Vinaya Sudhir Mungase

Vinaya Sudhir Mungase जिल्हा परिषद सदस्य
कुरुळी - आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट
मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन

भक्ती, सेवा, समता व मानवतेचा संदेश देणारे संत  सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत होते. आपल्या अभंगवाणी व आचार-व...
08/09/2026

भक्ती, सेवा, समता व मानवतेचा संदेश देणारे संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत होते. आपल्या अभंगवाणी व आचार-विचारातून त्यांनी समाजाला भक्ती, सदाचार आणि समतेचा मार्ग दाखविला.

संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आद्यक्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
07/09/2026

आद्यक्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

यंदा मोदक विकत आणायचे नाहीत… घरीच बनवायचे!यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या हाताने बनविलेला मोदक नैवेद...
06/09/2026

यंदा मोदक विकत आणायचे नाहीत… घरीच बनवायचे!

यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या हाताने बनविलेला मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करता यावा, यासाठी आपल्या कुरुळी-आळंदी ग्रामीण मतदारसंघातील महिला भगिनी व युवतींसाठी विशेष मोदक बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत उकडीचा मोदक, चॉकलेट मोदक आणि मावा मोदक बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.बाप्पासाठी मोदक बनवताना त्यात फक्त गोडवा नसतो, तर आपल्या हाताची माया, प्रेम आणि भक्तीही मिसळलेली असते!

त्यामुळे सर्व महिला भगिनी व युवतींनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि यंदा आपल्या हाताने बनविलेल्या मोदकांनी बाप्पाचा नैवेद्य अधिक गोड करावा.

📅 मंगळवार दि. ०८ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी ११:०० वा.
📍 स्थळ : केळगाव

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित खेड तालुक्...
06/09/2026

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित खेड तालुक्यातील भव्य दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि अभिनेत्री माधवी निमकर व ‘बिग बॉस मराठी’ विजेती अभिनेत्री तन्वी कोलते यांच्या उपस्थितीने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. राजगुरूनगरच्या बजरंग दल गोविंदा पथकाने उत्कृष्ट समन्वयातून दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले.

या सोहळ्यात स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, या दहीहंडीच्या माध्यमातून सुधीरभाऊ मुंगसे यांनी एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला. हंडी फोडणारा वरचा गोविंदा सर्वांना दिसतो; मात्र त्याला उंची देणारा तळाचा गोविंदा अनेकदा दुर्लक्षित राहतो. आपल्या समाजाची प्रगतीही अशाच कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि सेवेकऱ्यांच्या भक्कम आधारावर उभी आहे.

उत्सवाची खरी शोभा तेव्हाच, जेव्हा प्रत्येक हाताला सन्मान आणि प्रत्येक कष्टाला आधार मिळतो. या विचारासोबत हा सोहळा यशस्वी करणाऱ्या सर्व गोविंदा पथकांचे, मान्यवरांचे, सुरक्षा यंत्रणेचे, समस्त खेडकरांचे तसेच ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

दहीहंडी उत्सव निमित्त सर्व नागरिकांनाहार्दिक शुभेच्छा..!
05/09/2026

दहीहंडी उत्सव
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!

शिक्षक दिन..!अज्ञान मिटवी, ज्ञान देई गुरूदाखवी वाट, भान देई गुरू।भारताचे पहिले उपराष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यां...
05/09/2026

शिक्षक दिन..!
अज्ञान मिटवी, ज्ञान देई गुरू
दाखवी वाट, भान देई गुरू।

भारताचे पहिले उपराष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन आयोजित खेड तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी!
04/09/2026

मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन आयोजित
खेड तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या मातीचा, मराठी संस्कृतीचा आणि लोकभावनांचा बुलंद आवाज आपल्या शाहिरीतून घराघरांत पोहोचवणारे, ‘जय जय महाराष्...
03/09/2026

महाराष्ट्राच्या मातीचा, मराठी संस्कृतीचा आणि लोकभावनांचा बुलंद आवाज आपल्या शाहिरीतून घराघरांत पोहोचवणारे, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताचे मूळ गायक, लोककलेचे निष्ठावंत उपासक महाराष्ट्रशाहीर कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय हवाई दलात एअर व्हाइस मार्शल या मानाच्या पदावर नियुक्ती होणाऱ्या देशातील पहिल्या महिला एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्...
02/09/2026

भारतीय हवाई दलात एअर व्हाइस मार्शल या मानाच्या पदावर नियुक्ती होणाऱ्या देशातील पहिल्या महिला एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

कोणतीही सीमा महिलांच्या कर्तृत्वाला रोखू शकत नाही, हे शक्तीजींनी आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेच्या बळावर सिद्ध करून दाखवले आहे. संरक्षण दलातील त्यांचा हा ऐतिहासिक प्रवास देशातील प्रत्येक मुलीला आणि महिलेला मोठी स्वप्ने पाहण्याची, निर्भीडपणे पुढे जाण्याची आणि देशसेवेचे सर्वोच्च शिखर गाठण्याची प्रेरणा देणारा आहे.

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांना पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

Address

Pune
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinaya Sudhir Mungase posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category