23/03/2026
अक्षर मानव आयोजित
|| अक्षर मानव संवाद सहवास : २३ ||
जमिनीतून उगवून कर्तबगारीच्या सुंदर झेपा घेणारी दोन अवलिया माणसं.
दोन माणसांसोबत एकाच वेळी भन्नाट आणि कर्तबगारीच्या कोणतीही क्षेत्रात उभारी देणारा संवाद सहवास.
शेतीमाती, कला, साहित्य, नाटक, चित्रपट क्षेत्राची भरारी घेणारी आणि मातीशी कायम नाळ जुळवून ठेवून जगणारी दोन कष्टाळू माणसं, अरविंद जगताप आणि राजकुमार तांगडे यांच्याशी संवाद सहवास.
समाजात राबलेल्या, राबत असलेल्या आणि समाजाला उपयोगी पडणाऱ्या माणसांना बोलवावं आणि सलग त्यांच्या संगतीत राहावं, त्यांना, त्यांच्या कामाला समजून घ्यावं. त्यांना ऐकावं, मनमोकळ्या गप्पा माराव्यात त्यांच्याशी आणि आपल्या स्वतःच्या जगण्यासाठी, स्वतःसोबत आपला समाज उन्नत होण्यासाठी काही धागे सापडतात का ते शोधावं, असा एक 'संवाद सहवास' नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो.
या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, सयाजी शिंदे, डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे, निरंजन टकले, ॲड. असीम सरोदे, विवेक सावंत, राजू परुळेकर, सौंदाळा गाव यांच्याशी झाले. आता संवाद सहवास होतोय आपापल्या कलांच्या आणि जगण्याच्या भूमिकांच्या स्वतःच्या वाटा स्वतः तयार केलेली दोन निर्मळ आणि साधी माणसं, अरविंद जगताप आणि राजकुमार तांगडे यांच्याशी.
निवांत, शांत ठिकाणी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे.
दिनांक : २५ आणि २६ एप्रिल २०२६ (दोन दिवस)
वेळ : पहिल्या सकाळी १० पासून दुसऱ्या संध्याकाळी ६ पर्यंत.
स्थळ : जालना
बाहेरगावाहून येणारांची राहण्याजेवणाची सोय आहे.
फी : ५०० रुपये : अक्षर मानव आजीव सदस्यांना ३०० रुपये.
नावनोंदणी संपर्क
फक्त वाट्स अप मेसेज :
राजेश गवई : +919595181884
प्रा. यशवंत सोनुने : +919422725330
विनोद वाघ : +919975137558