Maitra wildlife protection & conservations multipurpose institutions pauni

  • Home
  • India
  • Pauni
  • Maitra wildlife protection & conservations multipurpose institutions pauni

Maitra wildlife protection & conservations multipurpose institutions pauni save forest and wildlife
save tree
save reptile, amphibians, and birds
save life save wild and wildlife

आज पुन्हा पानदीवळ या सापाची नोट ही आंतरराष्ट्रीय शोध निबंधात प्रकाशित करण्यात आम्हाला यश आलं सर सहकाऱ्याचें मनापासून धन्...
23/01/2026

आज पुन्हा पानदीवळ या सापाची नोट ही आंतरराष्ट्रीय शोध निबंधात प्रकाशित करण्यात आम्हाला यश आलं
सर सहकाऱ्याचें मनापासून धन्यवाद🙏💐
मैत्र वन्यजीव संरक्षन व संवर्धन बहू. संस्था पवनी च्या सर्व पदाधिकारी यांच्या कार्याचे पुन्हा संपादन करण्यात आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐
Atul Jumale Madhao Vaidya Mahadeo Shiwarkar Khemraj Fattuji Pachare Mahesh Mathiya Sangha Dhargave Namdeo Meshram Umesh Y Dalal Chetan Hedau Chandrakant Pralhad Katekhaye

मराठी नाव :- सायाळइंग्रजी नाव:-porcupineशास्तरीय नाव:-Hystrix indicaशास्त्रीय वर्गीकरणवंश:कणाधारीजात:सस्तनवर्ग:कुरतडणारे...
08/08/2023

मराठी नाव :- सायाळ
इंग्रजी नाव:-porcupine
शास्तरीय नाव:-Hystrix indica

शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:कुरतडणारे प्राणी
कुळ:Hystricidae
जातकुळी:Hystrix

वर्णन

सायाळ(स्त्रीलिंगी), साळिंदर, साळू (इंग्रजीत, Porcupine) या नावाने ओळखला जाणारा साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा हा कुरतडणाऱ्या जातीचा प्राणी आहे. सस्तन प्राणी असल्याने सायाळीची मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते. नर पिले मोठी झाल्यावर आपला वेगळा घरोबा करतात तर मादी पिले मोठी झाल्यावरही आपल्या आईच्या सोबतच राहतात.

साधारणपणे मार्च महिन्यात सायाळीला पिले होतात. गर्भावस्था सुमारे दोन महिन्यांची असतो. एकावेळी दोन ते चार पिले जन्मास येतात. नर-मादी दोघेही बिळामध्ये पिलांची काळजी घेतात. पिलांचे डोळे जन्माला येताना उघडे असतात. त्याचवेळी त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात.

शरीर

सायाळीच्या कातडीचा रंग मुख्यत्वे काळा असून, पाठीकडून मागच्या बाजूला असलेले केस विशेष पद्धतीने विकसित झाले आहेत. हे केस कडक असल्याने ते काट्यासारखे टोकदार होतात. हे 'काटे' पांढऱ्या तपकिरी रंगाचे आणि पूर्णपणे पोकळ असतात. पाठीवरील असे केस ३० सें.मी. पर्यंत लांब असतात. सायाळीच्या जिवाला धोका असल्यास ती आक्रमण करणाऱ्याकडे पाठ करून उभी राहते, व अंगावरील काटेदार केस उभे करते. शिकारी जास्तच जवळ येत असल्याचे दिसल्यावर सायाळ त्याच्या अंगावर उलट दिशेने वेगाने धाऊन जाते आणि आपले अतिशय टोकदार काटे त्याच्या अंगात सोडून क्षणात समोरच्या दिशेने धावते. हे इतक्या वेगात घडते की त्यामुळे सायाळ ही बाणासारखे काटे फेकून मारते असा एक गैरसमज पसरला आहे. सायाळीच्या या विशेष हत्याराने वाघ, बिबटेही जखमी होतात.

काट्यासारखे कडक आणि टोकदार झालेले सायाळीचे केस परत परत उगवतात. या विशेष केसांशिवाय सस्तन पशूंना असतात तसे साधे केसही सायाळीला जन्मतःच असतात.

सायाळीचे दात आतल्या बाजूने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दात येतात. विविध प्रकारची कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया हे पशू सहजपणे फोडून खातात. मृत हरणांची शिंगेही हे चघळतात आणि खातात. यामुळे सायाळीच्या काट्यांच्या वाढीला पूरक असा कॅल्शियमयुक्त आहार मिळतो.

आढळ

सायाळ ही मध्यपूर्व ते दक्षिण आशियात सर्वत्र आढळते. उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वनांच्या पोकळ, खडकाळ प्रदेशांत तसेच पानगळीच्या जंगलात, कमी उंचीच्या जंगलात, वगैरे शेतात हा प्राणी जमिनीत बिळे करून राहतो. बिळाच्या गाभ्यात सायाळ कुटुंब एकत्र राहते. साठवून ठेवलेले अन्नही याच गाभ्यात असते. गाभ्याच्या अंतर्भागापासून सर्व दिशांनी दूरपर्यंत बोगदे केलेले असतात. जमिनीवर चरतांना कुठल्याही दिशेने आक्रमण होत असेल तर कुटुंबप्रमुख सायाळ सोडून सर्व लहान पिले अशा बोगद्यातून आपल्या घरात शिरतात.

भक्ष्य/आहार

सायाळ हा शाकाहारी प्राणी आहे. सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे तसेच झाडांची मुळे हे त्यांचे अन्न आहे. यामुळे त्या बागायती पिके व शेतीचे फार नुकसान करतात.

दिनांक 14/6/2023  ला मौजा आसगाव येथील रमेश हुकरे यांनी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहु. संस्थेचे सदस्य नामदेव मेश्रा...
18/06/2023

दिनांक 14/6/2023 ला मौजा आसगाव येथील रमेश हुकरे यांनी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहु. संस्थेचे सदस्य नामदेव मेश्राम यांना फोन द्वारे माहिती दिली की, त्यांचा शेतातील विहिरीमध्ये उदमांजर पडलेली आहे. ही माहिती कडताच ही माहिती संबंधित वन अधिकाऱ्यांना फोन द्वारे कडविण्यात आली तसेच नामदेव मेश्राम व मैत्र संस्थेचे बचाव दल घटना स्थळी पोहचले तसेच अड्याळ वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ठोंबरे साहेब, क्षेत्र सहाय्यक अड्याळ पंचभाई साहेब आणि केसलवाडा नियत क्षेत्राचे बिट रक्षक भुसारी साहेब घटनास्थळी पोहचले, संस्थेचे बचाव दल तसेच वन विभागाच्या अधीकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर लागेच बचाव कार्य सुरू करण्यात आले सतत 1 ते दीड तास अथक परिश्रम केल्या नंतर विहिरी पडले असलेल्या दोन उदमांजर/ कांडेचोर यांना बाहेर काढून तसेच पंचनामा नोंदवून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
तसेच तिथे जमलेल्या शेतकऱ्याना या प्राण्यांविषयी योग्य माहिती देण्यात आली.
उदमांजर या प्राण्याला मराठी मध्ये कांडेचोर असेही म्हटले जाते. तसेच इंग्रजी मध्ये common palm civet cat तर शास्त्रीय नाव ( paradoxurus hermaphroditus) असे आहेत उदमांजर या प्राण्याला ग्रामीण भाषेत अनेक नावाने ओळखल्या जाते तसेच या प्राण्याबद्दल अनेक भ्रामक गोष्टी शुद्ध सांगितल्या जातात उदमांजर या प्राण्याला ग्रामीण भागात मोहडोंबरी, मसण्याउद,कांडेचोर अश्या नावाने ओळखले जातो. किव्हा हिंदी मध्ये याला पान बिलाव सुद्धा संबोधले जातो.
या प्राण्याबद्दल काल्पनिक तसेच भ्रमित गोष्टी समाजात गुढ आहेत की हा प्राणी, मेलेल्या माणसाचे मेंदू खातोय, माणसावर दिवसा हल्ला करतो वैगैरे परंतु कांडेचोर हा प्राणी लाजाळू भित्रा असल्यामुडे तो माणसाच्या दूरच राहतो लोकवस्तीच्या लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून लपून बसतो किव्हा माणसाच्या नजरेत आल्यास पळ काढतो, तसेच कांडेचोर हा प्राणी निशाचर असल्यामुळे दिवसा सुस्त झाड्याच्या फांदीवर किव्हा एखाद्या ढोलीत पडून राहतो.
कांडेचोर हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या अंगाएवढीच त्याची शेपटीही लांब असते. कांडेचोर हा प्राणी दिवसा झाडांच्या फांद्यांवर किंवा ढोलीत झोपतो. तो रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. कांडेचोर हा प्राणी मुख्यतः गोड पदार्थ, फळे, किडे इ. खातो.
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कांडेचोर या प्राण्याला शेड्युल 2, पार्ट 2 मध्ये स्थान आहे या प्राण्याला मारणे, पकडणे, यांच्या पिल्लांना त्रास देणे, त्यांच्या राहत्या घराचे नुकसान करणे, बंदिस्त करणे किव्हा इजा करणे, हे सर्व वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा आहे व त्या करिता 3 वर्ष सक्षम कैद किव्हा 25 हजार रुपये दंड किव्हा दोन्ही अशी तरतूद कायद्या अंतर्गत केलेली आहे.
बचाव कार्य मा.ठोंबरे सर वपअ अड्याल यांच्या मार्गदशनात पार पडली तसेच बचाव कार्यात श्री. पंचभाई क्षेत्र सहाय्यक अड्याल, श्री. भुसारी बि.र केसलवाडा व मैत्रा वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहू. संस्था पवनी चे नामदेव मेश्राम ,शुभम रामटेके,चंदू देशमुख,शत्रूघन वैद्य,अनिकेत रामटेके यांनी पार पाडली..🌿🌿🌿🌿

14 एप्रिल रोजी सकाळी संस्थेत फोन द्वारे काळविण्यात आले की गोसे खुर्द कालव्याच्या सीमा कंपनी लगत साखळी क्रमांक 221 जवळ एक...
16/04/2023

14 एप्रिल रोजी सकाळी संस्थेत फोन द्वारे काळविण्यात आले की गोसे खुर्द कालव्याच्या सीमा कंपनी लगत साखळी क्रमांक 221 जवळ एक रानगवा (indian gaur) पडलेला आहे. लगेच वन विभाग, (वन्यजीव) पवनी, वनविभाग (प्रादेशिक), मैत्र वन्यजीव संरक्षण संवर्धन बहू. संस्था, पवनी यांचे बचाव दल, PRT TEAM member (Primary rescue team member) घटनास्थळी दाखल होऊन, शर्तीचे प्रयत्न चालू झाले, सतत 3 तासाच्या प्रयत्नानंतर रानगव्याला नाहरातून बाहेर काढण्यात यश आले. यात प्रत्यक्ष, वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी(वन्य.) श्री. ठोकळ साहेब व वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) श्री. बारसागडे साहेब मैत्र संस्थेचे अध्यक्ष, श्री. शिवरकर साहेब यान यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात बचाव मोहीम पार पडली तसेच उपस्थित सर्व क्षेत्र सहायक, वनरक्षक, संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य आणि prt team चे सर्व सदस्य यांनी सर्व सोबत मिळून शर्तीचे प्रयत्न केलेत.

यशस्वी 5 वी व्याघ्र गणनाव्याघ्र संवर्धनाचे 50 वर्ष पूर्ण देशात वाघाची संख्या 3167
10/04/2023

यशस्वी 5 वी व्याघ्र गणना
व्याघ्र संवर्धनाचे 50 वर्ष पूर्ण
देशात वाघाची संख्या 3167

29/03/2023
जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो.संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हें...
21/03/2023

जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो.

संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. परंतु दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर (३२ दशलक्ष एकर) पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत, हे क्षेत्र जवळ-जवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचे आहे. जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात: जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते – जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे. तितकीच महत्त्वाची, निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक 'कार्बन शोषकां'पैकी एक आहेत.

आज, जंगलांनी जगाच्या ३०% पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे आणि त्यात ६०,००० पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत, ज्यात अद्याप अनेक प्रजाती या अज्ञात आहेत. स्थानिक आदिवासी लोकांसह अंदाजे जवळपास जगातील १.६ अब्ज गरीब लोकांना जंगलांमार्फत अन्न, लाकुड, पाणी आणि औषधे यांची सोय होते.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात तर वनांचे विशेष महत्त्व आहे. केवळ एक इंच जमिनीचा सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो. परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळयातच होऊ शकते. म्हणून वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला आहे पण, एकेंकाळी उन्नत असलेली मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाईन अशी अनेक वनसंहाराने उजाड झाली आहेत, हे एक कटु सत्य आहे. हवामान बदलांशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन-परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना (ग्रीन हाउस गॅसेस) शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमानवाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते.

ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला नोव्हेंबर २०१९ आणि मे २०२० मध्ये भीषण आगी लागली होती. जवळपास तीन आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले. अ‍ॅमेझॉनच्या ‘जंगलाला आग’ याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोतास हानी होत आहे. अ‍ॅमेझॉनचे जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मीळ प्रजाती फक्त अ‍ॅमेझॉनमध्ये आढळतात. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत.

सर्वप्रथम, लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी “२१ मार्च”हा दिवस “जागतिक वन दिन” म्हणून १९७१ मध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचासुद्धा मोलाचा वाटा आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.

दरवर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक वन दिनानिमित्त एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि नंतर वर्षभर त्या घोषवाक्यावर कृतिशील कार्य करून जगभरात वन संवर्धनाच्या शिक्षणाचे कार्य व जागरुकता पसरवण्याचे काम केले जाते. २१ मार्च २०२२ या जागतिक वन दिवसाचे घोषवाक्य आहे ‘‘शाश्वत वननिर्मिती आणि त्याचा योग्य वापर’’. वनांची निर्मिती शाश्वत आणि कायम असावी आणि त्यामधून जैवविविधता समृद्ध व्हावी हा या घोष वाक्याचा साधा सरळ अर्थ आहे.

जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० ...
21/03/2023

जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला दोखा निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.

पार्श्वभूमी

चीनने १९५८-६२ च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला, पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली.जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत

भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. या‌शिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.[३] २०२० मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या १३व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. प्रकाशित अहवालात पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की गेल्या २५ वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदविली गेली आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९% घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे आणि काही ठिकाणी वाढलेलीही दिसते. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ताबडतोब प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती :

- पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर)

- रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट)

- भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर)

- सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर)

- बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर)

चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे.चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर दिसून येत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असत. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे, परिणामी पिकांचा उतारा देखील कमी होत आहे. यावर उपास म्हणून पिकांवर आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे.

सुरुवात
महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये नाशिक येथे 'नेचर फॉरएव्हर सोसायटी' (Nature Forever Society) नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ (Eco-Sys Action Foundation ) आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने २०१० पासून 'जागतिक चिमणी दिन' साजरा करण्यास सुरुवात केली. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो. या संस्थांमार्फत चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास व त्यांच्या संवर्धनासाठी उपाय आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा चिमण्यांवर होणारा परिणाम यासाठी जगभर चळवळ उभारली जात आहे.

चिमण्या कमी होण्याची कारणे

१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण.

२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीयेत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे.

३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले

४.शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास.

६.वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

७.पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत.

८.जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात.

चिमण्यांच्या संवर्धनाचे उपायः

१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.

२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.

३.शेतीसाठी नीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.

४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे.

५.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.

10/03/2023

Today rescue

Address

Pauni
441910

Telephone

+919860955893

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maitra wildlife protection & conservations multipurpose institutions pauni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share