12/09/2026
आपल्या तळेगांव येथील वृध्दाश्रमातील रहिवशी श्री मिलिंद प्रधान कालपासून अल्सरच्या त्रासामुळे अत्यवस्थ आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले आहे.
आपल्या नियमानुसार आम्ही त्यांच्या बंधु आणि भगिनींना (ज्यांनी त्यांचा फॉर्म भरला होता) संपर्क केला परंतु ते किंवा त्यांचे इतर कोणतेही नातेवाईक जबाबदारी उचलण्यास तयार नाहीत.
ह्या परिस्थितीत आमच्याकडे मनुष्यबळ आणि आर्थिक बळ उभे करणे शक्य नाही. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतरही आपला वृध्दाश्रम वरील कारणांमुळेच त्यांची काळजी घेऊ शकत नाही.
आपल्यापैकी कोणालाही एखादा आश्रम माहिती असल्यास कळवावे जेणेकरुन प्रधानांना तेथे हलवता येईल.
आपल्यापैकी कोणीही त्यांच्या नातेवाईकांना ओळखत असल्यास तोही प्रयत्न करावा. 🙏
वृध्दाश्रमातील मिलिंद प्रधान अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांचे बंधू आज येणार होते पण आत्ता त्यांनी मी येत नसल्याचे कळवले आहे. आपली केअरटेकर सारिका हॉस्पिटलमध्ये बसून आहे. डॉक्टरांनी अल्सरचे ऑपरेशन वेळेवर होणे जरुरीचे आहे असे कळवले आहे. १३०००० एव्हढा खर्च आहे पण आपणा कोणीही वैयक्तिक रित्या पैशाची काही मदत करावी असे वाटत नाही.
आपल्या ओळखीने इतर किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये सोय होऊ शकल्यास बरे होईल.
आम्ही पुण्यातील संस्थांच्या संपर्कात आहोत.