04/05/2020
विकासार्थ विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विभाग
#अमृतसरिता" - A Holistic Study of Rivers*
*पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) स्पर्धा*
नमस्कार,
आपला विद्यापीठ विभाग हा सह्याद्रीचा डोंगर, दऱ्या, नद्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे. कृष्णा, कोयना व पंचगंगा या आपल्या जीवनदायिनी नद्या आहेत. या नद्यांच्या सानिध्यात शेती व औद्योगिक विकास यांमुळे आपली संस्कृती व जीवनपद्धती विकसित झालेली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी निसर्गाचा रुद्रावतार महापुराच्या निमित्ताने आपण अनुभवलाच आहे. या महापुरामुळे शेकडो गावे, हजारो परिवार बेघर तर झालेच पण लाखो माणसांचा संपर्क देखील तुटला गेला. या महापुरामुळे अर्थव्यवस्था व जीवनपद्धतीवर भयावह परिणाम झालेला दिसून आला.
येणाऱ्या काळामध्ये अशा संकटांचा सामना करण्यासाठी विकासार्थ विद्यार्थीच्या माध्यमातून आपात्कालीन परिस्थिती व खबरदारीसाठी विविध टप्प्यात कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांवर विविध स्वरूपाचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT), नदी सर्वेक्षण, स्थानिक प्रशासन, संस्था, प्राधिकरणे, शासन, संघटना, व व्यक्ती इ. यांच्या माध्यमातून नदीचे संवर्धन यासारखे उपक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहेत.
तरी याचा पहिला टप्पा म्हणजे कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांवर विभाग स्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) स्पर्धा घेण्यात येत आहे.
*पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) साठीचे मुद्दे* -
- नदीचे उगमस्थान, पात्र, लांबी, प्रवाह, उपनद्या व त्यांची उगमस्थाने इ. भौगोलिक माहिती
- नदी काठावरील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, पर्यटन स्थळे
- नदी काठावरील गावांची नावे
- गावांतील उद्योग-व्यवसाय, शेती व पिके इ. आर्थिक माहिती
- नदी परिसरातील गावांची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती
- महापूर व त्याची कारणे, महापुराची परिस्थिती व परिणाम
- पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जाणवलेल्या अडचणी व त्यावर उपलब्ध मदत
- आगामी काळात पूर परिस्थिती उद्भवू नये, यासाठी घेण्यात येणारी खबरदारी व उपाययोजना
*नियमावली* -
- स्पर्धक तीनही नद्यांवर किंवा कुठल्याही एका नदीवर प्रेझेंटेशन करू शकतो.स्पर्धकाने प्रत्येक नदीचे प्रेझेंटेशन वेगवेगळे पाठवावे.
- स्पर्धकाला सहभागी होण्यासाठी वयोमर्यादेचे बंधन नाही.
- स्पर्धक प्रेझेंटेशनमध्ये व्हिडीओ, फोटो, ग्राफिक्सचा व अन्य वापर करू शकतो.
-स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
*https://bit.ly/3aR85jC*
- स्पर्धेमध्ये सहभाग नोंदणी आवश्यक असेल.
- प्रेझेंटेशन हे *२५ mb* पेक्षा कमी स्वरूपाचे असावे.
- प्रेझेंटेशन हे *PDF ई स्वरूपात* खालील ईमेलवर पाठवावे.
- आयोजकांचा निर्णय अंतिम राहिल.
- आपले प्रेझेंटेशन हे 10 मे पर्यंत पाठवावे.
*टिप* :- खालील *लिंक वरून आपण मोबाईल वर देखील PPT* PDF तयार करू शकता.
1) https://play.google.com/store/apps/details?id=cn.wps.moffice_eng
2) https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.inputmethod.latin
*बक्षीस* -
विभागश: व जिल्हाश: प्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रत्येक नदीच्या प्रेझेंटेशनसाठी बक्षीस दिले जाईल.
*ईमेल*- [email protected]
*संपर्क* : *कोल्हापूर* - ऋषिकेश : ९५६१०४३५५९ / मुकुंद : ९५७९५११८४१
*सांगली* - पुष्पक :९३२५०२२११६
*सातारा* - सुरज : ९३५९७३७५५०/ आकाश : ९५५२४९८६५६
*तांत्रिक अडचणी व अधिक माहितीसाठी*-
प्रा. हर्षवर्धन पंडित : ९८६०८३९११७ /
प्रा. सरिता बलशेटवार : ९८८१६९७९५६ /
ऋषिकेश : ७७१९८१११७४
आपला,
*प्रा. निर्भय विसपुते*
विभाग प्रमुख, कोल्हापूर विभाग