12/07/2026
महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय!
स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने गरजू आणि होतकरू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे.
शिलाई मशीन प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी महिलांनी व्यक्त केलेल्या भावना आणि बोलक्या प्रतिक्रिया हेच या उपक्रमाचे खरे यश आहे.
"मदतीपेक्षा संधी मोठी असते..."
आणि हीच संधी महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे कार्य स्वयंभू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुजाता सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.
महिलांच्या हातांना रोजगार...
आणि आयुष्याला नवी दिशा...
स्वयंभू फाउंडेशनचा हा सेवाभावी उपक्रम समाजपरिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.