30/05/2026
गेली काही वर्षे पुणे अशांत शहर म्हणून देशभरात ओळखले जाऊ लागले आहे.. शहरात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना सतत घडत आहेत..
हिंदू मुस्लिम द्वेष, लक्ष्य केंद्रित हल्ले, बहिष्कार मोहीम, परधर्मियांना सतत लक्ष्य करणे, द्वेषमूलक गुन्हे इत्यादी कृतीतून पुणे शहर अशांत करण्यात आलेले आहे.
परिणामी पुणे शहराचे सांस्कृतिक ओळख नष्ट होऊन सांप्रदायिक शहर अशी ओळख तयार होऊ लागली आहे.. सरकार समर्थक हिंदुत्ववादी घटक सातत्याने शहराला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत.
शहरात सततचे द्वेषमूलक हल्ले वाढले आहेत..व
धर्माच्या नावाने विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, श्रमिक कामगारांना गुंडाकडून मारहाण होत आहे, कॉलेज कॅम्पस बाहेर जाऊन तथाकथित लव्ह जिहाचे आरोप करून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जात आहे, अपार्टमेंट, कॉलनीमध्ये वस्त्यांमध्ये जाऊन महिला व मुलींना धमक्या दिल्या जात आहेत...
मुस्लिमांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर हल्ले केले जात आहे, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली जात आहे, सार्वजनिक उद्याने मुसलमानांसाठी बंद करण्यात येत आहेत.. आमदार, खासदार थेटपणे मुस्लिम विरोधी भूमिका घेऊन हिंदुत्ववादी गुंडांना संघटित करत आहेत.
अशा प्रत्येक हल्ल्याविषयी पोलीस नरमाईची भूमिका घेतात. तक्रार करूनही एफआयआर दाखल करून घेत नाही.. त्यामुळे अनेकांनी म्हटले आहे की पुणे पोलीस आरएसएसशी शाखा झालेली आहे. पोलीस गुंडांना पाठीशी घालण्याची भूमिका घेतात.. त्यामुळे शहराची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे.
उद्योग नगरी ही ओळख आता भूतकाळ होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.. गेली दोन-तीन वर्ष पुण्यातील अनेक आयटी कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित होत आहेत.
आयटी कंपन्यांना शहरात भरभराटीसाठी पोषक वातावरण मिळत नाही.. द्वेष मूलक गुन्हे करणारे गुंड कंपन्यांना, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धमकावत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांनी धास्ती घेतली आहे..
नाशिकच्या टीसीएस प्रकरणानंतर हिंदुत्ववादी गुंडांनी आयटी कंपनीच्या समोर निदर्शने केली होती. त्यांना धमकावलं होतं.. परिणामी धास्ती घेऊन आयटी कंपन्या पुणे बाहेर प्रस्थान करत आहेत..
ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे.
पुणे व महाराष्ट्राचे वैभव ढगाळण्याचे काम करणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्र गोपट्टा होण्यास वेळ लागणार नाही..
-अज़हर तांबोळी
प्रदेश अध्यक्ष, SDPI Maharashtra