03/03/2026
*निसर्गमय रंगपंचमी*
*खेळूया रंग निसर्गासोबत*
आपल्या देशात अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. वेगवेगळ्या रंगानी नटलेला सण म्हणजे रंगपंचमी.
वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद, मिशन ग्रीन बहुद्देशीय संस्था,पुसद आणि माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन,पुसद यांच्या वतीने मागील तीन वर्षांपासून पर्यावरण संवर्धन कार्य सुरू आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 03 मार्च 2026 रोजी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी *खेळूया रंग निसर्गासोबत* या पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन तुळजाभवानी माता टेकडी निंबी-पार्डी येथे करण्यात आले. या कार्यक्रमात पुसद परिसरातील वसुंधरा बहुउद्देशीय संस्था पुसद, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था,पुसद आणि माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन,पुसद यांनी सकाळी वृक्ष पूजन करून टेकडीवरील सर्व वृक्षांना पाणी देऊन, त्यांची तृष्णा तृप्ती करून पर्यावरणपूरक पद्धतीने सर्व सदस्यांनी रंगपंचमीचा सण संपूर्ण सजीवसृष्टीला जीवनदान देणाऱ्या वृक्षांना पाणी देऊन जीवनदान देणाऱ्या वृक्षसोबत मोठ्या उत्साहाने साजरा केला व यामधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.मागील तीन वर्षांपासून पुसद परिसरातील तुळजाभवानी टेकडी निंबि-पार्डी येथे भवानी अनेक वृक्षांचे रोपण केले आणि त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे कार्य अविरत चालू आहे. आजची परिस्थिती पाहता पर्यावरणाचे संतुलन पूर्णतः बिघडले आहे. यामुळे वातावरणातील तापमान खूप वाढले तसेच हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, प्लास्टिकचा वापरामुळे कचरा प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे याचा विचार प्रत्येक मानवाने करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मानवाने सण, उत्सव साजरे करतांना निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे आणि पर्यावरण पूरक सण साजरे करावे असे आवाहन निसर्ग प्रेमींकडून सर्वांना करण्यात आले.
*🌳 चला जोडूया निसर्गाशी आपली नाळ,करूया वसुंधरेचा सांभाळ 🌳*