Panvel City Municipal Corporation

Panvel City Municipal Corporation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Panvel City Municipal Corporation, Government Official, Panvel.

पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त "पनवेल नारी  सन्मान २०२६" कार्यक्रम  आद्य क्रां...
09/03/2026

पनवेल महानगरपालिका

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त "पनवेल नारी सन्मान २०२६" कार्यक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे.




08/03/2026





07/03/2026

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त "पनवेल नारी सन्मान २०२६" कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिन ८ मार्च निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने “पनवेल नारी सन्मान – २०२६” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ७.०० वाजेपर्यंत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे.



#पनवेलमहानगरपालिका

07/03/2026

*पनवेल महानगरपालिकेच्या वतीने एचपीव्ही लसीकरण मोहिमेस 8 मार्च पासून सुरूवात*

राज्यातील 14 वर्षे वयोगटातील मुलींकरीता एचपीव्ही (ह्युमन पॉपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च रोजी होणार आहे.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८ मार्च २०२६ रोजी, या मोहीमेची सुरूवात गावदेवी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ येथून केली जाईल. दिनांक ९ मार्च २०२६ पासून, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पुढील ३ महिन्यांपर्यंत म्हणजेच मे २०२६ पर्यंत एचपीव्ही लस दिली जाईल

एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा उद्देश गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणे हा असून एकूण 90 दिवस मोहीम राबवली जाणार आहे. एचपीव्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पूर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या 1 % लाभार्थी ही मोहिमेकरीता अपेक्षित लाभार्थी असतील.

#पनवेलमहानगरपालिका




PanvelMunicipalCorporation

07/03/2026

*पनवेल महानगरपालिकेच्या वतीने एचपीव्ही लसीकरण मोहिमेस 8 मार्च सुरूवात*

राज्यातील 14 वर्षे वयोगटातील मुलींकरीता एचपीव्ही (ह्युमन पॉपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च रोजी होणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८ मार्च २०२६ रोजी, या मोहीमेची सुरूवात गावदेवी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ येथून केली जाईल. दिनांक ९ मार्च २०२६ पासून, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पुढील ३ महिन्यांपर्यंत म्हणजेच मे २०२६ पर्यंत एचपीव्ही लस दिली जाईल

एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा उद्देश गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणे हा असून एकूण 90 दिवस मोहीम राबवली जाणार आहे. एचपीव्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पूर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या 1 % लाभार्थी ही मोहिमेकरीता अपेक्षित लाभार्थी असतील.
#पनवेलमहानगरपालिका




PanvelMunicipalCorporation

*पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड*पनवेल महानगरपालिक...
06/03/2026

*पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड*

पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आज महापालिकेच्या सभागृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या उपस्थितीत पार पडली. या महासभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्य तसेच नामनिर्देशित सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्व देऊन नियुक्ती करण्यात आली.

महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रवीण काळुराम पाटील, मधु दौलतराव पाटील, समीर श्रीकांत कदम, बबन नामदेव मुकादम, रविंद्र अनंता भगत, विजय मनोहर खानावकर, हेमलता रवी गोवारी, रविंद्र गणपत जोशी, राजश्री महेंद्र वावेकर, मनोज कृष्णाजी भुजबळ, रुचिता गुरुनाथ लोंढे, अजय तुकाराम बहिरा, अरविंद पुंडलिक म्हात्रे, हरेश मनोहर केणी, तुषार परशुराम पाटील तसेच प्रिया सुनील गोवारी यांचा समावेश आहे.

तसेच महिला व बालकल्याण समितीवर १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये लीना नंदकुमार म्हात्रे, अनिता वासुदेव पाटील, सोनल अजिंक्य नवघरे, बायजा बबन बारगजे, प्रतिभा सुभाष भोईर, सरस्वती नरेश काथारा, शीला भाऊ भगत, कुसूम गणेश पाटील, अस्मिता जगदीश घरत, ममता प्रितम म्हात्रे, रुचिता गुरुनाथ लोंढे, प्रियांका तेजस कांडपिळे, योगिता समीर फडके, मनीषा अनंत म्हात्रे, अर्चना योगेश भोईर तसेच मेघना संदीप घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय महानगरपालिकेच्या महासभेत ७ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये प्रथमेश चंद्रशेखर सोमण, प्रकाश पंढरीनाथ म्हात्रे, नितीन सोपान गावंड, परेश राम ठाकूर, गणेश चंद्रकांत कडू, डॉ.अरुणकुमार शंकर भगत, दिनेश रविंद्र खानावकर यांचा समावेश आहे.

सदर सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापौरांच्या मान्यतेने करण्यात आली.
#पनवेलमहानगरपालिका

#पनवेल

*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन* जागतिक महिला दिनाच्या प...
05/03/2026

*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन*

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिकेच्यावतीने भव्य बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे उदघाट्न दिनांक 7 मार्च 2026 रोजी ११:०० वाजता उप महापौर प्रमिला पाटील यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे. तरी महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील महिलांना स्वावलंबी व सशक्त बनवण्यासाठी, व्यवसायिक व सामाजिक कौशल्य वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महापौर नितिन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तुंचे विक्री व प्रदर्शन शनिवार, रविवार सोमवार तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.

या बचत गटाच्या उत्पादन मेळाव्यामध्ये खाद्यपदार्थ, दागिने, लोकरीच्या वस्तू, मोत्याच्या वस्तू, बेडशीट, कपडे, साड्या अशा विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे केले आहे.


#पनवेल
#पनवेलमहानगरपालिका


WomensDaySpecial
WomensDay2026

पनवेल महानगरपालिका  दिनांक ४मार्च २०२६ रोजी पनवेल महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे.   #पनवेल #लो...
02/03/2026

पनवेल महानगरपालिका

दिनांक ४मार्च २०२६ रोजी पनवेल महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे.

#पनवेल
#लोकशाहीदिन

अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने आयोजित ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी’ यांच्या ३...
01/03/2026

अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने आयोजित ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त ओवे मैदान सेक्टर २९, खारघर येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर click करा

https://youtube.com/live/SlXIlf-RMuw?feature=share

#हिंददीचादर
#श्रीगुरुतेगबहादुर
#नवीमुंबई
#खारघर

पनवेल शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त 'हिंद दी चादर' या विशेष कार...
28/02/2026

पनवेल शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त 'हिंद दी चादर' या विशेष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वैद्यकिय आरोग्य विभाग
पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 5 बीएलएस रूग्णवाहिका, 3 एएलएस अद्ययावत रूग्णवाहिका तैनात आहेत. वैद्यकिय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स फार्मासिस्ट, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासहित एकुण 850 पेक्षा अधिक वैद्यकिय आरोग्य कर्मचारी कार्यक्रमस्थळी पुर्णवेळ कार्यरत आहे.

महापालिकेकडून दिव्यांग व वृध्द नागरिकांच्या सेवेसाठी 100 व्हिलचेअरर्सची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक व्हिलचेअरसाठी स्वतंत्र वॉर्डबॉयची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी दहा आयसीयू बेडसह 100 बेड पनवेल महानगरपालिकेडून देण्यात आले आहेत.

कार्यक्रमस्थळी अद्यवायत सुविधांनी युक्त असे नेत्र तपासणी शिबीर सुरू असून सुमारे 40 हजार चष्म्यांचे वाटप यावेळी करण्याचे नियोजन आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या विशेष तपासण्यांची व्यवस्था केली असून तपासणीनंतर रूग्णांसाठी सर्व प्रकारची औषधे कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
#गुरुतेग
#हिंददीचादर



श्रीगुरुतेगबहादुर

Address

Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panvel City Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share