PCMC Smart Sarathi

PCMC Smart Sarathi Official page of Pimpri Chinchwad Municipal Corporation & Pimpri Chinchwad Smart City.

17/03/2026

साहस आणि जिद्दीने आम्ही करतो प्रत्येक संकटाचा सामना - पिंपरी चिंचवड अग्निशमन विभाग!

CMOMaharashtra MyGovIndia Press Information Bureau - PIB, Government of India

#अग्निसुरक्षा

📢महत्वाची सूचना 📢 मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकीत मालमत्ता करावरील विलंब शुल...
17/03/2026

📢महत्वाची सूचना 📢

मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

थकीत मालमत्ता करावरील विलंब शुल्कात महापालिका ९०% सवलत देत आहे.

आजच थकीत कर भरा आणि सवलतीचा लाभ घ्या.

PCMC Smart Sarathi Income Tax India Press Information Bureau - PIB, Government of India

#जप्तीकारवाई #पिंपरीचिंचवड #मालमत्ताकर

02/03/2026

हिंद-दी-चादर

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी निमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य समागम कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करताना आयुक्त श्री श्रावण हर्डीकर.

📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई
📅 दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी ८.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

#हिंददीचादर

✨पवना थडी जत्रेत सुमधुर सुरांच्या लहरींनी रंगली अविस्मरणीय सांस्कृतिक मैफल; नागरिकांचा मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद.✨ पिंपरी...
02/03/2026

✨पवना थडी जत्रेत सुमधुर सुरांच्या लहरींनी रंगली अविस्मरणीय सांस्कृतिक मैफल; नागरिकांचा मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद.✨

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पवना थडी जत्रा २०२६ नागरिकांच्या उत्साहाने आणि आनंदी सहभागाने अक्षरशः बहरून आली असून जत्रेत संगीत, खाद्यसंस्कृती आणि खरेदीचा रंगतदार संगम अनुभवायला मिळाला. सुरेल गीतांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला आणि जत्रेचे वातावरण संगीतमय उत्सवात रूपांतरित झाले.

१ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या जत्रेत महिला बचत गटांचे तब्बल ८०० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

🛍 महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू
🍲 स्वादिष्ट व्हेज व नॉनव्हेज पदार्थ
🎭 दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

कुटुंबासह अवश्य भेट द्या.

PCMC Smart Sarathi Maharashtra DGIPR

#पवनाथडीजत्रा2026 #महिलाबचतगट

जल तत्व: जल स्रोतांचे करूया संवर्धन! जल तत्व हे निसर्गाचे सर्वात महत्त्वाचे आणि जीवनदायी रूप. नद्या, तलाव, झरे आणि भूजलस...
02/03/2026

जल तत्व: जल स्रोतांचे करूया संवर्धन!

जल तत्व हे निसर्गाचे सर्वात महत्त्वाचे आणि जीवनदायी रूप. नद्या, तलाव, झरे आणि भूजलसाठे हे सर्व आपल्या अस्तित्वाला पोषण देतात. पण वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि पाण्याचा अनियंत्रित वापर यामुळे ह्या स्रोतांवर परिणाम होतो.

दैनंदिन जीवनात थोडी जबाबदारी पाळुया, पाण्याचा अपव्यय टाळूया. गळणारे नळ दुरुस्त करावे, पावसाच्या पाण्याचे संकलन करावे आणि जलाशयांची स्वच्छता राखल्याने निसर्गाशी आपली नाळ अधिक घट्ट होते.

02/03/2026

उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक जल्लोष🎶

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवना थडी जत्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

संगीताची मैफल, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि खरेदीचा आनंद – सगळं एकाच ठिकाणी!

१ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या जत्रेत महिला बचत गटांचे तब्बल ८०० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

🛍 महिलांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तू
🍲 स्वादिष्ट व्हेज व नॉनव्हेज पदार्थ
🎭 दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम

संपूर्ण कुटुंबासह अवश्य भेट द्या.

#पिंपरीचिंचवड #मराठीसंस्कृती #लोककला #सांस्कृतिकउत्सव #पवनाथडीजत्रा2026

पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन. महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित...
02/03/2026

पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन. महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित काव्य संमेलनाला रसिकांची दाद.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन ज्येष्ठ कवी राज आहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह शहरातील रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

#मराठीभाषागौरवदिन2026 #मायमराठी #पिंपरीचिंचवड #मराठीसंस्कृती

02/03/2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, म्हेत्रेवाडी (क्र. 92)
पीएमश्री अंतर्गत हायटेक लॅब, डिजिटल शिक्षण आणि संस्कारांची जोड!

महापालिका शाळेतून घडतंय उज्ज्वल भविष्य.

प्रवेशासाठी आजच जवळच्या महापालिका शाळेत संपर्क करा.

Dadaji Bhuse - दादाजी भुसे Ministry of Education PCMC Smart Sarathi Maharashtra DGIPR

02/03/2026

वस्तूंचा पुनर्वापर करा
गरजूंना आधार द्या...!

आपल्या घरातील वापरता नसलेल्या परंतु, सुस्थितीत असलेल्या वस्तू महापालिकेच्या आर.आर.आर केंद्रात जमा करून, गरजूंना मदत करुन पर्यावरण वाचवूयात आणि सामाजिक उत्तरदायित्व पार पाडूयात.

Swachh Maharashtra Mission - Urban Majhi Vasundhara Ministry of Housing and Urban Affairs

.0

आपला मालमत्ता कर थकीत आहे का? हीच योग्य वेळ आहे थकबाकी निकाली काढण्याची! ‘अभय योजना’ अंतर्गत ' विलंब दंडावर ९०% सवलत काल...
02/03/2026

आपला मालमत्ता कर थकीत आहे का?

हीच योग्य वेळ आहे थकबाकी निकाली काढण्याची!

‘अभय योजना’ अंतर्गत '

विलंब दंडावर ९०% सवलत

कालावधी: १ मार्च ते ३१ मार्च २०२६

आजच संपूर्ण थकबाकी भरून सवलतीचा लाभ घ्या.

PCMC Smart Sarathi Income Tax India Press Information Bureau - PIB, Government of India

#मालमत्ताकर #९०टक्केसवलत #अभययोजना

Address

Pimpri Chinchwad Municipal Corporation Mumbai-Pune Road
Pimpri
411018

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912067264872

Alerts

Be the first to know and let us send you an email when PCMC Smart Sarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to PCMC Smart Sarathi:

Shortcuts

Share