MNS.Kolhapur

MNS.Kolhapur महाराष्ट्र माझा अणि मी महाराष्ट्राचा

05/11/2022

पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस, मेट्रो आणि ठेकेदारांच्या हेव्यादाव्यांमध्ये पुणेकरांची वाहतूक कोंडी

मनसे नेते जयराज लांडगे यांचा आरोप

पुणे : शहरातील वाहतूक कोंडीमुळे पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता अधिकाऱ्यांनी शहरातील कोंडी ही मेट्रो आणि ठेकेदारांमुळे निर्माण झाल्याचा निर्माण झाल्याचे सांगून आपले हात झटकले आहेत. मात्र असे हात झटकून अधिकाऱ्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. पुणेकरांच्या कोंडीला पुणे महानगरपालिकेचा बेजबाबदार कारभार, पुणे पोलिसांची वाहतूक शाखा, मेट्रोचे खोदकाम आणि ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे रस्ते जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे उपशहर अध्यक्ष जयराज लांडगे यांनी केला.

जयराज लांडगे म्हणाले, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रस्त्यावरक खड्डे दुरुस्त करावेत, असे पत्र आयुक्तांना दिल्यानंतर महानगरपालिका आणि पुणे पोलीस आमने सामने आले आहेत. आता महापालिकेचे अधिकारी शहरातील कोंडी मेट्रोच्या कामामुळे खोदकामामुळे आणि ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे निर्माण झाल्याचे सांगत आहेत. मात्र ही टोलवाटोलवी चुकीची आहे, असे करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला पाहिजे, असे मागणी जयराज लांडगे यांनी महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

07/10/2022

पुणे-मुंबई महामार्गावर वाढलेल्या
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला अटकाव करा

मनसे नेते जयराज लांडगे यांची मागणी

पुणे ः पुणे-मुंबई महामार्गावर अंमली पदार्थांचा अवैध विक्री, व्यवसाय आणि वापर वाढला आहे. वाकड, बाणेर, हिंजवडी आदी परिसर या अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणारे राज्यातील आणि राज्यबाहेरील विद्यार्थी या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करावी आणि ही संपूर्ण यंत्रणा उद्धवस्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे नेते जयराज लांडगे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
जयराज लांडगे म्हणाले, वाकड, बाणेर, हिंजवडी परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. विशेषकरून अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, विक्री आणि वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई-पुण्यावरून वाहतुकीला सोयीचे ठिकाण, तत्काळ ये-जा करणे शक्य, महामार्गालगत वाढत्या शैक्षणिक संस्थांमुळे परराज्यातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि परिसरातील गुंठा मंत्री आदींमुळे हा व्यवसाय तेजीत आला आहे. येथील अनेक विद्यार्थांचे आयुष्य वाया गेले आहे. स्थानिक तरुणही व्यसनाच्या आहारी गेले आहेत. परिसरातील सामाजिक स्वास्थ अडचणीत आले आहे. त्यामुळे वाकड, बाणेर, हिंजवडी आदी परिसरात सुरू असलेला अवैध अंमली पदार्थांचा व्यवसाय तत्काळ थांबवावा, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली ...आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांचे आज, बुधवारी ...
21/09/2022

भावपूर्ण श्रद्धांजली ...

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांचे आज, बुधवारी निधन झालं. दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. गेले ४० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. सर्व जगाला हसविणारे आणि स्टॉडिंग कॉमेडीचा ट्रेंड देशात निर्माण करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली...

-जयराज लांडगे
(सरचिटणीस, मनसे जनहित संघटना. संपर्क अध्यक्ष, मनसे कोल्हापूर जिल्हा)

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमि...
23/07/2022

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! लोकमान्य टिळकांनी देशवासियांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली. देशासाठी तुरुंगवास भोगला. त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक वंदन!

गुरु पौर्णिमा गुरु दर्शन गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांची ...
12/07/2022

गुरु पौर्णिमा गुरु दर्शन गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांची आज मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन दर्शन घेतले यावेळी भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा साहेबांना देण्यात आले यावेळी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजानन जाधव इत्यादी उपस्थित होते


#मनसे

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरकराचा पुरोगामी निर्णय दरवर्षी वाढदिवसानिमित्त होणार विधवा म...
16/06/2022

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरकराचा पुरोगामी निर्णय

दरवर्षी वाढदिवसानिमित्त होणार विधवा महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांच्या पुढाकारातून शाहू महाराजांच्या भूमीत पुन्हा समाज सुधारणांचा हुंकार…

कोल्हापूर :
यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि वट पौर्णिमा एकाच दिवशी येण्याचा योग जुळून आला होता. या निमित्त
पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे व त्यांची पत्नी हर्षदा यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना झुगारून देत विधवा महिलांच्या हस्ते वडाची झाडे लावून त्यांची पूजा केली. विधवा महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. हा कार्यक्रम राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प मोरे दाम्पत्याने केला आहे. कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरोगामी उपक्रम राबविण्यात आला.

अनेक वर्षांतून हळदी कुंकवाचा मान मिळाल्यामुळे विधवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा एक अत्यंत भाऊक क्षण होता. शहीद संग्राम पाटील यांच्या पत्नी हेमलता संग्राम पाटील यांचाही हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला. श्री घोरपडे यांचे पती जाऊन 14 वर्षे झाली परंतु त्यांनी मंगळसुत्र काढले नाही, कुंकू पुसले नाही. त्यांनी खंबीर भूमिका घेतल्या बद्दल या वेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला.

विधवा महिलेने हिरवी साडी नेसायची नाही, तिने मंगळसूत्र घालायचं नाही, तीचं कुंकू पुसायचं, बांगड्या फोडायच्या, तिला कोणत्याही शुभ प्रसंगात सहभागी होण्याचा अधिकार नाही, त्यांना धार्मिक, सांस्कृतिक, शुभ कार्यक्रमात सहभागीच करून घेतलं जात नाही, समाजात तिला मानसन्मान दिला जात नाही नाही. अस का तर फक्त तिच्या नवऱ्याचे निधन झाले म्हणून? मग त्यात तिचा काय दोष?
मग विधवा महिलांचे मूलभूत स्वातंत्र व अधिकार हिरावून घेण्याचा कुणी दिला या समाजाला अधिकार? किती दिवस हे चालणार? तिच्या मनाचा कधी विचार होणार आहे का नाही? असे प्रश्न उपस्थित करून हर्षदा मोरे यांनी विधवा महिलांचे प्रबोधन केले. विधवा प्रथा हद्दपार करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अमर बचाटे, कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके महिला तालुका अध्यक्ष शुभांगी पाटील, शिवाजी मोरे, ईतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

04/03/2022

#राज हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे


19/05/2021

जनतेचा उद्धार करण्याची इच्छा बाळगणारा महत्वाकांक्षी लोकनेता! ❤️

24/03/2021
09/03/2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

09/03/2021
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
08/03/2021

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

Address

Poona

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS.Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MNS.Kolhapur:

Share