धावान माणूस दुःखाच्या चिखलातून स्वतःला बाहेर काढतो.
७. श्रद्धा ज्ञानाला जन्म देते आणि ज्ञान शांतीकडे नेते. ज्याच्याकडे श्रद्धा नाही, त्याचे मन नेहमी अशांत आणि विचलित राहते.
८. जसे शुद्ध पाणी तहान भागवते, तसे शुद्ध श्रद्धा मनाची तृष्णा शांत करते.
९. बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यावर ज्याची अतूट श्रद्धा आहे, तो मनुष्य कधीही दुर्गतीला प्राप्त होत नाही.
१०. श्रद्धा म्हणजे केवळ आंधळेपण नव्हे, तर सत्याची जाणीव झाल्यावर मनाची झालेली स्थिरता होय.
११. ज्याप्रमाणे पर्वत वाऱ्याने हलत नाही, त्याप्रमाणे ज्याची श्रद्धा दृढ आहे, तो जगातील सुख-दुःखांनी विचलित होत नाही.
१२. श्रद्धा हे अमृत आहे, जे प्राशन करणारा माणूस मृत्यूच्या भयावर विजय मिळवतो.
१३. जो मनुष्य पवित्र श्रद्धेने दान देतो, त्याचे पुण्य अनंत पटीने वाढते.
१४. ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात दिवा मार्ग दाखवतो, तसे श्रद्धा जीवनाच्या प्रवासात मनुष्याला योग्य दिशा दाखवते.
१५. श्रद्धा ही सर्व मंगल गोष्टींची सुरुवात आहे. श्रद्धेशिवाय केलेले कोणतेही धार्मिक कृत्य फळ देत नाही.
१६. ज्याप्रमाणे जमीन सर्व ओझे सहन करते आणि जीवनाचे पोषण करते, तशीच श्रद्धा सर्व कर्मांचा आधार आहे.
१७. श्रद्धेमुळे मनुष्याला अहंकारापासून मुक्ती मिळते आणि तो नम्र होतो.
१८. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन जागरूक राहतो, तोच या संसारातील महान दुःखातून पार पडू शकतो.

https://www.facebook.com/share/p/1DtmvCE7ze/
19/02/2026

https://www.facebook.com/share/p/1DtmvCE7ze/

छत्रपती शिवाजी महाराज: एक द्रष्टे मॅनेजमेंट गुरू. स्वराज्याच्या उभारणीतील 'स्वॉट' (SWOT) विश्लेषण, नियोजनबद्धता आणि .....

18/02/2026
समाज का मिलिंद प्रश्न -हॅलो सर मेरा नाम धम्मदीप है। मेरे पास कुछ प्रश्न है और मैं प्रश्नों के कारण में पढ़ाई पर फोकस नही...
17/02/2026

समाज का मिलिंद प्रश्न -
हॅलो सर
मेरा नाम धम्मदीप है। मेरे पास कुछ प्रश्न है और मैं प्रश्नों के कारण में पढ़ाई पर फोकस नहीं कर पा रहा हूॅं। क्या आप मुझे मेरे प्रश्न का उत्तर दे सकते हैं?
प्रश्न -क्या बी आर आंबेडकर बुद्धिज़्म के देव या ३१ लोक पर विश्वास रखते थे?
उत्तर-
जय भीम,धम्मदीप,
आपसे जुड़कर ख़ुशी हुई। यह जानकर अच्छा लगा कि आप अपनी पढ़ाई को लेकर गंभीर हैं। मन में जब इस तरह के गहरे सवाल होते हैं, तो एकाग्रता (focus) में कमी आना स्वाभाविक है। चलिए, आपके संशय को दूर करते हैं ताकि आप वापस अपनी पढ़ाई पर ध्यान दे सकें।
डॉ. बी.आर. आंबेडकर देव या 31 लोक पर विश्वास रखते थे या नहीं, इसके उत्तर से आपकी कोई दु:ख मुक्ति होने वाली नहीं। आप दु:ख मुक्त होकर सुखी जीवन बिताने की पढ़ाई करो और उसी तरह जीवन बिताओं।

पहले तो बाबासाहब का बुद्धिज़्म भगवान बुद्ध के शिक्षा से अलग मानना गलत है। कोई भी भेद निर्माण करना भगवान बुद्ध की शिक्षा नहीं हो सकती।
मैं आपको आधुनिक बुद्ध बाबासाहेब
​डॉ. बी.आर. आंबेडकर के संदर्भ और भाषा में उत्तर देना चाहता हूं।

भगवान बुद्ध और उनका धम्म खंड 4 भाग 2 विभाग 5 में भ्रम के कारण
में बाबा साहब लिखते हैं,

6- भगवान बुद्ध के के जीवन काल में ही कई बार उनके वचनों के गलत प्रस्तुतीकरण की जानकारी उनको दी गई।
7-उदाहरण के तौर पर ऐसे पांच अवसरों का उल्लेख किया जा सकता है। एक का उल्लेख अलगद्दपम सुत्त में आया है, दूसरे का महाकम्मविभंग सुत्त में, तीसरे का कण्णकट्ठल सुत्त में, चौथे का महातण्हा-सांख्य सुत्र में और पांचवे का जीवक सुत्त में।

8-शायद इस तरह के और भी अनेक अवसरों पर तथागत के वचनों का गलत प्रस्तुतीकरण किया गया हो, क्योंकि हम देखते हैं कि भिक्खू भी भगवान बुद्ध के पास गए और प्रश्न किया कि ऐसी स्थिति में उन्हें क्या करना चाहिए।

9. 'कर्म' और 'पुनर्जन्म' के बारे में बुद्ध वचनों के गलत प्रस्तुतीकरण के अवसर सामान्य बात है।

10. इन सिद्धांतों को ब्राह्मणी 'धर्म' में भी स्थान प्राप्त है। परिणामस्वरूप भाणकों के लिए ब्राह्मणी मत को बौद्ध धम्म में सम्मिलित कर लेना सुगम था।

11. इसलिए त्रिपिटक में जिसे भी 'बुद्ध-वचन' के रूप में माना गया है, उसे स्वीकार करने में बहुत सावधानी की आवश्यकता है।

12. लेकिन इसके लिए एक कसौटी उपलब्ध है।

13. यदि कोई ऐसी बात है जिसके बारे में विश्वास के साथ कहा जा सकता है तो वह यह है कि उनका कोई महत्त्व नहीं होता यदि उनका कथन बुद्धिसंगत, तर्कसंगत नहीं होता। इसलिए जो कुछ भी बुद्धिसंगत और तर्कसंगत है, अन्य बातें समान होते हुए, उसे 'बुद्ध-वचन' के रूप में लिया जा सकता है।

14. दूसरी बात यह है कि भगवान बुद्ध ने कभी ऐसी बेकार की चर्चा में नहीं पड़ना चाहा जो आदमी के कल्याण के लिए लाभकारी नहीं थी। इसलिए कोई भी ऐसी बात जिसका आदमी के कल्याण से कोई सम्बंध नहीं, यदि भगवान बुद्ध के सिर मढ़ी जाती है, तो उसे 'बुद्ध-वचन' स्वीकार नहीं किया जा सकता।

15. एक तीसरी कसौटी भी है। वह यह कि भगवान बुद्ध ने सभी विषयों को दो वर्गों में विभक्त रखा था। ऐसे विषय जिनके बारे में वे निश्चित थे, और ऐसे विषय जिनके बारे में वे निश्चित नहीं थे। जो विषय पहली श्रेणी में आते हैं उनके बारे में उन्होंने अपने विचार निश्चयात्मक रूप से और अंतिम रूप से व्यक्त किए हैं। जो विषय दूसरी श्रेणी में आते हैं उनके बारे में उन्होंने अपने विचार व्यक्त किए हैं, लेकिन ऐसे विचार बदले भी जा सकते हैं।

16. वार्ता करते समय जिन तीन प्रश्नों के बारे में संदेह और मतभेद है उनके बारे में यह निर्णय करने से पहले कि भगवान बुद्ध का निश्चित मत क्या था, यह आवश्यक है कि हम इन कसौटियों को न भूलें।

भारत से बौद्ध धर्म के प्रति मुख्य रूप से तर्कसंगत (Rational) और नैतिक (Ethical) था। उनके विचारों को उनकी प्रसिद्ध पुस्तक "The Buddha and His Dhamma" के संदर्भ में समझा जा सकता है:
​डॉ. आंबेडकर का 31 लोकों और देवों पर दृष्टिकोण

🌀​तर्क और विज्ञान:
डॉ. अंबेडकर ने बौद्ध धर्म के उन हिस्सों पर ज़ोर दिया जो विज्ञान और तर्क की कसौटी पर खरे उतरते थे। वे बुद्ध की शिक्षाओं को सामाजिक न्याय और मानवीय नैतिकता के रूप में देखते थे।
🌀​मिथक बनाम वास्तविकता:
उनके अनुसार, पारंपरिक बौद्ध ग्रंथों में वर्णित '31 लोक' (जैसे स्वर्ग, नर्क या विभिन्न देव लोक) अक्सर बाद के लेखकों द्वारा जोड़ी गई काल्पनिक या रूपकात्मक (Metaphorical) बातें थीं। वे इन्हें शाब्दिक सत्य (Literal Truth) के बजाय उस समय की सांस्कृतिक मान्यताओं का हिस्सा मानते थे।
🌀​अंधविश्वास का विरोध:
उन्होंने स्पष्ट किया था कि बुद्ध ने अंधविश्वास और पराभौतिक (Metaphysical) अटकलों को कभी बढ़ावा नहीं दिया। आंबेडकरजी का मानना था कि बुद्ध का मार्ग 'अत्त दीपो भव' (अपना दीपक स्वयं बनो) का है, न कि किसी अलौकिक शक्ति या लोक की शरण में जाने का।
​शुद्ध दृष्टिकोण : उन्होंने बौद्ध धर्म के ऱ्हास के कारण को उखाड़ दिया। भगवान बुद्ध के सही शिक्षा की नींव रखी, जिसमें उन्होंने बौद्ध धर्म को अलौकिक मान्यताओं से मुक्त करके एक सामाजिक और नैतिक जीवन पद्धति के रूप में प्रस्तुत किया।
​संक्षेप में:
​डॉ. आंबेडकर बुद्ध के मूल सिद्धांतों (चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग) में गहरा विश्वास रखते थे, लेकिन वे 31 लोकों या अलौकिक देवों को वास्तविक आवश्यकता नहीं मानते थे। उनके लिए बौद्ध धर्म का अर्थ दु:खों का निवारण इसी जीवन में और इसी धरती पर करना था।

​भगवान बुद्ध और उनका धम्म
ग्रंथ में इन शीर्षकों से ही सही बुद्धिज़्म का रास्ता मिल जाता है

तीसरा खंड- भाग चौथा-
2-ईश्वर में विश्वास धम्म का आवश्यक अंग नहीं है । .
3-ब्रह्म में लीनता पर आधारित धर्म मिथ्या धम्म है। .

6-निराधार कल्पना पर आश्रित विश्वास धर्म नहीं है।

विभाग 5
2-मृत्यु के बाद के जीवन की चिंता व्यर्थ....... .
सलाह: अब जबकि आपका यह संशय स्पष्ट हो गया हो, तो आप अपनी पढ़ाई को एक "धम्म" (कर्तव्य) मानकर उस पर ध्यान केंद्रित करें। प्रज्ञा प्राप्त करना ही सच्चे अर्थों में बुद्ध के मार्ग पर चलना है।

Address

Station Road
Rahuri
413705

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रबुद्ध भारत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to प्रबुद्ध भारत:

Share

Category