15/08/2026
आमचा वारसा — लोकशाहीरीचे, प्रबोधनाचे विद्यापीठ, ज्यांचे गाणी आजही ट्रेडिंगमध्ये आहेत ते लोकशाहीर साहित्यसम्राट वामनदादा कर्डक!
लोकशाहीर, लोककवी, शाहीर आणि प्रख्यात गीतकार वामनदादा कर्डक (१५ ऑगस्ट १९२२ – १५ मे २००४) हे आंबेडकरी चळवळीचे एक अत्यंत प्रभावी, शक्तिशाली आणि क्रांतिकारी सांस्कृतिक योद्धे होते.
आपल्या ओघवत्या शब्दांतून, जाज्वल्य गीतांतून आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवला.
वामनदादांची शाहिरी केवळ मनोरंजन नव्हती; ती जागृतीची मशाल होती, संघर्षाची हाक होती आणि आंबेडकरी विचारांची लोकभाषेतील विद्यापीठ होती.
आज त्यांच्या जयंतीदिनी या महान लोकशाहीराला विनम्र अभिवादन व आपल्या सर्वांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा 💐💐🙏
वामनदादांची शाहिरी जिवंत राहो!
आंबेडकरी विचारांचा जागर अखंड सुरू राहो!
💙 जय भीम! जय संविधान! 💙
- विकास रोडे