26/06/2026
🚩पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आज दिवसभर नागरिकांमध्ये….
मागील काही दिवसांपासून पावसाअभावी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने माझ्या प्रभागातील पर्वती दर्शन भागामध्ये अनेक ठिकाणी गेल्या २–३ दिवसांपासून पाणी पोहोचत नव्हते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आज मी स्वतः प्रभागातील प्रत्येक भागाला भेट दिली, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला तसेच संबंधित पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
🚩नागरिकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे कर्तव्य…
ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होत होता, त्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर वापरासाठी बोअरवेलच्या पाण्याचे नळ (टॅप) उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.
🚩आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर…
नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मी, माजी नगरसेवक रघुनाथ गौडा व नगरसेविका सौ. लता रघुनाथ गौडा तसेच आमची संपूर्ण टीम सातत्याने संबंधित पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या संपर्कात राहून आवश्यक ती कार्यवाही करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक नागरिकापर्यंत मूलभूत सुविधा वेळेत पोहोचाव्यात, यासाठी आमचा कायम प्रयत्न राहील.
#पर्वतीदर्शन #पाणीपुरवठा #पाणीसमस्या #पुणेमहानगरपालिका #दत्तवाडी जनसेवा नागरिकसेवा लोकसेवा पुणे ParvatiDarshan Pune WaterSupply PublicService CitizenFirst TeamWork CommunityService