आपलं रहिमतपूर - LIVE

आपलं रहिमतपूर - LIVE � रहिमतपूरकरांचे हक्काचं व्यासपीठ �

21/11/2021

रहिमतपूर नगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले. दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारताना नगराध्यक्ष श्री आनंदा कोरे, नगरसेवक श्री शिवराज माने, व पदाधिकारी

सुप्रसिध्द कवी शंकर केशव कानेटकर (कविगिरीश) फत्यापुर(रहिमतपुर) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी लिहिलेलं "अभाग...
28/10/2021

सुप्रसिध्द कवी शंकर केशव कानेटकर (कविगिरीश) फत्यापुर(रहिमतपुर) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांनी लिहिलेलं "अभागी कमळ" हे खंडकाव्य मराठी भाषेतल्या सामाजिक खंडकाव्याची सुरुवात मानले जाते, त्यानंतर कला व आंबराई ही खंडकाव्य लिहिली. बालगीत हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.

23/10/2021

गावकऱ्यांनी न्हावी बुद्रुक गावचं केलं नामांतर, जयपूर म्हणून यापुढे असेल गावची अधिकृत ओळख, रहिमतपूर पासून 7 ते 8 किमी वर असलेल्या जयपूर गावात आज जल्लोषात गावचा नामांतर सोहळा पार पडला, या नामांतर सोहळ्या निमित्त सर्व गावकरीमध्ये उत्साह पहायला मिळाला, पहा व्हिडीओ 👇

● व्हिडीओ आभार - ZEE NEWS

 #कोजागिरी_पौर्णिमेच्या_सर्व_रहीमतपूरकरांना #हार्दिक_शुभेच्छा!★★★★★★★★★★★★★★★★★★★★आज या मंगलमय दिवशी रोकडेश्वर मंदिराची ...
19/10/2021

#कोजागिरी_पौर्णिमेच्या_सर्व_रहीमतपूरकरांना
#हार्दिक_शुभेच्छा!
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
आज या मंगलमय दिवशी रोकडेश्वर मंदिराची केलेली सुंदर सजावट.

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची स्थापन झालेली नगरपालिका !सातारा जिल्ह्यातील र...
06/08/2021

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची स्थापन झालेली नगरपालिका !

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची स्थापन झालेली नगरपालिका आहे. १ मे १८५३ रोजी या नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्रातील पहिल्या नगरपालिकेचा बहुमान पनवेल या शहराकडे जातो.

पनवेल नगरपालिकेची स्थापना २५ ऑगस्ट १८५२ साली झाली होती. परंतु

पनवेल नगरपालिका आता काही काळापासून महानगरपालिका बनली आहे.

इंग्रज सरकारने शहरांमध्ये नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी १८५० मध्ये नगरपालिका कायदा अस्तित्वात आणला. यानंतर पनवेलमधील दक्ष नागरिकांनी हा कायदा लागू करण्याची मागणी केले. तेव्हाच्या सरकारने कमिशन नियुक्त करून २५ आ गस्ट १८५२ मध्ये नगरपालिका कायदा लागू करण्याचे निश्चित करण्यात आले.

१ सप्टेंबर १८५२ मध्ये प्रत्यक्षात नगरपालिकेचे कामकाज सुरू झाले. याविषयीची स्पष्ट नोंद १५ जानेवारी १८५७ च्या सरकारी गॅझेटच्या पान क्रमांक १३६ वर करण्यात आली आहे.

माहिती साभार: लोकमत



05/08/2021

जन्म भूमी... कर्म भूमी... आपलं रहिमतपूर 😍❤️✌️

25/07/2021

कृष्णामाई ❤️🤍

रहिमतपुरकरांची जीवनदायिनी - कृष्णमाई ❤️🤍
24/07/2021

रहिमतपुरकरांची जीवनदायिनी - कृष्णमाई ❤️🤍

24/07/2021

धामनेर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ, नदी कडेच्या गावांना सतर्कतेचा इशारा

23/07/2021

🔴 रहिमतपूर ते सातारा जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

रहिमतपूर ते सातारा जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना दिलेला पर्यायी रस्ता गेला वाहून.

🔴 अपशिंगे हायस्कूल अपशिंगे ़चा दहावीचा निकाल १००%सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्वांच्या उज्वल भविष्याच्या प...
19/07/2021

🔴 अपशिंगे हायस्कूल अपशिंगे ़चा दहावीचा निकाल १००%
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्वांच्या उज्वल भविष्याच्या पुढील वाटचालीस यशश्वी शुभेच्छा....

🔸 शुभेच्छूक - समस्त रहिमतपूरकर ग्रामस्थ

🔴 आदर्श विद्यालय रहिमतपूरचा दहावीचा निकाल १००%सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्वांच्या उज्वल भविष्याच्या पुढी...
18/07/2021

🔴 आदर्श विद्यालय रहिमतपूरचा दहावीचा निकाल १००%
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्वांच्या उज्वल भविष्याच्या पुढील वाटचालीस यशश्वी शुभेच्छा....

🔸 शुभेच्छूक - समस्त रहिमतपूरकर ग्रामस्थ

Address

Rahimatpur
415511

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं रहिमतपूर - LIVE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share