सौ.वंदना हिरामण आल्हाट

  • Home
  • India
  • Pune
  • सौ.वंदना हिरामण आल्हाट

सौ.वंदना हिरामण आल्हाट I am Vandana Hiraman Alhat known as Vandana Tai lives in Moshi Pimpri Chinchwad.

सामान्य कुटुंबातून उभे राहूनसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारेदूरदृष्टी असलेले, आधुनिक विचारांची सशक्त नेतृत्वशैली ✨🔶...
18/12/2025

सामान्य कुटुंबातून उभे राहून
सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारे
दूरदृष्टी असलेले, आधुनिक विचारांची सशक्त नेतृत्वशैली ✨

🔶 न्याय्य विरोधाला निर्भीड उत्तर
🔶 कामात प्रामाणिकपणा, विचारात स्पष्टता
🔶 जनतेच्या कामाचे स्पष्ट ध्येय

पिंपरी-चिंचवडच्या उज्ज्वल भविष्यासाठी
प्रभाग क्र. ३ मधून

#प्रभाग३ #महानगरपालिका_निवडणूक #जनतेचा_आवाज #प्रामाणिक_नेतृत्व #विकासासाठी_मत #पिंपरीचिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५-२६ साठी लोकशाही व्यवस्थेतील जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीक...
17/12/2025

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५-२६ साठी लोकशाही व्यवस्थेतील जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीकडून घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज पार्टीच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात पार पडल्या. यावेळी प्रभाग क्रमांक ३ मोशी मधून महिला गट माझी मुलाखत घेण्यात आली.
या निवडणुकीत "अबकी बार १०० पार.." चा नारा आम्ही दिला आहे. यावेळी दमदार आमदार महेशदादा लांडगे, शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्नबापू काटे, निवडणूक प्रमुख आमदार श्री. शंकरभाऊ जगताप, विधान परिषदेचे आमदार श्री. अमितभाऊ गोरखे, आमदार उपस्थित होते
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली "विकासाभिमुख हिंदुत्व" च्या मुद्यावर आम्ही निश्चितपणे यशस्वी होवू, असा विश्वास आहे.
तुमची आमची... भाजपा सर्वांची.. !

Narendra Modi J.P.Nadda Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan CMOMaharashtra Shatrughna Kate Bharatiya Janata Party (BJP) BJP Pimpri-Chinchwad

भगवान श्रीविष्णूंच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होऊनसर्व कार्ये सफल करणारी सफला एकादशीआपणास व आपल्या परिवारास मंगलमय, सु...
15/12/2025

भगवान श्रीविष्णूंच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होऊन
सर्व कार्ये सफल करणारी सफला एकादशी
आपणास व आपल्या परिवारास मंगलमय, सुख-समृद्धी व समाधान घेऊन येवो, हीच प्रार्थना.

#सफला_एकादशी

भारताच्या एकतेचे शिल्पकार, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि कठोर निर्णयक्षमतेचे प्रतीकलोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेलयांच्...
15/12/2025

भारताच्या एकतेचे शिल्पकार, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि कठोर निर्णयक्षमतेचे प्रतीक
लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून देशाच्या एकीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा राष्ट्रभक्तीचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

#लोहपुरुष

 #महाराष्ट्रासाठी_गौरवास्पद!सन्मान कर्तृत्वाचा..अभिमान महाराष्ट्राचा..महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना.श्री.देवे...
13/12/2025

#महाराष्ट्रासाठी_गौरवास्पद!
सन्मान कर्तृत्वाचा..
अभिमान महाराष्ट्राचा..
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे देण्यात येणारा डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५ घोषित झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.!
राज्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील देवेंद्रजींचे योगदान पाहता या पुरस्कारासाठी झालेली त्यांची निवड आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.!
Devendra Fadnavis BJP Maharashtra

#हार्दिकअभिनंदन #देवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्रीमहाराष्ट्र #महाराष्ट्राचाअभिमान #कर्तृत्वाचासन्मान #डॉपनावरदेशमुखस्मृतीपुरस्कार2025 #शिवाजीशिक्षणसंस्था #प्रेरणादायीनेतृत्व #भाजपमहाराष्ट्र #हार्दिक_अभिनंदन

लोकनेते, जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पक...
13/12/2025

लोकनेते, जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास, सामाजिक न्यायासाठीची त्यांची तळमळ आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या विचारांना आणि कार्याला पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

🙏💐
स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन..!

डुडुळगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर वादळामुळे वाकलेल्या व धोकादायक पद्धतीने फांद्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करत होत्या...
12/12/2025

डुडुळगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर वादळामुळे वाकलेल्या व धोकादायक पद्धतीने फांद्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करत होत्या.
स्थानिकांकडून माहिती मिळताच तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित फांद्या हटविण्याचे काम तातडीने पूर्ण केले.
नागरीकांच्या सुरक्षेसाठी हा अडथळा दूर करून मार्ग मोकळा करण्यात आला.
स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर प्रभागासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.”

— सौ. वंदना हिरामण आल्हाट


“भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक विनम्र अभिवादन…!त्यां...
12/12/2025

“भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक विनम्र अभिवादन…!
त्यांच्या संघर्षमय वाटचालीतून शिकलेले कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचे मूल्य आजही आपणा सर्वांना प्रेरणा देत राहतील.
त्यांची लोकाभिमुख कार्यशैली आणि सर्वसमावेशक विचार हीच आमच्यासाठी मार्गदर्शक शक्ती…!”

Address

Moshi Alandi Road
Pune
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सौ.वंदना हिरामण आल्हाट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category