27/03/2026
"आग्र्याहून सुटका"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्तथरारक आग्र्याहून सुटकेविषयी परिपूर्ण संशोधनात्मक ग्रंथ....! फक्त या आग्र्याहून सुटकेच्या घटनेला वाहिलेला ग्रंथ.....!
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून केंव्हा निसटले?
रूढ समजुतीप्रमाणे ते दि. १७ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटाऱ्यांत बसून औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
पण ते खरोखरच या दिवशी निसटले? कि या तारखेच्या कित्येक दिवस आधीच फौलादखानाच्या हातावर तुरी देऊन निघून गेले?
महाराज आणि संभाजी राजे मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये लपून नजरकैदेतून निसटले की वेषांतर करून निघून गेले?
छोट्या संभाजी राजांना बरोबर घेऊन गेले कि मागे आग्र्यातच ठेवून गेले?
आपल्या सुटकेसाठी, आणि आपल्या जिवलग सहकाऱ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी कुठली गुप्त योजना आखली? ती कशी सिद्धीस नेली?
शिवाजीमहारांजांच्या जीवनातील आणि महाराष्ट्राच्या तसेच हिंदुस्थानच्या इतिहासातील या अत्यंत महत्वाच्या घटनेचा अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांच्या पुराव्यांच्या आधाराने केलेला उलगडा "आग्र्याहून सुटका" याच नावाच्या संशोधन ग्रंथात वाचा!
आपली प्रत मागविण्यासाठी खालील WhatsApp वर संदेश पाठवा!
https://wa.me/+919922431609
....कृपया आपल्या संदेशात पुस्तकाचे नावही लिहा!
छत्रपति शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका हा अतिशय गहन आणि गुंतागुंतीचा विषय आहे. या एकमेवाद्वितीय घटनेचे अनेक कंगोरे आणि पदर आहेत. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे गुपित समजण्यासाठी फक्त त्यांच्या आणि औरंगजेबाच्या हालचालींचा मागोवा घेऊन भागत नाही. इतर अनेक अनुषांगिक गोष्टींची माहिती जाणून घ्यावी लागते. उदाहरणार्थ, घोड्यांच्या दौडण्याचा वेग, त्या काळातील संदेशवहनाची व्यवस्था आणि त्यासाठी लागणार वेळ, प्रवासात राहण्यासाठी असलेल्या सराया, इत्यादी.
प्रस्तुत "आग्र्याहून सुटका" ग्रंथांत या घटनेचे सर्व उपलब्ध अस्सल ऐतिहासिक पुरावे अनुषांगिक माहितीच्या आधारे सुलभतेने मांडले आहेत, त्यांचे विश्लेषण केले आहे. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा नवा सिद्धांत मांडला आहे.
आग्र्याहून सुटकेची मिठाईच्या पेटाऱ्यांची कथा चुकीची कशी आहे इथून सुरुवात करून एकूण १६ प्रकरणांमधून शिवाजीमहाराजांचे आग्र्याहून सुटकेचे रहस्य उलगडून दाखविले आहे. शेवटी पेटाऱ्यांची कथा का पसरली याचेही विवेचन केले आहे. शिवाय दहा नकाशे आणि दोन परिशिष्टे समाविष्ट केली आहेत. एकूण १०३ संदर्भग्रंथांची मदत घेऊन हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
"आग्र्याहून सुटका" - "Agryahun Sutka" (Marathi)
लेखक / Author - डॉ. अजित जोशी / Dr. Ajit Joshi
प्रकाशक / Publisher - शिवप्रताप प्रकाशन, पुणे / Shivapratap Prakashan, Pune
पृष्ठे ३०४ / Pages 304
१६ प्रकरणे / 16 Chapters
१० नकाशे / 10 Maps
२ परिशिष्टे / 2 Appendices
१०३ संदर्भग्रंथ / 103 References
पुठ्ठा बांधणी / Hard Bound
२ साहित्य पारितोषिकांचे विजेते / Winner of 2 Literary Awards
मूल्य / Price - रु. ३३०/- (टपाल खर्च अधिक) / Rs. 330/- (plus postage or courier charges)
मुखपृष्ठावर शिवाजीमहाराजांचे सुंदर चित्र आणि पुठ्ठा बांधणी असलेले हे पुस्तक फक्त रु. ३३०/- (टपाल खर्च अधिक) मध्ये उपलब्ध आहे. हा ग्रंथ खरेदी करण्यासाठी पुस्तकाच्या चित्राखालील WhatsApp वर क्लिक करून लवकरात लवकर संदेश पाठवा. https://wa.me/+919922431609
.............कृपया आपल्या संदेशात पुस्तकाचे नावही लिहा!