District Information Office Pune

District Information Office Pune Page Designed and Published By DIO, Pune
(2)

- महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे.
- दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे.
- शासकीय जाहिरातीचे वितरण करणे.
- राज्य शासन त्याचबरोबर पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे.
- राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.

 #पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ-द्विवार्षिक निवडणूक २०२६एकूण ७ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र.Chief Electoral...
01/06/2026

#पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ-द्विवार्षिक निवडणूक २०२६

एकूण ७ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र.

Chief Electoral Officer Maharashtra

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाईकारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्तअन्न व औषध प्...
01/06/2026

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

कारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली; यामध्ये १९ लाख ३ हजार ३७९ लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सहायक आयुक्त (अन्न्) दि.वा. भोगावडे यांनी दिली आहे.

आंबेगाव तालुक्यात मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस व समीक्षा कोल्ड्रिक जनरल अॅड किराणा स्टोअर यांच्या पाठीमागील छोट्या गोदामामध्ये दोन ठिकाणी ३० हजार ३९५ रुपयाचा गुटखा, पानमसाला व इतर तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधितावर भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार पोलीस स्टेशन, मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर येथे खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही आस्थापना विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. तसेच येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला मैदा, बेसन, आटा व इतर अन्नपदार्थ असा १९ हजार ८८६ किलोचा १० लाख ४९ हजार ३६४ रुपये किमतीचा साठा नमुना विश्लेषणासाठी घेऊन जप्त करण्यात आला.

खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील उज्वल सुपारी ही आस्थापना विनापरवाना, नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. या आस्थापनेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी ही अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून १ हजार ८९८ किलो वजनाचा आणि ८ लाख १६ हजार १४० रुपयाचा साठा जप्त करण्यात आला.

नरे येथील ओम साई फरसाण या आस्थापनेची तपासणीदरम्यान फाईड ग्रीन वाटाणा या अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने फाईड ग्रीन वाटाणा या अन्न पदार्थाचे व यात वापरला जाणारा कृत्रिम रंगाचे नमुने तपासणीसाठी घेऊन ६८ किलो असे ७ हजार ४८० रुपयाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकात साळवे, अभिजीत झोडगे, आदित्य जोशी, सकेत सूर्यवंशी व नमुना सहाय्यक श्री. साळवे याच्या पथकाने या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. नारायण सरकटे प्रदीप आंबरे यांच्या उपस्थितीत व पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्री. दि. वा. भोगावडे यांच्या निर्देशान्वये पार पडली. अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकाच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच निकृष्ट भेसळयुक्त व बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध अशा मोहिमा सुरूच राहणार असून नागरिकानी याबाबतची माहिती प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

01/06/2026

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील (ग्रामा-४५ कि. तर. १/०००) मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी जारी केले आहेत.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे कातवडीकडून डावजे–कुरणकडे जाणारी वाहतूक कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण–डावजे बाजूकडून कातवडीकडे येणारी वाहतूक कुरण–जांभळी–डावजे -कोंढूर–बहुली–कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

01/06/2026

पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील (प्र.जि.मा. ३७) कि.मी. १४/०४५ येथे पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत बंद करण्यात आल असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केले आहेत.

सदर पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना व जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

लवासा, वरसगाव व आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुणेकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर मार्गे वळविण्यात येत आहे.

नागरिकांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.

01/06/2026

शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता वेळापत्रक जाहीर

३० जून पासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता शासकीय वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पध्दतीने होणार असून इयत्ता ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज https://hmas.mahalt.org या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहे. याबाबतचे शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरिता निर्गमित करण्यात आलेल्या वेळापत्रकाचा विचार करुन विहीत कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

वसतिगृह प्रवेशासाठी अनुक्रमे अर्ज करण्याची मुदत व कंसामध्ये प्रवेशाची यादी प्रसिध्द करावयाचा दिनांक पुढीलप्रमाणे शालेय विद्यार्थी ३० जून (७ जुलै), इयत्ता ११ वी व १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्याकरिता १५ जुलै (३१ जुलै) असा आहे.

जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत एकूण २६ मागासवर्गीय मुलां-मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये १५ मुलांची व ११ मुलींची आहेत. पुणे व पिंपरी-चिचंवड शहरामध्ये एकूण १४ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलांची ९ व मुलींची ५ वसतिगृहे आहेत. तसेच १२ शासकीय वसतिगृहे ही तालुकास्तरावर आहेत.. तरी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी या शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. लोंढे यांनी केले आहे.

 #पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६नोडल अधिकारी कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश ज...
01/06/2026

#पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६

नोडल अधिकारी कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी

Chief Electoral Officer Maharashtra

औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रमाणपत्र, पदविका व प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. विद्यार्थ्यांनो, या ...
01/06/2026

औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रमाणपत्र, पदविका व प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. विद्यार्थ्यांनो, या संधीचा लाभ घ्यावा.








31/05/2026

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

एकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आज (दि. ३१ मे) प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश असून त्यामध्ये ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नोंदणी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील मतदान केंद्रांचा समावेश आहे :
१) श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल, जुनी दगडी (हेरिटेज) इमारत, शिवाजीनगर, पुणे
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल, प्राथमिक शाळा, खराळवाडी, पिंपरी चिंचवड
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर
४) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर
५) विद्याधाम प्रशाला, शिरूर
६) नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), दौंड
७) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, मुलींची शाळा, बारामती
८) एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड
९) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कन्याशाळा, भोर
१०) न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा, वडगाव मावळ
११) रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, माळवाडी, हडपसर

मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पात्र सदस्यांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.

अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती तसेच सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणूक विभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Chief Electoral Officer Maharashtra
#पुणे #पुणेस्थानिकप्राधिकारीमतदारसंघ #महाराष्ट्रविधानपरिषद #मतदारयादी #अंतिममतदारयादी #मतदानाचा_हक्क #लोकशाही #पुणेजिल्हा

31/05/2026

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.

कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी:

• शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये
• ⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे

Address

Ground Floor, New Central Building, Behind Sassoon Hospital
Pune
411001

Website

https://mahasamvad.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office Pune:

Share