Adv Nilesh Narayan Nikam

Adv Nilesh Narayan Nikam Group Leader/ Leader Of Opposition, PMC
5th term elected Corporator, PMC
34 years of committed, honest & integrity-driven public service
(1)

नगरसेविका, पुणे म. न.पा. सौ. प्रियाताई गदादे (पाटील) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #वाढदिवस  #शुभेच्छा
05/09/2026

नगरसेविका, पुणे म. न.पा. सौ. प्रियाताई गदादे (पाटील) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

#वाढदिवस #शुभेच्छा

स्नेह, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा रक्षाबंधन सोहळा!महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांच्या पुढाकारातून महापौर निवास, शिव...
05/09/2026

स्नेह, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा रक्षाबंधन सोहळा!

महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांच्या पुढाकारातून महापौर निवास, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी लाभली. यावेळी महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे तसेच उपस्थित भगिनींनी औक्षण करून राखी बांधत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.

रक्षाबंधन हा केवळ सण नसून परस्पर सन्मान, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचा उत्सव आहे. या प्रसंगी समाजातील विविध घटक एकत्र येत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि समरसतेचा संदेश देण्यात आला. प्रेम आणि आपुलकीच्या धाग्यांनी समाज अधिक घट्ट जोडण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

#रक्षाबंधन #शुभेच्छा

29/08/2026
मा.महापौर, नगरसेविका पुणे मनपा सौ.वैशालीताई बनकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #वाढदिवस   #शुभेच्छा
29/08/2026

मा.महापौर, नगरसेविका पुणे मनपा सौ.वैशालीताई बनकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#वाढदिवस #शुभेच्छा

28/08/2026

२८ जानेवारी २०२६… दादांना आपल्यातून जाऊन आज सात महिने झाले. दिवस पुढे सरकले, पण दादांची आठवण आजही मनातून पुसली गेलेली नाही.

बंध हा प्रेमाचा, आपुलकीचा, आणि नात्याच्या घट्ट विश्वासाचा असतो. बहिणीच्या प्रेमाचं आणि भावाच्या रक्षणाच्या वचनाचं हे पवि...
28/08/2026

बंध हा प्रेमाचा, आपुलकीचा, आणि नात्याच्या घट्ट विश्वासाचा असतो. बहिणीच्या प्रेमाचं आणि भावाच्या रक्षणाच्या वचनाचं हे पवित्र नातं सदैव असंच मजबूत राहो!

रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#रक्षाबंधन #रक्षाबंधन2026

26/08/2026

भाजी मार्केटसाठी आरक्षित जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित!

शहराच्या विकास आराखड्यात भाजी मार्केटसाठी आरक्षित असलेली २००० स्क्वेअर फूट जागा आजही महापालिकेला मिळालेली नाही. नागरिकांच्या हिताच्या या महत्त्वाच्या विषयावर महासभेत ठामपणे आवाज उठवत संबंधित प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली.

आरक्षित जागेचा ताबा निश्चित कालावधीत मिळावा, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

PublicInterest

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!   #ईदएमिलाद
26/08/2026

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!

#ईदएमिलाद

25/08/2026

577 कोटी रुपयांचा खर्च आणि तब्बल 20 वर्षांचा करार... पण एवढ्या दीर्घकालीन कराराची गरज नेमकी काय?

तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना, कचरा प्रक्रियेच्या क्षेत्रात नवनवीन पर्याय उपलब्ध होत असताना आणि भविष्यात हाऊसिंग सोसायट्या स्वतःच ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करू लागल्यास महानगरपालिकेवर अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही का?

आजवर 3 ते 5 वर्षांचे करार केले जात असताना, अचानक 20 वर्षांचा करार करण्याचा अट्टाहास का? जनतेच्या 577 कोटी रुपयांचा प्रश्न असल्याने प्रत्येक निर्णयाचा सखोल विचार आणि पारदर्शकता अपेक्षित आहे.

#कचरा_व्यवस्थापन #जनहित #पारदर्शकता #शहरविकास

25/08/2026

शहरातील सोसायट्यांमध्ये ओला व सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प सक्तीचे करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती प्रकल्प कार्यरत आहेत, त्यांची प्रक्रिया क्षमता किती आहे आणि किती ठिकाणी हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत, याचा अचूक डेटा महानगरपालिकेकडे आहे का?

सोसायट्यांना कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी प्रोत्साहन व करसवलती दिल्या जात असताना, या प्रकल्पांचा प्रत्यक्ष वापर आणि त्यातून होणाऱ्या कचरा प्रक्रियेचा आढावा घेणे आवश्यक आहे.

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट, बायोगॅस किंवा वेस्ट-टू-एनर्जीच्या माध्यमातून त्याचा प्रभावी पुनर्वापर करता येतो. त्यामुळे उपलब्ध प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष प्रक्रिया आणि शहराच्या एकूण कचरा व्यवस्थापनातील त्यांचे योगदान याबाबत पारदर्शक माहिती महानगरपालिकेने समोर आणणे गरजेचे आहे.

कचरा व्यवस्थापन केवळ नियमांपुरते मर्यादित न राहता, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि योग्य नियोजन होणे ही काळ

Address

Senapati Bapat Road
Pune
411016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Nilesh Narayan Nikam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share