Dr. Somnath Gite

Dr. Somnath Gite व्यसनमुक्ती अभ्यासक, डॉक्टरेट, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, अनेक व्यसनमुक्ती पुरस्कार

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. ही कीड समाजाला हळूहळू पोखरत आहे. गुटखा- तंबाखू, विडी- सिगारेट, दारू, गांजा,-अफिम, हेरॉईन, गर्द अशा एक ना अनेक व्यसनांनी समाजाला विळखा घातला आहे आणि दुःखाची बाब अशी की आजची तरुणाई याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. केवळ प्रतिष्ठा म्हणूनही अनेक तरुण- तरुणी या व्यसनांकडे आकृष्ट होताना दिसत आहेत, ही समाजासाठी आणि तरुणाईच्या भविष्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. अनेकांचे आयुष्य या व्यसनांपायी उद्ध्वस्त झाले आहे, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांचीही वाताहात झाली आहे.

आजूबाजूच्या कितीतरी व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाताना पाहिल्या. त्यांचे सोन्यासारखे आयुष्य मातीमोल होताना पाहिले. अनेकांच्या घरांमधील दुःखांचे कारण फक्त आणि फक्त व्यसन हेच आहे, हे लक्षात आल्यानंतर सुरुवातीला वाईट वाटायचे. नंतर विचार केला, या व्यसनमुक्तीच्या चळवळीत आपणही खारीचा वाटा का उचलू नये? मग सविस्तर अभ्यास करून काम करायचे ठरवले. व्यसनी व्यक्तींशी बोलून त्यांना समुपदेशन केले. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यत एकाचवेळी पोहोचण्याच्या माध्यमाचा विचार केला आणि लिखाण करावे असा विचार केला. व्यसनाबाबत लेख लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आपल्या लिखाणामुळे एखाद्या व्यक्तीचे मतपरिवर्तन होऊन त्याचे जीवन सुरळीत झाले तरी पुरेसे आहे, या विचारातून लिहायला सुरुवात केली. लिहायला सुरुवात केली, तसतशी या व्यसनांची भीषणता अधिकाधिक कळत गेली आणि लिखाणाची व्याप्तीदेखील वाढली. गेल्या १०-१२ वर्षांपासून समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया इत्यादी विविध माध्यमांतून जनजागृती करून समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करत आहे.

वेळोवेळी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन विविध व्यसनांची माहिती घेतली. त्यांचे दुष्परिणाम, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याचबरोबर त्यावरील उपचार पद्धती यांचाही अभ्यास केला. यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिहिले. त्याचा समाजाला, विशेषतः देशाचे उद्याचे नागरिक असलेल्या भावी पिढीला नक्कीच फायदा होईल, अशी आशा आहे. तसेच व्यसनी व्यक्तींना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करतो, त्यांना व्यसनमुक्ती केंद्राची माहिती, त्यांची कार्यपद्धती समजावून सांगतो. त्यांना व्यसनमुक्त होण्यास मदत करतो. वेगवेगळ्या शालेय संस्थांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करतो. डॉ. देविदास भिडे यांच्याबरोबर व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी ‘प्रतिष्ठा’ या व्यसनमुक्तीवर आधारित लघुचित्रपटाच्या माध्यमातून जनजागृती करतो. तसेच सध्या महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती समनव्ययक मंडळामध्ये प्रचार व प्रसाराचे कार्य करतो आहे.

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि याक्षेत्रात केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 'व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२', राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादूत पुरस्कार २०२२ तसेच व्यसनमुक्ती परिषदेचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२' मिळाला आहे.

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर (मुक्तांगण पुनर्वसन केंद्र), माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, स्व. मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास (सरचिटणीस, नशाबंदी मंडळ) यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Address

1216, Pari Towers, Pari Chowk, Opposite MNGL CNG Station, Narhe
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Somnath Gite posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category