Pune. पुण्यासाठी कायपण

  • Home
  • India
  • Pune
  • Pune. पुण्यासाठी कायपण

Pune. पुण्यासाठी कायपण Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune. पुण्यासाठी कायपण, Public & Government Service, Pune.

पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे.

शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्

षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी';शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानली जाते.पुणे शहर उद्दोग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.


नाव

पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी त्याला 'पूना' संबोधण्यास सुरुवात केली. आता हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.


इतिहास

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.

१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.

भूगोल

जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.

पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झालाहोता.

डोंगर आणि टेकड्या -

पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत.

कात्रजची टेकडी
गुलटेकडी
चतुःशृंगी
तळजाई
तुकाई
पर्वती
पाचगाव
पाषाण
फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
बकरी हिल
बावधनची टेकडी
बोपदेव घाट-टेकडी
येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
राम टेकडी
रेंज हिल्स
वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
वाघजई
विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्‌एन्‌डीटीची टेकडी)
वेताळ टेकडी
सिंहगड
सूसची टेकडी
हनुमान टेकडी

नद्या, तलाव, हौद आणि नाले -

आंबील ओढा
इंद्रायणी
एस पी कॉलेजचा तरणतलाव
करपे तलाव(हा कॉंग्रेस हाउससमोर होता)
कात्रजचा तलाव
काळा हौद
कोंढव्याचे तळे
गोपाळ हायस्कूलचा तरणतलाव
टिळक तरणतलाव
तळजाई तलाव
देव नदी
धनकवडी तरणतलाव
नाग नदी
नागझरी
नाना हौद
नांदे तरणतलाव
पंचहौद
पद्मावती तळे
पवना नदी
पाषाण तलाव
पेशवेकालीन कात्रजचा पाट
फडके हौद
भामा नदी
महाराष्ट्रीय मंडळाचा तरणतलाव
मानस सरोवर
मुठा उजवातीर कालवा
मुठा डावा तीर कालवा
मुठा नदी
मुळा नदी
भैरोबा नाला
शाहू तरणतलाव
शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
सदाशिव पेठ हौद
साततोटी हौद
सारसबाग तळे

पूल

मुठा नदीवरील पूल-

वारजे पूल(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
राजाराम पूल
म्हात्रे पूल
एस.एम.जोशी पूल
यशवंतराव चव्हाण पूल
लकडीपूल (संभाजी पूल)
झेड पूल (Z-Bridge))
भिडे पूल
जयंतराव टिळक पूल
ओंकारेश्वर पूल
नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
दगडीपूल (डेंगळे पूल)
संगम पूल(रेल्वेचा आणि वाहनांचा)
आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल आणि काही कॉजवे.

मुळा नदीवरचे पूल -

औंधचा पूल
बोपोडीचा पूल
दापोडीचा हॅरिस ब्रिज
बंड गार्डन पूल


ओढ्या-नाल्यांवरील पूल -

भैरोबा नाला पूल
नागझरी वरचा दारुवाला पूल
आंबील ओढ्यावरचा पूल
उजव्या-डाव्या कालव्यांवरचे पूल

04/10/2022
27/07/2022
07/07/2022
23/08/2021

Maharashtra Desha, Marathi News, Latest Marathi News, News in Marathi, Marathi Batmya, Breaking News in Marathi, Latest News in Marathi, ताज्या मराठी बातम्या, मराठीतील बातम्या, मराठी बातम्या लाइव, म.....

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune. पुण्यासाठी कायपण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pune. पुण्यासाठी कायपण:

Share