Raviraj Kale

Raviraj Kale प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी, युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य

03/09/2026

विरोधाचा उत्तर विचार आणि चर्चा असावी, मारहाण नाही!
​डीजेला किंवा कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने दिला आहे. जर विचार पटत नसतील तर संवाद साधा, कायदेशीर मार्ग निवडा; पण असा भ्याड हल्ला करणे म्हणजे स्वतःच्याच असहिष्णुतेचे प्रदर्शन करणे होय. अशा गुंडगिरीचा कडक शब्दांत निषेध आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी हीच मागणी!

29/08/2026

आधीच्या वृक्ष गणनेचा हिशोब द्या, मगच नवीन निविदा काढा!

Corruption Transparency MaharashtraPolitics

आनंदनगर SRA प्रकरणात माध्यमांनी घेतलेली दाखल
27/08/2026

आनंदनगर SRA प्रकरणात माध्यमांनी घेतलेली दाखल

23/08/2026

पेट्रोलमध्ये इथेनॉल, तरीही भाव गगनाला भिडलेत. बाहेरून साखर आयात करण्याची वेळ, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. प्रश्न एकच आहे: 'नेमका फायदा कोणाचा?' हा व्हिडिओ पाहा आणि महागाईचे हे दुष्टचक्र समजून घ्या.

"

खड्ड्यांनी बळी घेतलेला ११ वर्षीय ऋषभाचा मृत्यू ही केवळ एक घटना नसून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तो एक 'हत्या' आहे!​आज म...
20/08/2026

खड्ड्यांनी बळी घेतलेला ११ वर्षीय ऋषभाचा मृत्यू ही केवळ एक घटना नसून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तो एक 'हत्या' आहे!

​आज महाळुंगे येथील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आम्ही कॅन्डल मार्च काढून प्रशासनाचा निषेध केला. रस्ते केवळ कागदावर दुरुस्त नकोत, तर ते सुरक्षित हवेत. जोपर्यंत रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, अन्यथा आमचा आक्रोश रस्त्यावर उतरेल!

16/08/2026

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक, मा. श्री. अरविंद केजरीवाल साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि लोककल्याणासाठी दिलेल्या योगदानामुळे आपण अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. आपले आयुष्य निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.! . . .

जिल्हा भूमी अधीक्षक सूर्यकांत मोरे यांना बिल्डर, राजकारण्यांना मदत करणे, मोजणीत हेराफेरी करणे आणि शासकीय महसुलाचे नुकसान...
11/08/2026

जिल्हा भूमी अधीक्षक सूर्यकांत मोरे यांना बिल्डर, राजकारण्यांना मदत करणे, मोजणीत हेराफेरी करणे आणि शासकीय महसुलाचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सप्टेंबर 2025 मध्ये निलंबित करण्यात आले आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याने चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीच्या जागेचे दोन तुकडे करून बिल्डरच्या फायद्याचा घेतलेला निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कायम ठेवल्यामुळे आश्चर्य वाटते.दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रकल्पाचे काम थांबवावे.

E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झालीय? तक्रार कुठे करावी कळत नाहीये?​E20 विरोधात १४ तारखेला होणाऱ्या 'महाराष्ट्र टाऊन हॉल'बाबत...
10/08/2026

E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झालीय? तक्रार कुठे करावी कळत नाहीये?
​E20 विरोधात १४ तारखेला होणाऱ्या 'महाराष्ट्र टाऊन हॉल'बाबत पत्रकार परिषद संपन्न!
​ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झालेय, त्यांनी नक्की संपर्क साधा. आपण मिळून आवाज उठवूया!

संपर्क:9673268485

06/08/2026

"टेंडर काढून टक्केवारी हवी असेल तर ती आम्ही भीक मागून गोळा करून देतो; पण विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करून शालेय साहित्य द्या!"

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ६० हजार विद्यार्थ्यांसाठी DBT चा पारदर्शक प्रस्ताव तयार केला होता. मग तो फेटाळला का?

विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा ठेकेदारांचा नफा महत्त्वाचा का?

पारदर्शकता हवी... ठेकेदारीचा नफा नको! शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, बाजार नाही!

Address

Pune

Telephone

9673268485

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raviraj Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share