BJP Khadakwasla Voter Association Women’s Wing

  • Home
  • India
  • Pune
  • BJP Khadakwasla Voter Association Women’s Wing

BJP Khadakwasla Voter Association Women’s Wing 🪷 नगरसेविका, पुणे महानगरपालिका 🪷
🪷 महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा भाजपा 🪷
📍जनसंपर्क कार्यालय, अमृत विहार सो. कोल्हेवाडी, पुणे.

🏆 खडकवासला श्री २०२६ – पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी 💪कोल्हेवाडी येथे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय पुणे महापौर श्री २...
16/03/2026

🏆 खडकवासला श्री २०२६ – पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी 💪
कोल्हेवाडी येथे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय पुणे महापौर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेची पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली.
प्रथमच महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये महिला खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या ताकद, आत्मविश्वास आणि फिटनेसचा उत्कृष्ट नमुना सादर केला. हा उपक्रम महिला सक्षमीकरण व क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागाचा प्रेरणादायी टप्पा ठरला.
सशक्त युवा, निरोगी समाज आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रेरणादायी उपक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. नगरसेविका धनश्रीताई दत्ताभाऊ कोल्हे व श्री दत्ताभाऊ महादेव कोल्हे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

PC:

🏆 खडकवासला श्री २०२६ – पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी 💪काल खडकवासला येथे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय पुणे महापौर श्री...
15/03/2026

🏆 खडकवासला श्री २०२६ – पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी 💪
काल खडकवासला येथे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय पुणे महापौर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेची पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली. स्पर्धकांनी आपल्या जिद्द, कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचे दर्शन घडवत उपस्थितांना प्रेरित केले.
सशक्त युवा, निरोगी समाज आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रेरणादायी उपक्रमाचे स्वागताध्यक्ष नगरसेविका धनश्रीताई कोल्हे व दत्ताभाऊ कोल्हे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
#खडकवासला_श्री2026 💪🔥

📍खडकवासला परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल!खडकवासला धरणाजवळील नदीवरील पुलाच्या दुरुस्ती व पुनर्निर्माणासाठी पुणे मह...
15/03/2026

📍खडकवासला परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल!
खडकवासला धरणाजवळील नदीवरील पुलाच्या दुरुस्ती व पुनर्निर्माणासाठी पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये ₹१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
मा. आमदार भीमराव आण्णा तापकीर यांच्या प्रयत्नातून तसेच नगरसेविका मा. धनश्रीताई दत्ताभाऊ कोल्हे व दत्ताभाऊ कोल्हे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
परिसरातील नागरिकांची सोय, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हे काम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
विकासाचा वसा, लोकसेवेचा ध्यास… ✨
#खडकवासला #विकासकाम

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क चित्रपट प्रदर्शनाला नागरिकांचा उ...
14/03/2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क चित्रपट प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 🌸
स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या महान समाजसुधारकांना अभिवादन करत,
नगरसेविका धनाश्रीताई कोल्हे व दत्ताभाऊ कोल्हे (सचिव महाराष्ट्रप्रदेश ओबीसी मोर्चा भाजपा)यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
समाजप्रबोधनाच्या या प्रयत्नाला मिळालेला आपला प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आहे.
सर्व उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार! 🙏

📍 नांदेड सिटी पोलीस स्टेशन भेटआज नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल मुरलीधर भोस यांनी आयोजित केलेल्या...
13/03/2026

📍 नांदेड सिटी पोलीस स्टेशन भेट
आज नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल मुरलीधर भोस यांनी आयोजित केलेल्या चहा-पान कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यावेळी प्रभागातील विविध कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच धायरी येथे नवीन पोलीस चौकी उभारण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.
#जनसुरक्षा

💪 अजिंक्यपदाचा महासंग्राम: पुणे महापौर श्री २०२६! 🏆​"जिद्द, मेहनत आणि पोलादी स्नायूंचा थरार..."​पुणे शहराच्या क्रीडा परं...
12/03/2026

💪 अजिंक्यपदाचा महासंग्राम: पुणे महापौर श्री २०२६! 🏆
​"जिद्द, मेहनत आणि पोलादी स्नायूंचा थरार..."
​पुणे शहराच्या क्रीडा परंपरेचा अभिमान असलेल्या 'राज्यस्तरीय पुणे महापौर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेचा भव्य सोहळा संपन्न होत आहे.
​क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणाईला व्यायामाची गोडी लावण्यासाठी आयोजित या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा! 🔥
​📍 स्थळ: श्री गणेश गार्डन बँक्वेट हॉल, नांदेड फाटा, पुणे.
🗓️ दिनांक: १५ मार्च २०२६
🕒 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
​या क्रीडा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
​स्वागतोत्सुक:
सौ. धनश्रीताई दत्ताभाऊ कोल्हे
(नगरसेविका, पुणे महानगरपालिका)
​दत्ताभाऊ महादेव कोल्हे
(सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा)

🏆 खडकवासला श्री २०२६ – पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी 💪राज्यस्तरीय पुणे महापौर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निवड चाचणी...
12/03/2026

🏆 खडकवासला श्री २०२६ – पुणे जिल्हास्तरीय निवड चाचणी 💪
राज्यस्तरीय पुणे महापौर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निवड चाचणीचा भव्य सोहळा लवकरच संपन्न होत आहे. खेळाडूंची जिद्द, कठोर मेहनत आणि फिटनेसचा उत्साह अनुभवण्याची सुवर्णसंधी!
सशक्त युवा, निरोगी समाज आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होणार आहेत.
या प्रेरणादायी उपक्रमाचे स्वागतोस्तुक - मा. नगरसेविका धनश्रीताई दत्ताभाऊ कोल्हे व दत्ताभाऊ कोल्हे (सचिव महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा) आहेत.
चला, फिटनेसचा उत्सव अनुभवूया आणि खेळाडूंना उत्साहाने प्रोत्साहन देऊया! 🔥💪
#खडकवासला_श्री2026 FitYouth

आज पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने प्रकल्पीय व वितरण विषयक कामांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मा. मुख्य अभियंता (पाणीपुरवठा...
11/03/2026

आज पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने प्रकल्पीय व वितरण विषयक कामांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मा. मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), महापालिका सहाय्यक आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांची सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रभागातील विविध पाणी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

येत्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये व नागरिकांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

नागरिकांना अखंड व दर्जेदार पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.

📍खडकवासला – किरकटवाडी येथील शिव रस्ता मल:निसारण व पावसाळी लाईनसह विकसित करण्याच्या कामास महानगरपालिका अर्थसंकल्पामध्ये र...
10/03/2026

📍खडकवासला – किरकटवाडी
येथील शिव रस्ता मल:निसारण व पावसाळी लाईनसह विकसित करण्याच्या कामास महानगरपालिका अर्थसंकल्पामध्ये रु. ३.५ कोटींची मंजुरी मिळाली आहे.
मा. आमदार भीमराव आण्णा तापकीर यांच्या प्रयत्नातून तसेच नगरसेविका धनश्रीताई कोल्हे, दत्ताभाऊ कोल्हे (महाराष्ट्र प्रदेश सचिव, ओबीसी मोर्चा भाजपा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाला आहे ✨
परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारून पावसाळ्यातील समस्या दूर करण्यासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार असून परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ! 🚩आज प्रभागातील विविध मंडळांना भेट देऊन शिवरायांना ...
10/03/2026

🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ! 🚩

आज प्रभागातील विविध मंडळांना भेट देऊन शिवरायांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श सदैव प्रेरणादायी आहेत.

📍 पार्क व्ह्यू सोसायटी, धायरीपार्क व्ह्यू फेडरेशन ऑफ सोसायटी, धायरी येथे प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत सोलार प्रकल्...
07/03/2026

📍 पार्क व्ह्यू सोसायटी, धायरी
पार्क व्ह्यू फेडरेशन ऑफ सोसायटी, धायरी येथे प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत सोलार प्रकल्पाचे उद्घाटन माननीय आमदार भीमराव आण्णा तापकीर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. ☀️
या प्रसंगी उपस्थित मान्यवर –
• नगरसेविका धनश्रीताई दत्तात्रय कोल्हे
• नगरसेविका जयश्रीताई भूमकर
• नगरसेविका कोमलताई नवले
• नगरसेवक राजाभाऊ लायगुडे
तसेच सोसायटीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि वीज बचतीच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक बचतही साध्य होणार आहे. 🌱

Address

Public Relations Office, Kolhewadi, Amrut Vihar Society, Shop No. 3
Pune
411024

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Khadakwasla Voter Association Women’s Wing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share