31/08/2026
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न!
आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न झाली. यावेळी मजबूत संघटनेतून नागरिकांचा विश्वास जिंकुया आणि विकसित महाराष्ट्र घडवुया असे आवाहन यावेळी प्रमुख मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
संपूर्ण राज्यभरातून नुकत्याच नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांसह सर्व पदाधिकारी या बैठकीसाठी मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ, कॅबिनेट मंत्री नामदार मा. चंद्रकांत दादा पाटील, मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे, मंत्री मा. गिरीशजी महाजन, मा. सुधीरजी मुनगंटीवार, मा. माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांच्यासह सर्व मंत्री महोदय, खासदार, आमदार व भाजपा संघटनेचे पदाधिकारी, विविध मोर्चांचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपा पुणे शहराचे अध्यक्ष मा. धीरजजी घाटे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराच्या टीमने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजींचे स्वागत केले.
BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan Murlidhar Mohol Chandrakant Patil Dheeraj Ghate