02/09/2026
नारीशक्तीची ऐतिहासिक भरारी, देशाच्या संरक्षण क्षेत्रातील अभिमानाचा क्षण ! 🇮🇳
एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांनी ‘असिस्टंट चीफ ऑफ द एअर स्टाफ (एज्युकेशन)’ म्हणून पदभार स्वीकारत भारतीय संरक्षण सेवांच्या इतिहासात नवा अध्याय रचला आहे.
बिगर-वैद्यकीय शाखेतून एअर व्हाइस मार्शल अर्थात ‘टू-स्टार’ पद प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. तीन दशकांहून अधिक काळाची त्यांची समर्पित सेवा, नेतृत्व आणि कर्तृत्व आजच्या भारतातील नारीशक्तीची क्षमता आणि सामर्थ्य अधोरेखित करणारी प्रेरणादायी गाथा आहे.
देशसेवेच्या सर्वोच्च क्षेत्रात महिलांच्या वाढत्या योगदानाचा हा ऐतिहासिक टप्पा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे.
एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांचे मनःपूर्वक अभिनंदन.त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.