23/04/2026
कायदा व सुव्यवस्थे च्या मर्यादेत संविधानिक भारत बंद आंदोलन.
जाति आधारित जनगणना, ओबीसी हक्कांचे संरक्षण, TET रद्द करावी, UGC बिल लागु करावे, मतदान बॅलेट पेपर वर घेण्यात यावे तसेच शैक्षणिक व सामाजिक न्यायाच्या, विविध मागण्यांसाठी भारत मुक्ति मोर्चा व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (OBC) मोर्चा यांच्या वतीने देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या आंदोलनाला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत ओबीसी, एससी व एसटी समाजाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
यानिमित्ताने परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहीम राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र जातीनिहाय कॉलम समाविष्ट करण्यात यावा.
एससी, एसटी व ओबीसी समाजाच्या हितासाठी मजबूत यूजीसी इक्विटी रेग्युलेशन तातडीने लागू करावे.
सन 2011 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TET परीक्षेतून कायमस्वरूपी सूट देण्यात यावी.
ॲड विनोद अंभोरे, गौतम जडे सह आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेऊन सांगीतले की, ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे ही मोठी फसवणूक आहे. तसेच शैक्षणिक धोरणांमध्येही दुर्बल घटकांच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, वरील मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र व व्यापक करण्यात येईल. आंदोलन पूर्णतः संवैधानिक व शांततापूर्ण मार्गानेच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर निवेदन जिल्हाधिकारी, परभणी यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती व केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले असून, प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बाळासाहेब लंगोटे पाटील, गौतम जडे, सुभाष साडेगावकर, ॲड विनोद अंभोरे, मुंजाजी भाले, बबन भंडारे, ॲड संदेश वाघमारे, टी टी सुभेदार, ॲड कांचन बनसोडे, विठ्ठल साखरे, पांढरे, क्रांतिकर ढगे, भारत लांडगे, मुकूंद हणवते इत्यादी.