Bharat Vikas Parishad Panvel

Bharat Vikas Parishad Panvel Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bharat Vikas Parishad Panvel, Social service, Panvel.

20/09/2024
भारत विकास परिषद आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 जून पर्यावरणदिनाचे औचित्य साधून'एकल वापर single use)  प्...
07/06/2023

भारत विकास परिषद आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 जून पर्यावरणदिनाचे औचित्य साधून'एकल वापर single use) प्लास्टिक मुक्त पनवेल' विषयांतर्गत आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भव्य सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला.....
सन्माननीय महानगरपालिका आयुक्त श्री. गणेशजी देशमुख, उपायुक्त श्री. कैलाशजी गावडे
सन्माननीय आमदार श्री. प्रशांत ठाकूर,
सन्माननीय महाडाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सन्माननीय भाजपा सरचिटणीस श्री. विक्रांतजी पाटील, सन्माननीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी श्री.जयंतजी हजारे,
सन्माननीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक उपअधिकारी श्री. व्ही व्ही किल्लेदार
आदि मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

अर्थातच महानगरपालिकेच्या सहकार्याने पुढील कामगिरीसाठी भाविप पनवेल संस्था सज्ज आहे.

यावेळी सामाजिक जागरूकता निर्माण करणारी संस्थेच्या सदस्य कलाकारांनी 'शपथ तुला आहे' ही नाटिका सादर केली.
एकूणच कार्यक्रमातील काही क्षणंचित्र

Say No to Plastic Bags
29/05/2023

Say No to Plastic Bags

नमस्कार🙏🏻सगळे कसे आहात ?सर्वांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा.आपला हा ग्रुप दहा महिने सुस्त असतो. तरीही आपल्या सर्वांची आठ...
30/08/2022

नमस्कार🙏🏻
सगळे कसे आहात ?
सर्वांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा.

आपला हा ग्रुप दहा महिने सुस्त असतो. तरीही आपल्या सर्वांची आठवण मात्र सदैव मनामनात असते.
आपल्या सर्वांच्या उदंड व भरघोस प्रतिसादामुळे 2020 व 21 या दोन्ही वर्षी आपल्या भारतभूमीचे सदैव रक्षण करणाऱ्या दूरस्थ सीमेवरील वीर जवान बांधवांना दिवाळी फराळ आपण पाठविला होता. याही वर्षी जवानांसाठी असा फराळ पाठवणार आहोत.

भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी....
*सैनिकहो तुमच्यासाठी*
ह्या उपक्रमामुळे आपली दिवाळी साजरी करण्यापूर्वीच जवानांना दिवाळी फराळ सुपूर्द करावा.. या संकल्पनेमागे खूप चांगला विचार असल्याने उदंड लोकसहभागातून हे सहज शक्य झाले आहे. याकरिता आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.🙏🏻

*भारत विकास परिषद पनवेल शाखा*
या वर्षी पुन्हा सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्यास सज्ज झाली आहे.
यासाठी आम्ही आपल्या सर्वांना निधी संकलनासाठी आवाहन करीत आहोत..🙏🏻

या वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे 6000 भारतीय जवानांना दिवाळी फराळ बॉक्सेस पाठविण्याचा मानस आहे.
*एका दिवाळी फराळ बॉक्समध्ये असेल...*
1) खुसखुशीत चिवडा-150 gm
2) चविष्ट तिखट शेव-150 gm
3) चकल्या- प्रत्येक बाॅक्स मधे 6 नग (अंदाजे 100 gm)
4) शुद्ध तुपातले भरपूर सुकामेवा घालून केलेले पौष्टिक लाडू-प्रत्येक बाॅक्समधे 4 नग,अंदाजे वजन 180 gm

यावर्षीचे दिवाळी फराळ बॉक्सेस या बॉर्डरवरती पाठवणार आहोत:-
उधमपूर, पूछ, तेजपूर, तवांग, मणिपूर, लेह आणि सियाचेन....
यासंबंधीचा आर्मी ऑफिसर्स बरोबर पत्रव्यवहार सुरू झाला आहे.🙏🏻

या उपक्रमात मी काय मदत करू शकतो..असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येणारं!
तेंव्हा....
आपण किमान
₹ 500 आणि 500च्या पटीत देणगीमूल्य देऊन या अभियानाद्वारे सीमेवरील जवानांना फराळ उपक्रमास हातभार लावू शकता.आपले नातलग,मित्र, शेजारी, ऑफिस मधील सहकारी सर्वांना या उदात्त कार्यासाठी देणगी मिळवण्यासाठी माहिती सांगावी.. जेणेकरून आपण किमान 6,000 दिवाळी फराळ बॉक्सेस सीमेवर पाठवू..कदाचित आपल्या सहकार्याने वाढवू ही..!
दरवर्षी प्रमाणे सैनिकांना *शुभेच्छा पत्रे* सुद्धा पाठवणार आहोत. आपण ग्रिटींग्ज कार्ड्स बनवून पाठवू शकता. लवकरच ते कशापध्दतीने तयार करायचे हे कळवू..
बॉक्सेस च्या पॅकिंग चे वेळी आपण प्रत्यक्ष उपस्थितीत राहून कामासाठी आपण हातभार लावू शकता..

या वर्षी दिवाळी 24 ऑक्टोबर ला आहे. आणि पुरेसे आधीच दिवाळी फराळ बॉक्सेस आपण पाठवीत असल्याने हा उपक्रम आपण *1 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर* या कालावधीत करायचे ठरविले आहे.

*देणगी पाठवितांना या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात ही विनंती*🙏🏻
1) स्वतःचे नाव
2) पूर्ण पत्ता
3) PAN
4) Whatsapp नंबर
5) Email ID

*देणगी पाठविण्यासाठी लिंक*
https://rzp.io/l/bvpkokan

अधिक माहितीसाठी संपर्क:-
*पद्मजा कुलकर्णी*
9702919339
*ज्योती कानिटकर*
8424048253

भारत विकास परिषद, पनवेल शाखा

धन्यवाद!🙏🏻

About Bharat Vikas Parishad. Bharat Vikas Parishad is registered as a Society under the Societies Registration Act 1860 on the 10th July, 1963. It is a service-cum-sanskar oriented, non-political, socio-cultural voluntary organization, where both husband and wife join as members to serve the society...

03/06/2022

On Sunday 5th June BVP panvel has arranged a lecture on Kashmirnama by renowned speaker Dr. Sachidanand Shevde . Venue is Phadke Natya Sabhagruh Panvel. This will be between 11.30 to 1.30 pm.

*"सैनिक हो तुमच्यासाठी" भाविप  पनवेल शाखा उपक्रम 2021 निधी संकलनात सहभागी होण्यासाठी  Link https://rzp.io/l/bvpkokan*सैन...
06/10/2021

*"सैनिक हो तुमच्यासाठी" भाविप पनवेल शाखा उपक्रम 2021 निधी संकलनात सहभागी होण्यासाठी Link https://rzp.io/l/bvpkokan*

सैनिकांसाठी दिवाळी फराळ उपक्रमात सहभागी होण्यासाठी या मेसेजमधे लिंक दिली आहे, परंतु कृपया online पैसे पाठविल्यानंतर तो screenshot / देणगीदाराचे नाव, पत्ता,आणि PAN क्रमांक ज्योती कानिटकर किंवा पद्मजा कुलकर्णी यांच्या whatsapp number वर लगेचच कळवावा. जेणेकरून आम्हांला नोंद करणे सोयीचे होईल. 🙏🏻
ज्योती कानिटकर: 8424048253
पद्मजा कुलकर्णी: 9702919339

About Bharat Vikas Parishad. Bharat Vikas Parishad is registered as a Society under the Societies Registration Act 1860 on the 10th July, 1963. It is a service-cum-sanskar oriented, non-political, socio-cultural voluntary organization, where both husband and wife join as members to serve the society...

*Mission Unlock Kids**New project by BVP Panvel*Corona Pandemic आणि Lockdown..... मागच्या 15 महिन्यांत आपण कधीही कल्पना ...
20/06/2021

*Mission Unlock Kids*
*New project by BVP Panvel*

Corona Pandemic आणि Lockdown..... मागच्या 15 महिन्यांत आपण कधीही कल्पना नं केलेल्या परिस्थितीचा आपापल्या परीने सामना करत वाटचाल करत आहोत. याचा प्रत्येकावरच आणि विशेषकरून आपल्या मुलांच्या शारिरिक, मानसिक व भावनिक... स्थितीवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा झाला आहे, त्यावर स्ध्यातरी कोणाजवळ उपाय नाही. पण या काळात मुलांवर झालेले परिणाम दुरोगामी होऊ नयेत, त्यांना या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी मदत करावी .. या उद्देशाने *भारत विकास परिषद* पनवेल शाखा पुढे सरसावली. तज्ञ डॅाक्टर्स तसेच इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण या उपक्रमाचे आयोजन करायचे ठरविले आणि त्याचा पहिला दिवस आज यशस्वीरित्या पार पडला.
मुलांना screen पासून काही काळ मुक्तता मिळावी, आभासी जगातून वास्तवात येतां यावे, घराच्या चार भिंतींबाहेरची मोकळी हवा मिळावी... असा विचार करुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
Covid appropriate behaviour म्हणजे social distancing, mask, sanitizer या सगळ्याची काळजी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली.
आज वय वर्ष 6 ते 12 या गटातील 15 मुले सहभागी झाली होती.
पालक तसेच volunteers ना एक Google form पाठवून कोव्हीड norms च्या प्रश्नांची उत्तरे भरून घेतली होती.
सकाळी 10 वाजता पालकांनी मुलांना नियोजित स्थळी आणुन सोडले व तेथून आपले volunteers व मुले निरनिराळ्या गाड्यांतून श्री. ठकेकर सरांच्या नेरे येथिल सृष्टी फार्महाऊसला पोहोचले.
मुलांना आपण अभ्यास, मोबाईल फोन, कॅाम्पयुटर विसरुन दिवसभर कशी धमाल करणार आहोत याची कल्पना देऊन कार्यक्रमाची सुरुवात
एकात्मता मंत्र व नंतर देशभक्तीपर गीत म्हणून करण्यात आली. त्यानंतर
Action song, Warm up exercises, योगासन, followed byTreasure hunt ,खेळ, एकाने दुस-याची ओळख करुन देणे व शेवटी शाडूमातीपासून गणपतीची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन संपूर्ण शारिरिक व मानसिक अनलॅाक होईल असा प्रयत्न करण्यात आला. मध्यंतरात मुलांच्या आवडती पावभाजी खायला दिली. 4 वाजता मुलांना परत आणुन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलांसोबत आपले सुपर उत्साही कार्यकर्तेदेखिल unlock होऊन परत आले.

ह्या project ची संकल्पना श्रीमती आभा जांबेकर यांची होती. ज्योती कानिटकर व पद्मजा कुळकर्णी यांनी नेहेमीप्रमाणे ती उचलून धरली व बाकी BVP members तसेच non members च्या मदतीने पूर्णत्वास नेली.
कुठलेही project करण्यासाठी अनेकांचा हातभार लागतो. आज आपण या कोव्हीडकाळात नाविन्यपुर्ण म्हणतां येईल अशा प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. अजून खूप मुले unlock होण्याची वाट पहात आहेत व आपण त्यांना मदत करायची आहे.
तेव्हा आपल्यातील कोणाला पुढिल कार्यक्रमात सहभागी होता येत असेल तर जरूर सांगा.
आजच्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी व तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोणी कोणी काय काय केले याची यादी इथे देत नाही. पण अजून पुढे बरेच काही करायचे आहे. आपण जमेल तसा सहभाग घ्याल अशी अपेक्षा. 🙏🙏

Address

Panvel

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Vikas Parishad Panvel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category