26/03/2026
आता जत्रा यात्रा चा जोर चालू आहे सर्व मित्र बोलावतात आग्रहाने पण आपण ड्यूटी वर असताना जाऊ शकत नाही त्याचं काम आहे बोलावणे अथवा न बोलावणे यांच्यात काय विषय नाही पण जत्रा असो किंवा यात्रा मज्जा लय येते पाळणे झोपाळे तिथ जाऊन बाजूला थांबायच वेट कमी ज्यादा झालं की बसवायची म्हणून तिथ पण तीन चार जन असायची लयनीत. याची वेगळीच क्रेझ असते स्टॉल खेळणी वगैरे खायचे स्टॉल लहानपणी एका मित्राला स्टॉल वाल खवळला ट्रक 5 रु चा हातात घेतला म्हणून ये पोरा ठेव खाली घेऊन पळून जाचील. त्याने ठेवला पण दुसऱ्या दोस्ताने ते डोक्यात ठेवलं आणि रात्री 2 , 3 , वाजता त्याच खेळण्याचं पोत उचलून आणल. त्यात वेगळी वेगळी अनेक खेळणी सर्वांनी एक दोन घेतली आणि घरी नेहल्याव घरची विचारायची कोणी दिलं कुणाच आणलस देजा माघारी परत ती खेळणी येणार लहान मुलांना वाटली. ती लहान लहान मूल खुश झाली. पण त्या वेळेस कळत नव्हतं की त्याचं नुकसान केलंय किंवा झालंय आम्हाला घरात पैसे मिळत नवते. 2, 5, रु लय रडलो तर 10रुपये द्यायचे ते पण जीवाचा आक्रोश करून 😂 पण लहानपणी जी मज्या केली ती आता कितीही प्रयत्न करा होऊ शकत नाही म्हणून एक म्हण आहे. लहान पण देगा देवा 😂🤣