Parag Tanaji Dhene

Parag Tanaji Dhene लोकसेवा हा ध्यास..!

प्रेम ❤️.. धन्यवाद..!
28/08/2026

प्रेम ❤️.. धन्यवाद..!

रक्षाबंधन उत्सव २०२६..वर्ष ६ वे २८ आणि २९ ऑगस्ट २०२६ सकाळी ११ ते सायं  ४.
28/08/2026

रक्षाबंधन उत्सव २०२६..वर्ष ६ वे

२८ आणि २९ ऑगस्ट २०२६ सकाळी ११ ते सायं ४.

सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!आपलेअर्चना पराग ढेणे (BE ELEX)पराग तानाजी ढेणे (BE IT)वारजे हेच कुटुंब..!ल...
28/08/2026

सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

आपले
अर्चना पराग ढेणे (BE ELEX)
पराग तानाजी ढेणे (BE IT)
वारजे हेच कुटुंब..!
लोकसेवा हाच ध्यास..!

सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
15/08/2026

सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
01/08/2026

लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

वारजे स्मशानभूमीमधे अखेर पूर्ण वेळ विजेची सोय उपलब्ध..काही दिवसांपूर्वी अंत्यविधी वेळी विजेची सोय नसणे आणि त्यामुळे नागर...
26/06/2026

वारजे स्मशानभूमीमधे अखेर पूर्ण वेळ विजेची सोय उपलब्ध..

काही दिवसांपूर्वी अंत्यविधी वेळी विजेची सोय नसणे आणि त्यामुळे नागरिकांचे खड्ड्यात पडणे या मनस्ताप देणाऱ्या घटनेनंतर विजेची २४ तास मागणी आणि त्याचा पाठपुरावा संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता.

खरंतर या गोष्टी कुणाच्याही मागणी आणि पाठपुराव्या शिवाय होणे अपेक्षित आहे परंतु त्या कराव्या लागतात हे दुर्दैव आहे. मागणी नंतर लगेचच या ठिकाणी विजेची सोय करण्याऱ्यात आली आहे.

तात्काळ काम केल्या बद्दल विद्युत विभाग आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार..!

आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
लोकसेवा हाच ध्यास..!
वारजे हेच कुटुंब..!

माळवाडी बस स्टॉप ला आलेले कचरापेटीचे स्वरूप सुधारण्याचा प्रयत्न..आपल्या प्रभागात अनेक ठिकाणी आजही कचऱ्याचे ढीग रोज दिसता...
14/06/2026

माळवाडी बस स्टॉप ला आलेले कचरापेटीचे स्वरूप सुधारण्याचा प्रयत्न..

आपल्या प्रभागात अनेक ठिकाणी आजही कचऱ्याचे ढीग रोज दिसतात. अनेक नागरिक जाता येता अनेक रस्त्यांच्या कॉर्नर ला कचरा टाकून साचणे खरं तर आपल्यासाठी नवीन नाही. पण प्रमुख बस स्टॉप ला कचरापेटी होणे हे चिंताजनक आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून युनियन बँक येथील माळवाडीच्या प्रमुख बस स्टॉप ला कचरा साचून त्याला कचरापेटीचे स्वरूप आले होते. या संदर्भात नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच संबंधित आरोग्य निरीक्षकांशी संपर्क साधून सदर कचरा उचलण्यात आला.

नागरिकांना विनंती आहे की किमान नागरिकांची रोजची गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी तरी आपण कचरा मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करू.

आपल्या भागात देखील अशी काही तक्रार असल्यास अवश्य संपर्क करा.
9823513131

आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
लोकसेवा हाच ध्यास..!
वारजे हेच कुटुंब..!

आपल्या प्रभागात पुन्हा कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी महावितरण कडे दुरुस्तीच्या मागण्या..गेल्या वर्षी साधारण याच वेळी...
12/06/2026

आपल्या प्रभागात पुन्हा कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी महावितरण कडे दुरुस्तीच्या मागण्या..

गेल्या वर्षी साधारण याच वेळी पहिल्या पावसाच्या दिवशी आपल्या प्रभागातील रामनगर भागात एका लहान मुलाला विजेचा धक्का लागून आपले प्राण गमवावे लागले.

अशी कुठल्याही प्रकारची दुर्घटना इथून पुढे आपल्याला आपल्या प्रभागात होऊ द्यायची नाही यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची आज भेट घेतली आणि प्रभागातील सर्व दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली.

आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
लोकसेवा हाच ध्यास..!
वारजे हेच कुटुंब..!

नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या स्मशानभूमीच्या विविध समस्यांच्या दुरुस्तीबाबत निवेदन..आपल्या वारजे भागात आपण दररोज अनेक स...
11/06/2026

नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या स्मशानभूमीच्या विविध समस्यांच्या दुरुस्तीबाबत निवेदन..

आपल्या वारजे भागात आपण दररोज अनेक समस्यांना तोंड देतो. जिवंतपणे मिळणाऱ्या या असुविधा कमी पडल्या की काय म्हणून मरणोत्तर विधींसाठी स्मशानभूमीत नागरिकांना होणारा त्रास वारजे भागात प्रकर्षाने जाणवत आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर स्मशानभूमीतील वीजपुरवठा समस्या, चौथरा तोडल्याची समस्या, आणि अंधारामुळे नागरिक पडल्याची समस्या या त्वरित सोडवून मिळाव्यात यासाठी आज वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली आणि या समस्यांचे त्वरित निवारण करावे यासाठी मागणी करण्यात आली.

आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
लोकसेवा हाच ध्यास..!
वारजे हेच कुटुंब..!

५ मे वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्चना पराग ढेणेशिक्षित, संयमी, कार्यक्षम, नम्र, कधीहि न हारणाऱ्या आणि आमच्यासाठी नगरसेविकाच ...
04/05/2026

५ मे

वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्चना पराग ढेणे

शिक्षित, संयमी, कार्यक्षम, नम्र, कधीहि न हारणाऱ्या आणि आमच्यासाठी नगरसेविकाच असणाऱ्या आपल्या उमेदवार आणि नेतृत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

Address

गणेशपुरी, वारजे, पुणे
Pune
411058

Telephone

+919823513131

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parag Tanaji Dhene posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category