Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. जय जिजाऊ जय शिवराय

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडकडून अभिवादनपुणे, दि. ३१ मे २०२६ : लोककल्याणकारी र...
31/05/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडकडून अभिवादन

पुणे, दि. ३१ मे २०२६ : लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मनिरपेक्षता आणि समाजहितासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आज सारसबाग समोरील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक आदर्श, न्यायप्रिय आणि दूरदर्शी शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राज्यकारभारात सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रे, मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि पाणपोया उभारून त्यांनी लोककल्याणाचे कार्य केले. काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसह अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या राज्यात प्रजेला न्याय, सुरक्षा आणि विकासाची हमी मिळाली होती.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पुणे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले की, “राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एका संस्थानच्या शासक नव्हत्या, तर त्या लोकहितवादी, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राज्यकर्त्या होत्या. त्यांनी स्त्री नेतृत्वाचा एक आदर्श नमुना संपूर्ण देशासमोर उभा केला. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार, कार्यपद्धती आणि लोकाभिमुख प्रशासन आजच्या काळातही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

या अभिवादन कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते. जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, प्रवक्ते संतोष शिंदे, प्रीतम कोंढाळकर, गौरी कांबळे, राजेश अडसूळ, रामा कसबे, महादेव मातेरे, गणेश बिरवाडकर, तसेच संभाजी ब्रिगेडचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन..💐💐शिवश्री.अविनाश मोहिते.महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे.लोककल्याणकारी,...
31/05/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन..💐💐
शिवश्री.अविनाश मोहिते.
महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे.

लोककल्याणकारी, न्यायप्रिय, प्रजावत्सल आणि आदर्श राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी, पाणपोया उभारून जनकल्याणाचे कार्य करणाऱ्या, सर्व धर्म-जातींना समान न्याय देणाऱ्या आणि स्त्री नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या महान राज्यकर्तीचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.

आज संभाजी ब्रिगेड पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने अहिल्यादेवी होळकर स्मारक, सारसबाग समोर येथे अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

"लोककल्याण हाच धर्म आणि न्याय हीच खरी राज्यकर्त्याची ओळख" हे अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.

शिवश्री.अविनाश मोहिते पाटील
महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड पुणे

#अहिल्याबाईहोळकर #राजमाताअहिल्यादेवी #संभाजीब्रिगेड #अविनाशमोहिते
Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. Avinash Mohite Avinash Mohite

30/05/2026

"पुण्यात विषारी दारूने घेतले १८ बळी! दोषी कोण? दारू माफिया, भ्रष्ट पोलीस प्रशासन की सरकार?"
By Avinash mohite official
Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

18/05/2026

सर्वांना सप्रेम जय जिजाऊ
"देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड"
डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या बुद्धभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत अभिवादन केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते पाटील म्हणाले की, गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून संभाजी ब्रिगेडने या स्मारकासाठी सातत्याने लढा उभारला होता. विविध आंदोलने, निवेदने, महापालिकेला पाठपुरावा आणि जनजागृतीच्या माध्यमातून हे स्मारक उभारण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी संघर्ष केला. आज त्या संघर्षाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले असून हा क्षण सर्व शिवप्रेमींसाठी अभिमानाचा आहे.

दिनांक 17 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री व अन्य मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी, विद्वान आणि बुद्धभूषण ग्रंथाचे रचनाकार होते. त्यांच्या कार्याचा गौरव करणारे हे स्मारक इतिहासप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही अविनाश मोहिते पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रशांत धुमाळ (मराठा सेवा संघ पुणे शहराध्यक्ष), संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते (पुणे शहराध्यक्ष), चंद्रशेखर घाडगे (पुणे जिल्हाध्यक्ष), सिद्धार्थ कोंढाळकर (पुणे जिल्हाध्यक्ष), संतोष कराळे, निलेश ढगे, रामा कसबे, मंदार बहिरट, रेखा कामठे, विवेक कावरे, प्रीतम कोंढाळकर, यशवंत मोरे, गणेश भाऊ कोंढाळकर आदी उपस्थित होते.
Avinash Mohite Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. mh12 pune Avinash Mohite

15/05/2026

"तोंड दाबून बुक्क्यांचा मारा"
"मस्तवाल सरकार हदबल जनता"
अजून किती दिवस सहन करणार?
किती दिवस सिस्टीम बरोबर ऍडजेस्ट करणार?
By Avinash mohite official
Avinash Avinash Mohite Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. Avinash Mohite

🚩 स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🚩छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पराक्रम, विद्वत्ता, स...
14/05/2026

🚩 स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🚩
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पराक्रम, विद्वत्ता, स्वाभिमान आणि अटळ धैर्य यांचे ज्वलंत प्रतीक!
अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १२० हून अधिक लढाया लढल्या आणि इतिहास साक्षी आहे एकही लढाई ते हरले नाहीत.
संभाजी महाराजांना संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, पोर्तुगीज, अरबी, कन्नड अशा अनेक भाषा अवगत होत्या. ते केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर उच्च कोटीचे विद्वान आणि साहित्यिकही होते.
त्यांनी ‘बुधभूषण’, ‘नायिकाभेद’, ‘सातशतक’ यांसारखे ग्रंथ लिहून आपल्या विद्वत्तेचा ठसा उमटवला.
स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारा, अन्यायासमोर कधीही न झुकणारा आणि शत्रूला थरकाप उडवणारा असा पराक्रमी योद्धा इतिहासात झाला नाही आणि होणारही नाही.
अशा अद्वितीय, अजिंक्य आणि प्रेरणादायी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
जय जिजाऊ! जय शिवराय!
जय शंभूराजे 🚩

08/05/2026

जीवन खूप सुंदर आहे सुंदर पद्धतीने जगता आलं पाहिजे.
आयुष्य कोणाच्या धाकात नाही. मित्रहो रुबाबात जगायचं असतं..
Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

04/05/2026

नसरापूर लैंगिक अत्याचार करून हत्या | फाशी होणार पण कधी | कायदा फक्त कागदावरच

03/05/2026

“नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत संतापजनक, दुःखद आणि मानवतेला काळिंबा फासणारी आहे.
एका निष्पाप लेकरावर झालेला हा अत्याचार संपूर्ण समाजाला लाजवणारा आहे.
या प्रकरणाची जलदगतीने चौकशी करून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा — मृत्युदंड — तात्काळ सुनावून अंमलबजावणी करावी, ही आमची ठाम मागणी आहे.
न्याय वेळेत झाला पाहिजे… कारण उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो.
शिवश्री.अविनाश मोहिते पाटील
Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

01/05/2026

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
०१ में महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक आशा शुभेच्छा...
शिवश्री.अविनाश भाऊ मोहिते.
महानगराध्यक्ष Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.
Avinash Mohite Avinash Mohite Mohite Sambhaji brigade

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.:

Share