05/09/2026
UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाला प्रारंभ!
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी पुणे महानगरपालिकेची विद्यार्थ्यांना भक्कम साथ!
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०११ पासून UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत मागासवर्गीय प्रवर्गातील १०० आणि खुल्या प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत करण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांना घर ते स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि परत घरापर्यंतच्या प्रवासासाठी बस पासच्या खर्चाची रक्कम देखील अदा करण्यात येते.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील UPSC/MPSC प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, हॉल क्रमांक ३९ येथे दुपारी ४ वाजता करण्यात आले.
यावेळी मा. मुख्य समाज विकास अधिकारी श्री. रामदास चव्हाण, मा. सहाय्यक समाज विकास अधिकारी श्री. संदीप कोळपे, मा. सहाय्यक समाज विकास अधिकारी श्री. राजेंद्र मोरे, तसेच मा. केंद्र संचालक, पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र श्री. मिलिंद निकाळजे आणि मा. डॉ. श्री. फजल यांची उपस्थिती होती.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://fxurl.co/PMCCARE