02/09/2026
महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक...
📍स्वारगेट, पुणे
महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहरातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र याठिकाणी झाला. प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पार पडत असलेल्या या पहिल्याच राज्यस्तरीय बैठकीला लाभलेल्या १००% विक्रमी सदस्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात एक आगळीवेगळी ऊर्जा निर्माण केली होती. यावेळी बैठकीची प्रस्तावना मांडत सर्वांशी संवाद साधला.
'मा. देवेंद्रजी आणि मा. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित पार पडत असलेल्या या बैठकीत अपेक्षित असलेल्या सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शवून पक्षकार्याप्रती असलेली निष्ठा, उत्साह आणि आपल्या नेतृत्वावरील विश्वास दाखवून दिला आहे. त्यामुळे ही बैठक आपल्या सर्वांना आगामी काळासाठी नवी ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी ठरेल. तसेच भारतीय जनता पार्टी हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, कार्यकर्त्यांच्या त्यागावर आणि निष्ठेवर उभी राहिलेली भक्कम जनसंघटना आहे.
दोन खासदारांपासून ते आज पूर्ण बहुमतापर्यंतचा हा दैदीप्यमान प्रवास केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या जिद्दीवर शक्य झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या एका-दुसऱ्या मेळाव्याने हादरून जायला भाजपाचा पाया इतका कमजोर नसून, आगामी काळात सर्व विरोधक हे पाहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान यावेळी बैठकीमध्ये राज्याची राजकीय स्थिती व युवक कल्याण आणि सामाजिक सद्यस्थितीवर पक्षाकडून दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आले. हे प्रस्ताव आगामी काळत पक्षाला व समाजाला नवी दिशा देतील, अशी भावना देखील यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री मा. आशिषजी शेलार, मंत्री मा. गिरीशजी महाजन, मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधरजी मोहोळ, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, माजी खासदार श्री. रावसाहेबजी दानवे पाटील, मा. सुधीरजी मुनगंटीवार आदींसह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Devendra Fadnavis Ravindra Chavan
Murlidhar Mohol Chandrakant Patil
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Girish Mahajan
Madhuri Misal Raosaheb Patil Danve
Sudhir Mungantiwar BJP Maharashtra
[BJP, BJP Maharashtra, State Executive Meeting, Devendra Fadnavis, Ravindra Chavan, Pune, Maharashtra, Rajesh Pande]