कृषी विभाग महाराष्ट्र शासन

  • Home
  • India
  • Pune
  • कृषी विभाग महाराष्ट्र शासन

कृषी विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन | कृषी विभाग
Agriculture department Government of Maharashtra
#कृषि #महाराष्ट्र_शासन

27/05/2026

🌾 DAP खताला पर्याय: संतुलित वापर, भरघोस उत्पन्न! 🌾
नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतात पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळी बाजारपेठेत खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामात सुमारे ४२ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर केला जातो.

पण यंदा DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे केवळ DAP वरच अवलंबून न राहता, कृषी विभागाने सुचवलेल्या पर्यायी खतांचा वापर करून आपण आपले उत्पन्न उत्तम घेऊ शकता! 👍

🧪 DAP ला उपलब्ध असणारे उत्तम पर्याय:
DAP मध्ये १८% नत्र आणि ४६% स्फुरद असते. याला पर्याय म्हणून तुम्ही खालील खते वापरू शकता:

पर्याय १: SSP (सिंगल सुपर फॉस्फेट) चा वापर
👉 १ गोणी DAP = अर्धी गोणी युरिया + ३ गोण्या SSP
(विशेषतः सोयाबीन आणि तेलबिया पिकांसाठी SSP अत्यंत फायदेशीर आहे, कारण यात १६% स्फुरद सोबतच गंधक (सल्फर) आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.)

पर्याय २: संयुक्त खते (NPK)
👉 तुम्ही बाजारात उपलब्ध असणारी 10:26:26, 12:32:16, 15:15:15 किंवा 20:20:0:13 ही संयुक्त खते वापरू शकता. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही तिन्ही मुख्य अन्नद्रव्ये पिकाला मिळतात आणि पिकाचे संपूर्ण पोषण होते.

पर्याय ३: TSP (ट्रिपल सुपर फॉस्फेट)
👉 १ गोणी DAP = अर्धी गोणी युरिया + १ गोणी TSP
(TSP मध्ये ४६% स्फुरद असते, ज्यामुळे हा DAP ला एक उत्तम पर्याय ठरतो.)

⚠️ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आवाहने:
१) मृद आरोग्य पत्रिकेनुसारच (Soil Health Card) खतांचा संतुलित वापर करा. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढेल आणि खर्चातही बचत होईल.📑
२) खते नेहमी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा आणि पक्के बिल आवर्जून घ्या.🧾
३) बाजारात कोणतीही भेसळयुक्त किंवा अप्रमाणित खते आढळून आल्यास, आपल्या जवळच्या कृषी विभागाशी त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवा.🚨
४) निविष्ठासंबंधी तक्रार तक्रार नोंदविण्याचे पर्याय: व्हॉट्सअॅप क्रमांक : ९८२२४४६६५५, टोल फ्री क्रमांक : १८००२३३४०००, ई-मेल: [email protected]

"शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी" 🚜🌱

#शेती #खरीपहंगाम #खतव्यवस्थापन

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! कीड-रोग नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाचा 'क्रॉपसॅप २.०' चा नवा डिजिटल पुढाकार!...
21/05/2026

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! कीड-रोग नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाचा 'क्रॉपसॅप २.०' चा नवा डिजिटल पुढाकार! 🌾📱🤖

शेतकरी बंधूंनो,
तंत्रज्ञानाची साथ आता थेट आपल्या शेतापर्यंत!
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत
*'क्रॉपसॅप २.०' (CROPSAP 2.0)*
हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्या स्वरूपात सज्ज झाला आहे.
अत्याधुनिक *AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)* तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता पिकांवरील कीड आणि रोगांचे अचूक निदान आणि वेळेत व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे होणार आहे.

*'क्रॉपसॅप २.०' ची प्रमुख वैशिष्ट्ये:*
✅ *AI फोटो आयडेंटिफिकेशन:* 'महाविस्तार' ॲपद्वारे पिकाच्या रोगाचा फोटो काढून अचूक ओळख पटवता येणार.
✅ *तात्काळ ॲडव्हायझरी:* कीड-रोगांचे वेळेत निदान करून ॲपमध्येच थेट तज्ज्ञांचा सल्ला मिळणार.
✅ *पिकांचे आर्थिक नुकसान टाळणार:* सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, ज्वारी, ऊस आणि हरभरा अशा ८ प्रमुख पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन.
✅ *खर्चात बचत:* वेळेवर अचूक माहिती मिळाल्यामुळे कीटकनाशकांचा अनावश्यक खर्च टळणार आणि उत्पादन वाढणार.

हा वैयक्तिक लाभाचा प्रकल्प नसून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सुरक्षित शेतीकडे आणि समृद्धीकडे नेणारा एक सामूहिक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

चला, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया... कीड-रोगांच्या हल्ल्याला परतवून लावूया!

*अचूक निदान, अचूक सल्ला - चला परतवू कीड-रोगांचा हल्ला!*

*स्मार्ट शेती • सुरक्षित पीक • समृद्ध शेतकरी*

#कृषीविभाग #स्मार्टशेती #शेतकरी

पिकावरील कीड -रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गतपेरणीपूर्व तूर पिकातील कीड रोग व्यवस्थापन         #तुरपिक    #किडरोग ...
21/05/2026

पिकावरील कीड -रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत

पेरणीपूर्व तूर पिकातील कीड रोग व्यवस्थापन

#तुरपिक #किडरोग #पिकसंरक्षण

१ लाख शेतकऱ्यांनी दाखविला ‘जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ शिकण्यासाठी भन्नाट उत्साह! 🌱हवामान बदलाच्या काळात पिके आणि...
11/05/2026

१ लाख शेतकऱ्यांनी दाखविला ‘जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ शिकण्यासाठी भन्नाट उत्साह! 🌱

हवामान बदलाच्या काळात पिके आणि जमिनीचे संरक्षण करण्यासाठी ‘जैविक व नैसर्गिक निविष्ठा’ हा प्रभावी मार्ग ठरत आहे. शेतकऱ्यांनासाठी खरीप हंगामापूर्वीच हा विषय सोपा करावा म्हणून पानी फाउंडेशन, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि ना.दे.कृ.सं.प्र. यांनी एकत्र येत काल एक दमदार डिजिटल शेतीशाळा आयोजित केली. कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

Zoom आणि YouTube Live वरून तब्बल १ लाख+ शेतकरी या सत्रात सहभागी झाले. कुणी मोबाईलवर, कुणी टीव्हीवर — तर कुठे गावच्या चौकात स्क्रीन लावून! शेतीशाळा “गावागावांत” पोहोचली होती.

अडीच तासांच्या या सत्रात एकच लक्ष होते— पीक वाचवायचं कसं आणि खर्च कमी करायचा कसा? कीड-रोग व्यवस्थापनापासून ते सूक्ष्मजीवांच्या भूमिकेपर्यंत सगळं अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं.

निमार्क, दशपर्णी, जीवामृत यांसारखे जैविक उपाय — ते घरीच कसे तयार करायचे, काय लागतं, कसं वापरायचं — हे सगळं फिल्म्स, PPT आणि शेतकऱ्यांच्या अनुभवांमधून जिवंत करून दाखवलं. यात शेतकऱ्यांनी थेट प्रश्न, शंका विचारल्या… आणि तज्ञांनी तिथेच उत्तरं दिली!

या सत्रात सचिव, कृषी विभाग, श्री. परिमल सिंह (IAS), ना.दे.कृ.सं.प्र. चे कृषीविद्या व मृदा विज्ञान विशेषज्ञ, श्री. विजय कोळेकर, विभागीय कृषी सहसंचालक (अमरावती), श्री. गणेश घोरपडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. नंदकुमार भुते, परभणी कृषी विद्यापीठाच्या डॉ. मिनाक्षी पाटील, KVK सगरोळीचे डॉ. व्यंकट शिंदे, आणि कृषी अधिकारी श्री. डी. एल. मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

सोबतच प्रगतशील शेतकरी विश्वनाथ होलगे, रविंद्र देवरवडे, आणि ‘फार्मर कप’मधील बीड जिल्ह्यातील आडस गावच्या हिरकणी महिला शेतकरी गटने आपले अतिशय प्रभावी अनुभवही यात मांडले.

ही फक्त शेतीशाळा नव्हती… ही होते आत्मविश्वासाकडे झालेले परिवर्तन!

एक ऐतिहासिक पार्टनरशिप! १२०० महाराष्ट्र शासन अधिकारी आता पानी फाउंडेशनच्या ‘संपूर्ण महाराष्ट्र फार्मर कप २०२६’ टीममध्ये ...
11/05/2026

एक ऐतिहासिक पार्टनरशिप! १२०० महाराष्ट्र शासन अधिकारी आता पानी फाउंडेशनच्या ‘संपूर्ण महाराष्ट्र फार्मर कप २०२६’ टीममध्ये सामील!

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व उमेद अभियान यांच्या भक्कम पाठबळाने, गटशेती व शास्त्रशुद्ध शेतीची ‘फार्मर कप’ चळवळ २०२६ पासून राज्याच्या कानाकोपऱ्यात — गावागावांत, खेड्या-पाड्यांत — पोहोचत आहे.

आता मा. मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचा अध्यक्षतेखाली एक अभूतपूर्व निर्णय घोषित झाला आहे — १२०० शासन अधिकारी पुढील ४ महिने पूर्णवेळ या स्पर्धेसाठी ‘मेंटर्स’ (मार्गदर्शक) म्हणून शेतकरी गटांच्या बांधणीवर काम करतील!

या भव्य महाअभियानाची सुरुवात, आज शिर्डीतील २ दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या रूपात झाली—जिथे पानी टीमने कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या ऑफिसर्सचे प्रशिक्षण घेतले.

या अधिकाऱ्यांना नवी उर्जा देण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 🙏

तसेच जे अधिकारी त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे या खास चळवळीचा भाग बनलेत, त्यांच्यासोबत पानी फाउंडेशनचे सहसंस्थापक श्री. आमिर खान व किरण राव यांनी थेट चर्चा केली. वित्त विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव व ‘फार्मर कप २०२६’ च्या उच्चस्तरीय कमिटीचे अध्यक्ष श्री. विकासचंद्र रस्तोगी (IAS) जींनी यांना परिवर्तनीय अशी दिशा दिली. कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह (IAS) यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांचा उत्साह अधिक वाढवला.

तसेच मा. CEO, उमेद अभियान, श्री. निलेश सागर (IAS), मा. राज्य कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे जी (IAS), ना.दे.कृ.सं.प्र. चे मा. कृषीविद्या व मृदा विज्ञान विशेषज्ञ, श्री. विजय कोळेकर, ATE चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक, श्री. अमित चंद्रा, सह्याद्री फार्म्सचे श्री विलास शिंदे, अवर सचिव, उमेद अभियान, श्री. धनवंत माळी, संचालक कृषी, श्री. रफिक नाईकवाडी, CEO, पानी फाउंडेशन, सत्यजित भटकळ, पानी फाउंडेशन, प्रमुख मार्गदर्शक, डॉ. अविनाश पोळ, आदींसह शासन स्तरावरील अनेक मान्यवर मंडळीनीही या अधिकाऱ्यांनी प्रेरणा दिली.

‘फार्मर कप’ला दिलेल्या इतक्या ताकदीच्या पाठबळासाठी महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार!
आता आपण मिळून ‘समृद्ध महाराष्ट्रा’चे स्वप्न सिध्द करूया!

Devendra Fadnavis CMOMaharashtra कृषी विभाग महाराष्ट्र शासन उमेद अभियान - Maharashtra State Rural Livelihoods Mission नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ATE Chandra Foundation

11/05/2026

“शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी योग्य दिशा, सक्षम कार्यक्रम आणि समाज–सरकार–समाजधुरिण यांची एकजूट — ‘ फार्मर कप २०२६’ने हा साधला आहे.” — श्री. सुरज मांढरे (IAS), आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि MSRLM-उमेद अभियान यांच्या भक्कम पाठबळाने, गटशेती आणि शास्त्रशुद्ध शेतीवर आधारित पानी फाउंडेशनची ‘फार्मर कप’ चळवळ राज्यभर वेग घेत आहे. 🌱

पानी फाउंडेशनकडून उमेद व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे उत्साही आणि सखोल प्रशिक्षणही पार पडले आहे — आणि या अधिकाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे (IAS) जीं नी दिलेल्या या मन:पूर्वक शुभेच्छा, नक्की पाहा! शेअर करा! 🙏

27/04/2026

नमस्कार शेतकरी मित्रांनो...

जास्त खत म्हणजे खरंच जास्त उत्पन्न का?

या व्हिडिओ मध्ये काय पहाल?

* खतांचा संतुलित वापर.
* खताच्या अतिवापराचे दुष्परिणाम?
* शाश्वत शेतीचे सूत्र.
* माती परीक्षण + संतुलित खते + सेंद्रिय पर्याय = जास्त उत्पादन आणि जिवंत
माती.

#कृषीविभाग #पिकसंरक्षण #कृषी #शेतकरी #महाराष्ट्रशासन #शाश्वतशेती #संतुलितखते

27/04/2026

नमस्कार शेतकरी मित्रांनो...

पेरणी पूर्वीचे एक छोटे पाऊल ..कापणीसाठी एक मोठी झेप ठरू शकते का?

या व्हिडिओ मध्ये काय पहाल?

* पिकाचे संरक्षण कसे करावे?
* बीज प्रक्रिया कशी करावी?
* बीजामृत कसे बनवायचे?

#कृषीविभाग #पिकसंरक्षण #कृषी #शेतकरी #महाराष्ट्र शासन # बीजप्रक्रिया #बीजामृत

17/04/2026

एक ऐतिहासिक पार्टनरशिप… आणि एका परिवर्तनवादी प्रवासाची दमदार सुरुवात! 🚜🌾
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या निर्णयाखाली आता पानी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप २०२६’ साठी शासनाचे १२०० अधिकारी पुढील ४ महिने पूर्णवेळ समर्पितपणे काम करणार आहेत!💪🌱

पानी फाउंडेशनने या अधिकाऱ्यांसाठी २ दिवसीय खास प्रशिक्षण शिर्डी येथे घेतले. आता ते ‘फार्मर कप’ शेतकरी गटांना ‘मेंटर्स’ म्हणून मार्गदर्शन द्यायला सज्ज आहेत!

पानी फाउंडेशनचे संस्थापक श्री. आमिर खान व किरण राव, तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व मेंटर्ससोबत थेट प्रेरणादायी संवाद साधला!

कृषी विभाग व उमेद अभियानाच्या संपूर्ण टीमच्या पाठबळामुळे या चळवळीला ही खरी नवी ताकद मिळत आहे. 🙏

🎥 तर मग या ऐतिहासिक क्षणाची खास झलक नक्की पाहा!

16/04/2026

नमस्कार शेतकरी मित्रांनो...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
(महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प)

या व्हिडिओ मध्ये काय पहाल?

*बी बी एफ यंत्राच्या सहायाने सरी वरंबा लागवड पद्धत.*


#कृषीविभाग #आंतरपीकपद्धत #कृषी #शेतकरी #महाराष्ट्र शासन # पिकलागवड

Address

Commissionerate Of Agriculture, 2nd Floor, Central Building
Pune
411001

Opening Hours

Monday 10am - 6:15pm
Tuesday 10am - 6:15pm
Wednesday 10am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when कृषी विभाग महाराष्ट्र शासन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कृषी विभाग महाराष्ट्र शासन:

Share