Seva Sagar Foundation

Seva Sagar Foundation Seva Sagar Foundation is a non profit organization working in the field of Social work

सामन्यातून असामान्य होण्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजे 🩺 डॉ पल्लवी पाटील (प्रसाद). आपण सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्...
27/11/2025

सामन्यातून असामान्य होण्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजे 🩺 डॉ पल्लवी पाटील (प्रसाद). आपण सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. समुपदेशक, लेखक, fashion icon, अभिनय, podcast, समाजकार्य, महिला सक्षमीकरण अशा अनेकविध क्षेत्रांत अल्पावधीत यश संपादन केले. तसेच अनेक महिलांना आपले ध्येय मिळवण्यासाठी सहाय्य केले.

सेवा सागर परिवारातर्फे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवोत आणि आपल्या हातून समाजाची आणि देशाची सेवा घडो हीच सदिच्छा 💐🎂🎁🎈

✍️ राधिका (माजगावकर) पंडित...सूर निरागस  हो..सन सॅटेलाईट सोसायटी मधली श्री. केदार सौ. प्रिया, कु. सई व रमा क्षीरसागर ही ...
15/11/2025

✍️ राधिका (माजगावकर) पंडित...सूर निरागस हो..

सन सॅटेलाईट सोसायटी मधली श्री. केदार सौ. प्रिया, कु. सई व रमा क्षीरसागर ही अतिशय उत्साही, नवनविन उपक्रम राबवणारी फॅमिली म्हणून मी ओळखते. "विद्यार्थ्यांची स्वारी पोलिसांच्या द्वारी" हे हे नाविन्यपूर्ण नावच उत्कंठा वाढवणारं होतं. ह्या नावाकडेच मी आकर्षित झाले. हे नेमकं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर ,त्या समस्त मंडळीत सहभागी झाल्यावर पोलिस चौकीवर गेल्यावर, मला काय सगळ्यांनाच मिळालं . लहानपणी आपण मुलांना शिकवतो – खोटं बोलू नकोस, चोरी कधी करू नकोस – हे संस्कार उत्तमच आहेत. इथपर्यंत ठीक आहे. पण “ चुकीचं वागलास तर तुला पोलिस पकडून नेतील” हे वाक्य मात्र दिशाभूल करणारं आहे. त्यामुळं पोलिसांच्या बाबतीत गैरसमज आणि एक दहशत बालमनावर कोरली जाते.
सॅटेलाईट c मधल्या श्री सोमाणी ह्यांच्याकडे आलेल्या चिमुकल्या पाहुणीने मला प्रश्न विचारला – “आंटी, ह्या मुलांनी काही चोरी केली नाही, मग तुम्ही ह्या मुलांना घेऊन पोलिसांकडे का जाताय?” इतक्या मुलांना बघून तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं.तिला मी थोडक्यात समजावलं, तरीपण तिच्या बालमनात धाकधूक आणि डोळ्यात प्रश्नचिन्ह होतीच, अखेर त्या धिटुकलीनी मनातली शंका मोकळी केली आणि धिटाईने मला प्रश्न विचारला. "सांगा नं आंटी तुम्ही नक्की कुठल्या पोलिसांकडे जाणार ट्राफिक मधल्या पोलिसांकडे की चोर पकडणाऱ्या पोलिसांकडे अजूनही तिच्या मनांत थोडीफार धाकधूक होतीच. तिला नेमकं उत्तर हवं होतं पोलीस चौकीबद्दल मनांत भीती होती.तिला जवळ घेऊन मी समजावलं,"बरं का बाळा!पोलीस आपले हितकर्ते. मदत करणारे, आणि संकटाच्या वेळी धावून येणारे देवदूतच असतात. तुमच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, भीती जावी, माहिती मिळावी म्हणून केदार काकांनी ही भेट ठरवलीय.
बाल मनातलं कोडं सुटलं
आणि काय सांगू! पोरगी खुदकन् निरागस हसली. आणि हीच निरागसता, शंकानिरसनता. पोलिस चौकीवर पोलिसांची, उच्च पदाधिकारी वर्गाची मुलांनीच घेतलेल्या मुलाखतीत, मिळालेल्या माहितीमुळे आनंद झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावर मला दिसली. समस्त अधिकारी वर्गही खुशीत हंसत होता. त्या बालचमूबरोबर तेही बालक झाले होते.
मुलांशी दोस्ती करून त्यांनी मुलांची मनं जिंकली. बाल मंडळींच्या चेहऱ्यावरील तेज, मोकळेपणा बघून मनात आलं – आतां भीती सरली, ,शंका मिटल्या , आणि 'झाले मोकळे आकाश!'

" कु.सई रमाने दिलेल्या पेन भेटी मुळे,. श्री केदार काकांनी आणि . प्रिया आंटी ने दिलेल्या खाऊ मुळे मुलं खुश होऊन पोलिस चौकीच्या बाहेर पडली.
देशसेवेसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या सैनिकांना आपण खूपखूप मानतो. तितकाच आदर, आपलेपणा,महानता या पोलीस अधिकारी मंडळांच्या बाबतीतही आपल्या मनात जागरूक असायलाच हवीय होनां ?. त्यांच्या कार्याला, समाजसेवेला, कर्तव्यनिष्ठेला माझा मनापासून सलाम!

सिंहगड रोड पोलीस चौकी वरील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे, API सौ. वैशाली भोसले मॅडम आणि इतर अधिकारीवर्ग ह्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून मुलांशी व आमच्याशी केलेल्या मैत्रीचा आनंद घेऊनच आम्ही पोलीस चौकीतून बाहेर पडलो.

मुलांच्या निरागस, भाबड्या चेहऱ्यावर खुशीची पावती झळकत होती. श्री. सचिन बेनकर यांनी आमच्या वतीने मानलेल्या आभारा बद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार. धन्यवाद मंडळी!
तुम्हीही ह्या देवदूतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.
लेखन = राधिका . गोपीनाथ (माजगावकर ) पंडित व पंडित परिवार. सन सॅटॅलाइट बी 902

विद्यार्थांची स्वारी... पोलिसांच्या द्वारी या उपक्रमाबद्दल बालदिनानिमित्त आलेली ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया... 🙏🙏🙏

Thank you Pandit kaku...

It's always pleasure to support our blind brothers and sisters in any way possible... We are happy that we could help wi...
03/11/2025

It's always pleasure to support our blind brothers and sisters in any way possible... We are happy that we could help with our small and humble contribution... (खारीचा वाटा)

🇮🇳 *आधार सोशल ट्रस्ट, धायरी, पुणे* या संस्थेच्या वतीने सीमेवरील भारतीय जवानांसाठी जवळपास गेली दहा वर्षे दिवाळीचा फराळ, न...
06/10/2025

🇮🇳 *आधार सोशल ट्रस्ट, धायरी, पुणे* या संस्थेच्या वतीने सीमेवरील भारतीय जवानांसाठी जवळपास गेली दहा वर्षे दिवाळीचा फराळ, नागरिकांकडून संकलित करून / तयार करून, *"मायेचा एक घास...भारतीय जवानांसाठी"* हा उपक्रम राबवण्यात येत असतो. या उपक्रमात खारीचा वाटा म्हणून *सेवा सागर फाउंडेशन* तर्फे काही मदत करण्यात आली.

याप्रसंगी श्री मंदार रायकर, श्री लक्ष्मीकांत सुपेकर, सौ प्रिया क्षीरसागर आदी उपस्थित होते.

श्री संतोष एकनाथ चाकणकर व श्री अर्जुनराव वाशिवले यांनी याप्रसंगी प्रत्यक्ष सीमारेषेवरील काही किस्से व अनुभव सांगितले... ते ऐकून अंगावर रोमांच उभा राहिला.

आधार सोशल ट्रस्ट चे कार्य खरंच प्रशंसनीय व स्तुत्य आहे. सीमेवर जवान रात्रंदिवस उभे आहेत म्हणून आपण आपल्या घरी शांत झोपू शकतो. जेव्हा आपण गोडधोड खाऊन, फटाके वाजवून दिवाळी साजरी करीत असतो त्याचवेळी हे जवान ऊन, वारा, पाऊस, गारा, या कशाचीही पर्वा न करता शत्रूशी लढत असतात... अपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात... आपल्या जीवाची बाजी लावत असतात. त्यामुळे अशा जवानांसोबत प्रत्यक्ष बॉर्डरवर जाऊन दिवाळी साजरी करणं... त्यांना दिवाळीचा फराळ देऊन आनंद देणे हा विचारच मुळात फार उच्च आहे... आणि असा विचार करून शांत न बसता गेली अनेक वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवणाऱ्या आधार सोशल ट्रस्टच्या सर्वच सभासदांचे मनापासून कौतुक व त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🫡🫡🫡

Santosh Eknath Chakankar Page
Mandar Raykar
Laxmikant Supekar

02/10/2025

Shri Sai Education Trust Pune चे मनःपूर्वक आभार....

दत्तात्रय फाउंडेशन तर्फे आज हिरकणी पुरस्कार प्रदान सोहळा, वीर बाजी पासलकर सभागृह, सिंहगड रोड येथे मोठ्या उत्साहात पार पड...
28/09/2025

दत्तात्रय फाउंडेशन तर्फे आज हिरकणी पुरस्कार प्रदान सोहळा, वीर बाजी पासलकर सभागृह, सिंहगड रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता, खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करून संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभ्या राहणाऱ्या वाघीणींची निवड या पुरस्कारासाठी केली होती .... त्याबद्दल दत्तात्रय फाउंडेशन च्या सर्वेसर्वा श्रीमती गायत्री ताई जवळगीकर यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.

या सोहळ्यात सेवा सागर फाउंडेशन चे श्री केदार क्षीरसागर यांच्या हस्ते काही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्री क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वेदकाळातील, रामायणातील, महाभारतातील महिलांचे दाखले देत त्या काळातील महिला कशा स्वतंत्र, स्वाभिमानी, कर्तृत्ववान, अभ्यासू होत्या हे सांगितले. तसेच मधील काळात भारताची झालेली दुर्दशा आणि सध्याच्या काळात महिलांसाठी असणाऱ्या संधी याविषयी भाष्य केले.

याप्रसंगी पुण्यनगरीच्या नगरसेविका ॲड. गायत्री ताई खडके व AFMC चे श्री पर्णल देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सर्व पुरस्कार्थींचे म्हणजेच हिरकणींचे मनःपूर्वक अभिनंदन व दत्तात्रय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे खूप खूप कौतुक व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

श्री सागर शेडगे सर...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹आमचे मार्गदर्शक, कायम हसतमुख असणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे,...
01/09/2025

श्री सागर शेडगे सर...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
आमचे मार्गदर्शक, कायम हसतमुख असणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, विद्यार्थीप्रेमी, शिक्षण प्रेमी, समाजातील अनेकांचे प्रेरणास्रोत असलेले व
श्री साई एज्युकेशन ट्रस्ट चे...अध्यक्ष...

श्री सागर शेडगे सर

यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे
🩸 रक्तदान शिबीर🩸 आयोजित केले आहे

दिनांक 07 सप्टेंबर 2025
वेळ 9 ते 1 पर्यंत
स्थळ: उत्सव मंगल कार्यालय कोथरूड , पुणे

🩸🩸🩸 *रक्तदान कोणी करावे:*
1. **वय:** १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतात.
2. **वजन:** कमीतकमी ५० किलो वजन असलेली व्यक्ती रक्तदानासाठी पात्र असते.
3. **आरोग्य:** रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असावी. कुठल्याही गंभीर आजाराने पीडित नसावी.
4. **हेमोग्लोबिन पातळी:** रक्तदात्याचे हेमोग्लोबिन किमान १२.५ ग्रॅम असावे.
5. **आजार आणि उपचार:** रक्तदान करण्यापूर्वी ६ महिन्यांपर्यंत कुठलेही मोठे शस्त्रक्रिया किंवा उपचार झालेला नसावा.
6. **डेंगू,मलेरिया, एचआयव्ही आणि इतर संसर्गजन्य आजार नसावेत.**

🩸🩸🩸 *रक्तदान का करावे:*
1. **मानवतेची सेवा**: रक्तदान करून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकता. प्रत्येक रक्तदात्याच्या रक्ताच्या पिशवीतून ३ ते ४ जणांचे प्राण वाचू शकतात.*

2. **आजारग्रस्त रुग्णांची मदत:** आपले रक्त एखाद्या आजारी, अपघातग्रस्त किंवा सर्जरीला सामोरे जाणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवू शकते.
3. **रक्ताचा अभाव:** आपल्याकडे रक्ताचा तुटवडा अनेकदा जाणवतो, विशेषतः डेंगू आणि मलेरियासारख्या आजारांमुळे रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज वाढते.
4. **सामाजिक बांधिलकी:** रक्तदान करून आपण समाजासाठी आणि गरजू व्यक्तींसाठी योगदान देत असतो.
5. **स्वतःच्या आरोग्याची चाचणी:** रक्तदानापूर्वी आपले रक्त तपासले जाते, ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची माहिती मिळते.

🩸🩸🩸 *रक्तदानाचे फायदे:*

1. **हृदयाचे आरोग्य:** नियमित रक्तदान केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
2. **लोह पातळी नियंत्रित राहते:** शरीरातील अतिरिक्त लोह दूर होते, ज्यामुळे आरोग्यावरील ताण कमी होतो.
3. **नवीन रक्त पेशी तयार होतात:** रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्त पेशी तयार होतात.

*आपले बरेच सहकरी आणि ओळखीचे लोक रक्तदान करायला घाबरतात तेव्हा आपण त्यांचे प्रबोधन केले पाहिजे.*
*ही एक सोपी आणि सहज प्रकिया आहे शिवाय भविष्यत
रक्त दात्याला गरज लागल्यास वीनाशुल्क रक्त उपलब्ध होते.*

*कळावे!*
श्री साई एज्युकेशन ट्रस्ट पुणे
सेवा सागर फाउंडेशन

Important information... उपयुक्त माहिती...
19/07/2025

Important information... उपयुक्त माहिती...

पोलिसांना स्वतः मोबाईल वर फोटो काढून वाहनांना दंड करता येणार नाही. असे आढळल्यास पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे शासनाचे आदेश.

श्रीमती गायत्री ताई जवळगीकर यांच्या दत्तात्रय फाउंडेशन चा पाचवा वर्धापन दिन नुकताच पार पडला. या कार्यक्रमास काही अपरिहार...
19/07/2025

श्रीमती गायत्री ताई जवळगीकर यांच्या दत्तात्रय फाउंडेशन चा पाचवा वर्धापन दिन नुकताच पार पडला. या कार्यक्रमास काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून गायत्री ताईंची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे कौतुक केले व त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले. याप्रसंगी श्री प्रकाश जाधव व सौ स्मिता प्रकाश जाधव याही उपस्थित होत्या.

गायत्री ताई व सहकारी गेली अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने समाजासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. यामध्ये प्रामुख्याने वृद्धाश्रम, अनाथाश्रमास मदत, वृक्षारोपण, सामान्यातील असामान्य महिलांना हिरकणी पुरस्काराचे वितरण, रक्तदान, महिला सक्षमीकरणासाठी अनेक विविध उपक्रम, पूरग्रस्तांना मदत, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व इतरही अनेक समाजोपयोगी उपक्रम आहेत.

त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ व सतत गरजूंना मदत करण्याची धडपड ही त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट जाणवते.

गायत्री ताईंच्या या समाजकार्यास सलाम 🙏 व दत्तात्रय फाउंडेशनच्या पुढील उपक्रमास खूप खूप शुभेच्छा 💐

चला... ही वटपौर्णिमा फक्त झाडाची पूजा करून नव्हे तर एक झाड लावून साजरी करूयात... वृक्षारोपण करूयात...🌳
10/06/2025

चला... ही वटपौर्णिमा फक्त झाडाची पूजा करून नव्हे तर एक झाड लावून साजरी करूयात...
वृक्षारोपण करूयात...🌳

🌳🌳🌳 *वृक्षारोपण अभियान 2025 चा उत्साहात शुभारंभ* रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी सकाळी भुगाव,  भूकुम येथील छत्रपती शिवाजी ...
09/06/2025

🌳🌳🌳 *वृक्षारोपण अभियान 2025 चा उत्साहात शुभारंभ*

रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी सकाळी भुगाव, भूकुम येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या नयनरम्य किनाऱ्यावर सर्व भुगाव व भुकूम ग्रामस्थ व नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास आमदार श्री शंकर भाऊ मांडेकर, अभिनेते नाना पाटेकर यांचे सुपुत्र श्री मल्हार पाटेकर, नगरसेवक श्री दिलीप वेडे पाटील, नगरसेविका सौ अल्पनाताई गणेश वरपे, री. कर्नल श्री लक्ष्मण साठे, नाम फाउंडेशनचे श्री निलेश जावळकर, भुगाव व भूकुम चे आजी / माजी सरपंच / उपसरपंच, पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, व्यवसायिक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, सोसायट्यांमध्ये राहणारे रहिवासी, नागरिक, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ॲड. कृणाल घारे यांनी राम नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात व त्याविषयीची कायदेशीर माहिती देत सर्व नागरिकांना त्यांचे हक्क व जबाबदारी याबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

रिटायर्ड कर्नल श्री लक्ष्मण साठे यांनी त्यांच्या काळातील युद्ध आठवणींना उजाळा देत ऑपरेशन सिंदूर व नव्या भारताच्या युद्धक्षमतेविषयी भाष्य केले. तसेच वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धना साठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. तसेच त्यांनी ग्रीन थंब या प्रोजेक्ट विषयी उपस्थितांना माहिती दिली.

श्री साई एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक व साई क्लासेस चे संचालक प्रा. सागर शेडगे सर यांनी सामाजिक कार्य करीत असताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य करीत सर्व कार्यकर्त्यांचे, विशेषतः श्री अनिल करंजावणे यांचे, कौतुक करीत आभार मानले.

सेवा सागर फाउंडेशनचे संस्थापक श्री केदार क्षीरसागर यांनी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या चळवळीचे महत्त्व सांगून नागरी समस्या निवारण समितीच्या आत्तापर्यंतच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. यामध्ये भुगाव स्वच्छता अभियान, राम नदी स्वच्छता अभियान, ट्राफिक मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील गाळ काढण्याचे काम, अनेक प्रबोधनात्मक उपक्रम, यांचा समावेश होता.

नागरी समस्या निवारण समितीचे धडाडीचे कार्यकर्ते श्री अनिल करंजावणे सर यांनी त्यांच्या खडतर प्रवासाविषयी माहिती देत सर्व ग्रामस्थ व नागरिक यांना जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे भावनिक आवाहन केले.

नागरी समस्या निवारण समितीचे भक्कम आधारस्तंभ श्री माऊली शेठ सातपुते यांनी राम नदीचे पुनरुज्जीवन करून कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे महत्त्व पटवून दिले व या कामी शासकीय सहकार्य मिळावे अशी मागणी केली.

नागरी समस्या निवारण समितीचे युवा कार्यकर्ते श्री दीपक चोंदे यांनी वृक्षारोपण अभियान राबवण्याची संकल्पना व भविष्यातील नियोजन याविषयी माहिती दिली.

ह भ प दशरथ महाराज वहाळे यांनी भारतीय संस्कृतीचा दाखला देत सर्व नागरिकांना कचऱ्याचे सुनियोजन करण्याचा सल्ला दिला व उपक्रमास शुभाशीर्वाद दिले.

भूकूमच्या सरपंच सौ गौरीताई भरतवंश यांनी गावातील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देत NSNS च्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले.

श्री मल्हार पाटेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करीत नाम फाउंडेशन चा भक्कम पाठिंबा या कार्यास भविष्यातही असाच मिळत राहील असे सांगितले. तसेच NSNS च्या कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या.

आमदार श्री शंकर भाऊ मांडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व गावांचा सर्वतोपरी विकास करण्याचे आश्वासन देत आत्तापर्यंत घेतलेल्या सरकारी निर्णयान विषयी माहिती दिली. भुगाव व भूकुम मधील प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामध्ये विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

सेवा सागर फाउंडेशनचे श्री केदार क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हे वृक्षारोपण अभियान असेच सुरू राहील व ज्यांना वृक्षारोपण करायचे असेल त्यांनी NSNS किंवा सेवा सागर फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

वृक्षारोपणानंतर श्री जयंत फडके काका यांनी अल्पोपहाराची सोय केली होती.

या कार्यक्रमास भुगाव ग्रामपंचायत, भुकूम ग्रामपंचायत, भुगाव व भुकूम येथे राहणारे सर्व ग्रामस्थ, रहिवासी तसेच श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, सेवा सागर फाउंडेशन, जीवन ज्योत फाउंडेशन, सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, रामकृष्ण प्रतिष्ठान, सेवा फाउंडेशन, देवराई, या व अशा अनेक संस्थांचे सहकार्य लाभले.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿नागरी समस्या निवारण समिती (NSNS) भुगांव आणि सेवा सागर फाउंडेशन, पुणेयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित🌳🌳🌳 *...
07/06/2025

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
नागरी समस्या निवारण समिती (NSNS) भुगांव
आणि
सेवा सागर फाउंडेशन, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

🌳🌳🌳 *वृक्षारोपण अभियान २०२५* 🌳🌳🌳

🌴 *चला झाडे लावूया...*
🌴🌴 *पर्यावरण संवर्धनासाठी...*
🌴🌴🌴 *आपल्या उज्वल भविष्यासाठी...*

आपल्या कुटुंबियांसोबत व मित्र परिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थित रहा 🧑‍🤝‍🧑👭👬👫

🌹 🌹 अभियानाचा शुभारंभ 🌹 🌹
🗓️ *रविवार, दि. ८ जून २०२५*
⏰ *सकाळी ठीक ८:३० वा*
📍 *छ. शिवाजी महाराज जलाशय (मानस तलाव) भुगाव*

*टीप:* सदर अभियान जून व जुलै हे दोन महिने सुरू राहणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा:

*श्री केदार क्षीरसागर (KK)*
*सौ प्रिया केदार क्षीरसागर*
☎️ *7875443869*

🌿🌿🌿 *_अधिक माहिती_* 🌿🌿🌿
माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन अनिवार्य आहे. माणूस एक वेळ पाण्या वाचून किंवा अन्ना वाचून काही दिवस जगू शकतो... परंतु ऑक्सिजन नसेल तर काही मिनिटातच मृत्यू अटळ आहे. त्यामुळे ऑक्सिजन हा जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. याचा अनुभव आपण सर्वांनी कोविड काळातही घेतला आहे. त्या काळात पैसे असूनही ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला... आणि हाच ऑक्सिजन आपल्याला मोफत मिळतो तो झाडांपासून. झाड / वृक्ष ही ऑक्सिजन बनवण्याची नैसर्गिक मशीन आहे... ती ही मोफत.

वृक्षांचे अनेक फायदे आहेत... ते जमिनीची धूप थांबवितात... जमिनीतील पाणीसाठा वाढवितात... मोठे मोठे वृक्ष पाऊस पाडण्यासाठी मदत करतात... वृक्षांमुळे निसर्ग बहरतो व सुंदर दिसतो... ते सावली देतात... फळे देतात... फुले देतात... प्रदूषण कमी करतात... असे असंख्य फायदे वृक्षांमुळे होतात, परंतु भारतात गेली काही दशके वृक्षतोडीचे प्रमाण भयंकर वाढले आहे. त्यामुळे आता वृक्षतोड तर थांबवावीच लागेल, परंतु वृक्षारोपण करून झाडे लावणे व ती जगवणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे.

भारतीय संस्कृतीत वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पतीव्रता महिला वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, परंतु भविष्यात जर वृक्षच नाहीसे झाले तर प्रार्थना कोणाकडे करणार? त्यामुळे आपल्या निरोगी भविष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी, निसर्ग संवर्धनासाठी, धरती मातेच्या रक्षणासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे.

*मोठ्या संख्येने उपस्थित रहा...!*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Shri Sai Education Trust Pune

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seva Sagar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category